सूर्यास्तानंतर या ५ वस्तू शेजाऱ्याला कधीच देऊ नका. नाहीतर तर लक्ष्मी होईल नाराज.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मामध्ये दान करण्याला खूप महत्त्व आहे दान केल्याने आपले पुण्य वाढते. असे म्हटले जाते की, जेवढे आपण दान करतो त्याच्या १० पटीने देव आपल्याला परत देतो. दान करण्याचे इतके महत्त्व असले तरी काही गोष्टी अशा आहेत ज्याचे कधीही दान करू नये आणि असे केले की देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरामध्ये वास करत नाही.

विशेषतः संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर काही वस्तूंचे दान अजिबात करू नये. दान म्हणजे एखाद्या गरिबाला काही देणे म्हणजे दान नाही. तर एखाद्या वेळेत आपल्या शेजारी नातेवाईक किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडे कोणत्यातरी वस्तूंची मागणी करतात. म्हणजे त्या लोकांना त्या वस्तूची गरज असते. म्हणून ते व्यक्ती ती गोष्ट मागत असते परंतु आपले कितीही जवळचे व्यक्ती असू द्या.

या ५ वस्तू सूर्यास्तानंतर कधीच दान करू नका. असे केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल आणि आपल्या घरातील बरकत संपुष्टात येईल. आपल्या घरामध्ये धन धान्यात कमतरता निर्माण होते अन्न पुरत नाही. जर वारंवार आपण या गोष्टींचे दान करत राहिलो. तर आपल्याला भयंकर आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. आपल्या घरात मग कधीच बरकत येत नाही. तर जाणून घेऊया त्या ५ वस्तू कोणत्या आहेत ते.

१) दही- मित्रांनो दह्याचा संबंध हा सरळ शुक्र ग्रहाशी येतो शुक्र ग्रह पासून आपल्याला सुख-समृद्धी प्राप्त होते. म्हणून दही आपल्याला सुख-समृद्धी प्रदान करण्याचे काम करते. हिंदुशास्त्र मध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही दही देऊ नये. जी व्यक्ती संध्याकाळी दही दान करतात त्यांच्या घरातून सुख-समृद्धी निघून जाते व ती व्यक्ती कंगाल होते म्हणून लक्षात ठेवा कधीही संध्याकाळी किंवा रात्री दहीचे दान करू नये. मग ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी.

दूध- मित्रांनो दुधाचा संबंध हा सरळ सुर्यदेवाशी येतो. तसेच श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीसोबत पण येतो. म्हणून संध्याकाळी दुधाचे दान करणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे पाठवणे होय. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते.

३) पैसा आणि मौल्यवान वस्तू- मित्रांनो सोने-चांदी पैसा आणि इतर मौल्यवान वस्तुंचे दान सूर्यास्तानंतर करू नये. आपण पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू ला धन मानतो आणि संध्याकाळची वेळ हि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यामुळे आपण झाडाचे मुख्य द्वार उघडून ठेवतो तर म्हणून संध्याकाळच्या वेळी आपण पैसे आणि इतर मौल्यवान वस्तूचे दान केले. तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते.

हळद- आपल्याला माहितीच असेल की, हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी येतो. त्याशिवाय हळदिला देवी लक्ष्मीचे रूपहि मानले जाते. ज्या व्यक्तीच्या जीवनातील गुरु ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भरपूर समृद्धी आणि त्याला मान-सन्मान प्राप्त होतो.

परंतु आपण जर संध्याकाळच्या वेळी हळदीचे दान केले तर आपला गुरू ग्रह कमजोर होऊ शकतो आणि आपल्या सुख-समृद्धी आणि धनाला हानी पोचू शकते. गुरु ग्रह कमजोर झाल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची अडचण निर्माण होते व आर्थिक समस्या निर्माण होतात. म्हणून चुकूनही संध्याकाळच्या वेळी कोणालाही हळद दान करू नका.

कांदा व लसूण- आपण सर्रास कांदा व लसूण इतरांना देत असतो. परंतु कांद्याचा थेट संबंध हा केतू ग्रहाशी आहे. केतू ग्रह हा तंत्र-मंत्र आणि कर्मासाठी प्रसिध्द आहे. आपल्याबरोबर असे अनेक जण असतात जे आपल्या बरोबर चांगले वागतात. मात्र त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल ईर्षा असते. व काही जण असे असतात ज्यांना आपले चांगले झालेले बघवत नाही.

म्हणून ते कांदे लसूण याचा वापर करून आपल्यावर जादू-टोणा व करनी करू शकतात. आणि आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणून कधीच संध्याकाळच्या वेळी कांदे व लसून दान करू नका. आणि सूर्यास्तानंतर कांदे लसुन दान करणे हे धर्मशास्त्रानुसार सुद्धा चुकीचे मानले गेले आहे. तर या आहेत त्या ५ वस्तू ज्या सूर्यास्तानंतर कोणालाही दान करू नये.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *