या ५ वस्तू दिसल्या तर समजून जा तुमचे नशीब जोरदार पलटणार आहे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. म्हणूनच कदाचित आपली आई आपल्याला दही किंवा साखर खायला देते. पुराणामध्ये अशा काही घटनांचे वर्णन केलेले आहे. ज्या घटना घडल्यास आपला दिवस चांगला जातो. तर मी तुम्हाला आता अशा १० वस्तू सांगणार आहे. ज्या वस्तू तुमच्या सकाळी सकाळी दृष्टी किंवा नजरेत पडल्या तर तुमचा दिवस पूर्णपणे चांगला जाणार आहे.

सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताच्या तळ हातांना बघणे खूप शुभ मानले जाते. कारण त्यामध्ये देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू यांचा वास असतो. म्हणून सकाळी सकाळी आपल्या तळ हातांचे दर्शन करणे म्हणजे या देवी लक्ष्मीचे दर्शन करणे असे समजले जाते. म्हणून आपला दिवस चांगला जातो.

जर सकाळी सकाळी घराबाहेर गेल्यावर तुम्हाला गाय दिसली किंवा एखादा गवळी गाईचे दूध काढतोय असे दिसल्यास आपला दिवस खूप शुभ जातो. सकाळी सकाळी गाईचे वासरू दिसणे किंवा पक्ष्यांची चिवचिव आणि कलकलाट ऐकू येणे हे सुद्धा खूप शुभ असते. त्याचबरोबर सकाळच्या वेळी हत्ती पांढरी फुले किंवा आपला मित्र दिसला तर हे सुद्धा खूप शुभ असते.

सकाळी सकाळी तुम्हाला एखादे यज्ञ आणि अभिषेक दिसणे सुद्धा खूप शुभ असते. सकाळी अग्नी दिसल्यास तुमच्या जीवनातील सर्व वाईट दोष निघून जातात व तुमचे जीवन पवित्र होते. पुराणात सवासिनी स्त्रीला देवी मानले गेलेले आहे. म्हणून सकाळी सकाळी सवासणी स्त्री दिसणे सुद्धा खूप शुभ मानले गेलेले आहे.

परंतु ती स्त्री घरातील नसावी ती बाहेरील स्त्री असावी. एखाद्या मंदिरामध्ये आरती चालू असेल तर ती आरती तुम्ही बघितली तर ते खूप सुद्धा खूप शुभ असते. आरती आपल्या मनातील सर्व विकार दूर करते. मंदिरात घंटानाद ऐकू येणे तेसुद्धा खूप शुभ असते. जर तुम्ही सकाळी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडलेले असाल आणि तुम्हाला रस्त्यामध्ये एखादी मंदिर लागले तर ते काम नक्की पूर्ण होते.

हे शुभ लाभाचे संकेत आहे. सकाळी शेत सोने व तांबे हे बघणे सुद्धा शुभ मानले गेले आहे. त्या वस्तू तुम्हाला निसर्गाशी जुळून ठेवतात व तुमचा दिवस शुभ बनवतात. सकाळी सूर्य उगवताना बघणे हे आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते व असे केल्यास आपल्या शरीरामध्ये स्फूर्ती संचारते.

हिरवेगार गवत बघणे सुद्धा शुभ असते. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. जर सकाळच्या वेळी एखादी नदी दिसणे हेसुद्धा खूप शुभ असते. कारण नदी चा अर्थ असा होतो की प्रगतीकडे वाटचाल करणे नदी जशी वाहत जाते त्याचप्रमाणे आपले जीवनही बाहेर जाते. नदी तशी संवेदनशील सहनशील आणि धाडसी असावे. तर यापैकी एका तरी वस्तू आपल्याला सकाळी दिसावी आणि आपला दिवस उत्साहाचा आनंदाचा आणि सुखाचा जावा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *