घरात मुलगी का असावी? वाचा खूप आवडेल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आज आपला समाज इतका पुढे गेलेला आहे, पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुलगी जन्माला आली की नाक खरडली जातात. आणि मुलगा जन्माला आले की, पेढे वाटले जातात. सर्वांना अपेक्षा असते की, आपल्याला एक तरी मुलगा हवा मुलगी नसेल तर चालेल पन मुलगा हवा वंशाला दिवा हवा. पणती नसेल तर काही हरकत नाही असा सर्वांचा आग्रह असतो.

पहिली मुलगी झाली की, दुसरा मुलगा पाहिजे अशी अपेक्षा केली जाते आणि मग गर्भ धारण केला जातो. पण जर पहिला मुलगा झाला तर मुलीची अपेक्षा केली जात नाही. मुलगीही आजही आपल्या समाजावर ओझे समजले जाते. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. आपल्या मृ-त्यूनंतर जसे आपला राग द्वेष मोह सोडवण्यासाठी जसे आपल्याला एक मुलगा असावा लागतो.

तसे आपण एका वडिलांना तिच्या मुलीच्या कन्यादान आपल्या घरात आणतो. त्या दानाची परतफेड करण्यासाठी आपल्यापैकी कोणाला तरी कन्यादान करावे लागते. कन्यादान करण्यासाठी मुलगी असावी लागते. आपण जर एका कडुन कन्यादान घेतलेल असेल आणि त्या कन्यादानाची परतफेड केली नाही. तर आपण या समाजातुन मुक्त होऊच शकत नाही.

पत्नीच्या रुपात आपण जेव्हा कन्यादान घेतो, तेव्हा लेकीच्या रूपांमध्ये आपल्याला ते कन्यादान परत करावेच लागते. तेव्हाच आपण या संसार बंधनातून मुक्त होतो. मुलगा फक्त आपल्या कुळाचा उत्तर करतो. मात्र मुलगी सासरच्या आणि आपल्या या दोन्ही कुळांचा उद्धार करते. ज्या व्यक्तींवर भगवंताची कृपा होते अशा व्यक्तीच्या घरातच फक्त मुलगी जन्माला येते.

असे म्हणतात की, मुलगी आली म्हणजे लक्ष्मी आली तर मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते. मुलगी आली की घरात सुखसमृद्धी येते व घरातील वातावरण लगेच बदलते. मुली एवढी माया कोणालाच नसते जे प्रेम मुलीकडून आई-वडिलांना मिळते ते प्रेम मुलाकडून कधीच मिळू शकत नाही. मुलगी म्हणजे वास्तव्याचा पीढा असतो. असे म्हणतात की, आपल्या घराण्यामध्ये एखादा संत महात्मा जन्माला आला तर त्याच्या मागील व पुढील २१ पिढ्यांचा उद्धार होतो.

पण काय सांगता येते आपल्या कन्येच्या गर्भातून जर एखादा संत महात्मा जन्माला आला तर आपल्या कुळाचा लगेच उध्दार होईल. आज-काल तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, मुले आपल्या आई वडिलांना सांभाळायला नकार देतात त्यावेळी मुलीच आई वडिलांचा सांभाळ करतात. म्हणायला झाल तर मुलांपेक्षा कितीतरी चांगल्या पटीने मुली आपल्या आई-वडिलांना सांभाळू शकता.

खूप लोकांना मुले नाही म्हणून मुली सुद्धा एकदम ताठ मानेने त्यांच्यासोबत उभ्या असतात. मुलींचे आई पेक्षा वडिलांवर थोडीतरी जास्त प्रेम असते. त्यापेक्षा मुलींना लाडाने व समजूतदारपणे काहीतरी वडिलांना पटवून देण्याचे काम व्यवस्थित जमते.

मुलगी कधी कधी आई-वडिलांना रागावते व त्यांना बोलते सुद्धा पण त्याच्यावर जास्त ती त्यांच्यावर प्रेम करते. वडीला ही मुलीच्या शब्दाबाहेर नसतात मुलीने सांगितले आणि वडिलांनी ऐकले नाही हे शक्यच नाही. अशी गोंडस लाडकी लेख सर्वांच्या घरी नक्की असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *