अशी तुळस कधीही घरी लावू किंवा ठेवू नये. नाहीतर काहीही होऊ शकते.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे खूप महत्व आहे. प्रत्येक हिंदूंच्या दारात तुळस ही असतेच. ज्यांच्या दारात तुळस असते अशा व्यक्तींवर सर्व देवी देवतांची कृपा नेहमी असते. तुळशीच्या फक्त दर्शनाने आपली सर्व पापे जळून जातात. आपल्या विविध धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्व सांगितलेले आहे. तुळस मातेने स्वतः असे सांगितलेले आहे की, जी लोक माझी रोज पूजा करतील त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही कमी राहणार नाही.

ज्या घरात मी असते त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या दारात तुळस असणे आवश्यक आहे. परंतु तुळस लावताना आपल्याला काही काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुळस मातेचा आशीर्वाद मिळण्याच्या ऐवजी क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया तुळस लावताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ते.

तुळस लावताना नेहमी चांगलीच माती वापरावी खराब माती वापरू नये. यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येते व आपल्याला तुळस मातेच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो. जर वाळलेली तुळस दारात असेल तर ती लगेच उपटून टाकावी कारण वाळलेली तुळस दारात असल्याने अकाल मृत्यूचा धोका असतो. आपल्या घरातील सुखसमृद्धी निघून जाते.

जेथे तुळस वाळलेली असते तेथे देवी लक्ष्मी कधीही निवास करत नाही. तुलस वाळली तर असे समजावे की, आपल्या घरात नकारात्मक शक्तीने प्रवेश केलेला आहे. शास्त्रात असे मानले गेले आहे की, दारात वाळलेली तुळस असणे म्हणजे साक्षात तुळस मातेचा अपमान करण्यासारखे आहे. अशा घरांवर माता नेहमी क्रोधीत राहते. मासिक धर्मात कोणत्याही झाडाला पाणी टाकू नये. तुळशीला तर अजिबात नाही नाहीतर तुळस कोरडी होऊन जाते. घरातील सुखशांती ही निघून जाते.

तुळशीच्या कुंडीची स्वछता करत राहावे. तुळशीची पाने इकडे तिकडे फेकू नये. तुळशीच्या रोपमध्ये रासायनिक खत टाकू नये सेंद्रिय खतांचाच वापर करावा. तुळशीला पाणी अर्पण करताना पायात चप्पल असू नये. सोबतच पाणी अर्पण करताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे आपल्याला पाप लागते. तुळस मातेचे रोज दर्शन घेतल्यास आपल्यास स्वर्गाची प्राप्ती होते व आपल्यावर व आपल्या कुटुंबावर नेहमी सकारात्मक ऊर्जा भरलेली असते.

तुळशीच्या पानांना नखे लावून ती पाने तोडू नये यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवतो. घरात आजारपण प्रवेश करते. तुळशीचे रोप अंगणात अगदी दारासमोर लावावे. तुळशीचे रोप एकापेक्षा जास्त आलेली असतील तर ते शेजारच्या पाजाऱ्यांमध्ये वाटुन घ्यावी. एकापेक्षा जास्त रोप आपल्या दारात येणे म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचे आपल्या घरात येण्यासारखे आहे.

तुळशीच्या आसपास कपडे वाळायला टाकू नये. तसेच तुळशी जवळ चपला बूट काढू नये. मासिक धर्मात स्त्रियांनी तुळशीपासून दूरच राहावे. व्यसनी व मांसाहारी व्यक्तींनी देखील तुळशीपासून दूरच राहावे. ज्या पुरुष व स्त्रीने शारीरिक सं-बं-ध बनवले असतील त्यांनी अंघोळ केल्यावरच तुळशी जवळ जावेअसे केल्यास तुळशिवर अपवित्र छाया पडते व घरात गरिबी व दारिद्र्य येते.

तुळशीमध्ये कधीही शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती ठेवू नये यामुळे घरात रोज काहींना काही अडचणी येत असतात. तुळशीमातेला नियमित पणे पाणी टाकल्यास व दिवा लावल्यास आपल्याला कितीतरी पुण्य फळांची प्राप्ती होते व आपले घर सुखसमृद्धीने आणि समाधानाने भरून जाते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *