शास्त्रानुसार शनिवारी खिचडी खाणे चांगले का मानले जाते की वाईट, माहिती करून घ्या येथे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या भारत देशामध्ये काही पदार्थ हे जणू आपल्या भारत देशाची ओळख बनलेली आहे. त्याचप्रमाणे पूर्ण देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी होय. खिचडी हा पदार्थ खूप पौष्टिक घटक आणि अगदी कमी मेहनती मध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणून त्याची ओळख आहे.

खिचडीला बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वेगवेगळ्या प्रांतानुसार आढळून येतात. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सुद्धा खिचडी मेनू मध्ये आढळते. खिचडी ही तिच्या पौष्टिक घटकामुळे प्रसिद्ध तर आहेच मात्र बहुतांश घरांमध्ये शनिवारी खिचडीचे सेवन हमखास केले जाते. तर यामागचे कारण काय आहे? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

तर ज्योतिष शास्त्र मध्ये शनी ग्रहाला किंवा शनिदेवाला खूप महत्त्व दिले जाते. या यासोबतच शनिदेवाला न्यायाचे देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते. पण असे असले तरी शनी देवांना क्रोध करणारे देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते. याला असे कारण आहे की, शनी देवाच्या साडेसातीचा प्रकोप वक्रदृष्टी च्या फेऱ्या मध्ये अडकलेल्या माणसाला आणि समस्यांना सामोरे जावे लागते.

मात्र असेही मानले जाते की, मनुष्याच्या पूर्व आयुष्यातील वर्तन आणि आताच्या आयुष्यामधील कर्म यावरून शनी देवाचा प्रकोप होतो आणि त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये शनि देवाची कृपा होते. सुख-समृद्धी भरभराट व यश येण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. म्हणून शास्त्रामध्ये शनिदेवाच्या प्रकोपाला शांत करण्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहे.

या उपायांमुळे साडेसातीच्या काळामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला त्रास कमी होऊ शकतो. यावर पहिला उपाय म्हणजे शनिवारी खिचडीचे सेवन करणे. होय यामुळे शनिदेवाचा कोप कमी करता येऊ शकतो. शनिवारी उडदाच्या दाळीने भरलेल्या खिचडीचे सेवन करणे अधिक प्रभावी मानले जाते. उडदाच्या डाळीचा खिचडीचे सेवन केल्यास शनी देवांचा प्रकोप शांत होतो.

शनि देवाची कृपा प्राप्त होऊन मनासारखे यश भेटते. व्यवहारिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये काही मतभेद निर्माण झाले असतील किंवा काही वादविवाद झाले असतील तर शनिवारच्या दिवशी खिचडी खाणे हा उपाय प्रभावी मानला गेला आहे. व्यवसायासाठी सुद्धा हा उपाय खूपच यशस्वी ठरल्याचे दिसून येते. शनिदेवाला तेलाच्या दिव्यामध्ये काळे तीळ अर्पण करणे हे खूपच भाग्यशाली मानले जाते.

अगदी त्याचप्रमाणे शनिवारी काळ्या तिळाचे सेवन करणे अधिक नशीबवान मानले जाते. म्हणून शनिवारी खिचडी सोबत काळ्या तिळाचे सेवन करा. खिचडी चे सेवन केल्याने राहू व शनी सारख्या ग्रहांच्या वक्रदृष्टी पासून बचाव होतो. या उपायांनी आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे उपाय नक्की मिळतील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *