श्रावण महिन्यात नंदीच्या कानात बोला ही ३ शब्द सर्व मनोकामना पूर्ण होतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. सर्वजण महादेवाची पूजा व अभिषेक या महिन्यात करतात. महादेवाचे ज्योतिर्लिंग भक्तांच्या गर्दीने फुलून जाते. पण फक्त महादेवाची पूजा करून आपले पूजन पूर्ण होते का? नाही त्याआधी आपल्याला नंदीची पूजा करावी लागते. मग तेव्हा आपल्याला महादेवाचे दर्शन होते कारण स्वतः महादेवांनी नंदीला असे वरदान दिलेले आहे.

तसेच ते महादेवाचे दूतही आहे, म्हणून आपण आपली मनोकामना त्यांच्या कानात सांगितली तर ते ती मनोकामना महादेवापर्यंत पोहचवण्याचे काम करतात. याविषयी एक कथा ही सांगितली जाते. श्रीलाद नावाचे एक ब्रह्मचारी मुनी होते. एकदा ते रानात गेलेले असताना त्यांना एक छोटेसे बालक रडताना दिसले. त्यांनी त्या बालकाला उचलून आपल्या आश्रमात आणले आणि त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली.

त्यांनी त्या बालकाचे नाव आनंदी असे ठेवले. एक त्या स्वामींच्या आश्रम मध्ये दोन मुनी आले आणि त्यांनी सांगितले हा बालक हुशार आहे. परंतु हा बालक अल्पायुषी आहे. ज्याचे मरण जवळ आलेले आहे हा बालक जास्त दिवस काही जगणार नाही. हे ऐकून त्या बालकाला खूप वाईट वाटले त्या बालकाने जंगलात जाऊन महादेवाची ओम नमः शिवाय अशी तपश्चर्या चालू केली.

त्याच्या अखंड तपश्चर्येने महादेव त्याला प्रसन्न झाले व त्याला अजरामर होण्याचा आशीर्वाद दिला व त्याला आपल्या सोबत घेऊन गेले. महादेव आणि पार्वती यांनी सर्व गणांसमोर नंदीचा अभिषेक केला व असा आशीर्वाद दिला की जेथे जेथे महादेव असेल तेथे प्रत्येक ठिकाणी नंदी असेल. आणि नंदी शिवाय महादेवाचे कोणतेही मंदिर अपूर्ण समजले जाईल.

जे फक्त आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतील त्यांच्या इच्छा महादेव पूर्ण करतील. तुम्ही महादेवासमोर तुमची इच्छा प्रकट करू शकतात. परंतु नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा लवकर पूर्ण होते आणि कोणतेही काम साहेबांना सांगण्यापेक्षा त्याच्या सेक्रेटरीला सांगितल्यास ते काम लवकर पूर्ण होते.

हा आपला स्वतःचा अनुभव सुद्धा असणारच म्हणून कोणत्याही महादेवाच्या मंदिरात केल्यास आपली इच्छा महादेवाला न सांगता आधी नंदिला सांगावी. म्हणजे ती लवकरात लवकर पूर्ण होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *