नागपंचमी या चूका अजिबात करू नका, नाहीतर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिन्याची सुरुवात झाली म्हणजे सणांना सुरुवात होते. त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. देवांचे देव महादेव यांचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना असतो या महिन्यांमध्ये देवी पार्वती आणि महादेव यांची पूजा केली जाते. दिनदर्शिकेनुसार नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला पाचव्या दिवशी साजरा केला जातो.

या दिवशी नागाचे पूजन केले जाते देवांचे देव महादेव यांनी नागाला आपल्या गळ्यातील हार म्हणून स्थान दिलेले आहे. नागपंचमीच्या दिवशी धन आणि समृद्धी मिळवण्यासाठी नागाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नागदेव हे धनाचे आणि लक्ष्मीचे संरक्षण करतात नागपंचमीच्या दिवशी मनोभावाने नाग देवतेचे पूजन केल्यास आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल त्या व्यक्तीने तो दोष काढण्यासाठी नागपंचमीचे व्रत जरूर करावे. त्यासोबतच ज्या व्यक्तीला स्वप्नामध्ये नाग दिसत असेल अशा व्यक्तीने त्या दिवशी नागाची पूजा करावी. त्यामुळे आपल्या मनातील नागाची भीती कमी होते. आज आपण जाणून घेणार आहोत की, नागपंचमीच्या दिवशी कोणती कार्य करू नयेत. त्यासाठी आपण एक कथा ऐकुया.

एक गाव होते त्या गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतामध्ये नागाच एक वारूळ होते. तेव्हा श्रावण मास आला आणि शेतकरी आपल्या नित्यनेमाने नांगर घेऊन शेतामध्ये गेला. तेव्हा शेतकरी नागरु लागला त्यानंतर नांगरता नांगरता चुकून नागराचा कणा त्या वारुळाला लागला आणि त्या वारुळा मधील नागा ची पिल्ले मेली. त्यानंतर थोड्याच वेळात तेथे नागीण आली आणि तिला तेथे वारूळ तुटलेले दिसले व आपली पिल्ले त्यात मेलेली दिसली.

तिने बाजूला बघितले तर नांगराला रक्त लागलेले तिला दिसले. तिला वाटले की, याच्या नांगरामुळे माझी पिल्ले मेली तो रोष तिने मनात ठेवला त्या नागिणीने शेतकऱ्याला निर्वंश करायचे ठरवले. ती नागीण त्या शेतकऱ्याच्या घरी गेली व त्याच्या मुलाबाळांना,पत्नीला,व सुनेला दंश केला व ते सर्व मरण पावली. त्यानंतर त्या नागिणीला समजले की, या शेतकऱ्याची एक पोरगी परगावी दिलेली आहे. तर त्या परगावी दिलेल्या मुलीला दंश करण्यासाठी ती नागीण त्या गावात आली.

त्या मुलीच्या घरी गेली तेवढ्यात नागिनी ने बघितले की, ती मुलगी नागपंचमीच्या दिवशी नवनागीन पाटावर काढून त्यांची पूजा करत होती. तेव्हढ्यात ही नागीण तेथे पोहचली. पूजा व दुध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली मग उभी राहिली आणि तिला म्हणू लागली बाई तू कोण आहे तुझ्या आई बाप कुठे आहे? इतक्यात तिने डोळे उघडले आणि पाहतेच तर नागिन दृष्टीत पडली.

बाई बिचारी घाबरून गेली नागीण म्हणाली भिऊ नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने आपली सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिन मला खूप वाईट वाटले. तिच्या मनात विचार आला की, ही बाई आपल्याला एवढ पूजत आहे. आपली पूजा करत आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वंश करायचा विचार मनात आणलेला आहे असे चांगले नाही. नागिन ने त्या बाईला तिच्या बापाची पूर्ण हकीकत सांगितली ते ऐकून तिला वाईट वाटले.

तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. त्या नागीण ने तिला अमृत दिले त्यात पावलांनी ती महिला तिच्या माहेरी आली. सर्व मरण पावलेल्या माणसांच्या तोंडामध्ये तिने अमृत घातले व ती माणसे जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने सांगितलेली हकीकत सांगितली तेव्हा बापाने मुलीला विचारले की, हे व्रत कसे करावे. मुलीने बापाला व्रताचा पूर्ण विधी सांगितला व नंतर सांगितले तुमच्याकडून व्रत झाला नाही तर नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरु नये, तवा वापरु नये व तळलेले खाऊ नये एव्हढे तरी पाळावे.

नागोबाला नमस्कार करावा तेव्हा पासून तो माणूस नागपंचमी पाळू लागला. या दिवशी महिला घरात स्वच्छता करतात. अंगणात रांगोळी काढताना किंवा नागाची चित्रे भिंतीवर किंवा पाठावर काढून त्याची पूजा करतात. गावात अनेक ठिकाणी नागाच्या वारुळाजवळ महिला गाणे म्हणत जातात आणि त्याची पूजा करतात. या दिवशी शेत व जमीन खणणे अशुभ मानले गेले आहे, म्हणून ही कामे करू नये.

या दिवशी धारधार वस्तू चाकू, सुरी वापरू नये. जेवण तयार करताना लोखंडी भांडी वापरू नये व तव्याचा वापर करू नये. असे केल्याने नाग देवाला त्रास होतो असे मानले गेलेले आहे. अर्थातच नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये चुलीवर तवा ठेवू नये व काहीही तळू सुद्धा नये. ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू चे दोष आहे. अशा व्यक्तींनी या दिवशी विशेष रूपाने पूजा करावी. असे केल्याने कुंडली मुळे येत असलेले दोष दूर होतात असे मान्य केलेले आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *