श्रावण महिन्यामध्ये देवीची ओटी कशी भरावी घरच्या घरी भरा देवीची ओटी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

पवित्र महिना श्रावण हा सुरू झालेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये खूप जास्त मान्यता असतात. खूप जास्त विधी विधान असतात, भरपूर पूजा केल्या जातात भरपूर देवाला प्रसन्न केले जाते. महादेवाला व स्वामी समर्थांना प्रसन्न केले जाते. आपल्या देवी मातेची कुलदेवीची व किंवा अन्न देवी मातेचे ओटी भरली जाते.

तर भरपूर सेवकांचा प्रश्‍न असतो की, आम्ही घरच्या घरी आमच्या देवी मातेची व कुलदेवतेची ओटी कशी भरावी? तर आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी देवीची ओटी कशी भरावी व भरण्याची पद्धत कोणती आहे हे सांगणार आहोत. तर या श्रावण मध्ये तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेची किंवा देवीची ओटी भरायचे असतील तर देवीचा वार जो की मंगळवार आणि शुक्रवार आहे.

त्या दिवसात तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. किंवा श्रावण आता पवित्र दिवस सोमवार किंवा गुरुवार यापैकी कोणताही पवित्र दिवस निवडून तुम्ही ओटी भरू शकतात. देवीची ओटी भरण्यासाठी एक सुती साडी लागते. साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवीच्या सात्त्विक लहरी धरून ठेवण्याची क्षमता असते. तर मित्रांनो नेहमीची साडी असली तर तुम्हाला ओटी भरता येईल.

त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत मध्ये साडी त्यावर खण व नारळ घ्यावे. त्यानंतर नारळाची जी शेंडी असते ती देवी लक्ष्मी च्या बाजूने करावी व आपले हात आपल्या छातीजवळ येतील असे देवी लक्ष्मी समोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. साडी खण व नारळ देवीच्या चरणात अर्पण करावा व तांदळाने देवीची ओटी भरावी.

तांदळात सर्व समावेश असल्याने ते चैतन्यग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटी मध्ये समावेश केला जातो. त्यानंतर देवीच्या चरणा वरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे. व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मित्रांनो ही अत्यंत सोपी पद्धत आहे आपल्या घरातील देवीची ओटी भरण्याची.

त्यासाठी तुम्हाला फक्त एक सुती साडी किंवा रेशमाची साडी आणि नारळ लागेल. आधी तुम्हाला हातामध्ये साडी घ्यायची आहे त्यावर नारळ ठेवायचे आहे आणि नारळाच्या शेंडी देवी लक्ष्मी कडे येईल असे उभे राहायचे आहे आणि त्यानंतर ते नारळ आणि साडी आपल्याला देवी लक्ष्मीच्या चरणात अर्पण करायची आहे. त्यानंतर ७ किंवा ५ मुठ तांदूळ त्या साडी वर ठेवायचे आहे.

म्हणजे देवी लक्ष्मीची ओटी भरायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनात जे काही असेल जे काही आपली मनोकामना असेल ते आपण देवी लक्ष्मीकडे मांगायचे आहे. देवी लक्ष्मीच्या चरणात ठेवलेली साडी आणि नारळ तुम्हाला दिवसभर तेथेच ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती साडी तुम्ही वापरायला घेऊ शकतात.

आणि नारळ प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला देऊ शकतात. तुम्ही देवी लक्ष्मीच्या चरणात ठेवलेली साडी कोणत्या गरीब स्त्रीला किंवा गरजू स्त्रीला सुद्धा देऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही श्रावण महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची किंवा आपल्या कुलदेवतेची ओटी घरच्याघरी भरू शकता.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *