श्रावण महिना सुरू होण्याआधी घरात आणून ठेवा ही एक वस्तू घरात भरभराट येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिना हा अत्यंत पावन पवित्र असा महादेवाचा महिना मानला जातो. आपण सर्व जण नियमाने,व श्रद्धेने या महिन्याचे स्वागत करतो. पूजापाठ करतो. सेवा करतो व श्रावण सोमवारचे उपवास करतो. तर मित्रांनो हा श्रावण महिना १-२ दिवसातच सुरू होणार आहे. तर हा महिना सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला एक वस्तू तुमच्या घरात आणायची आहे. श्रावण महिना एकदाचा सुरू झाल्यावर ही वस्तू तुम्ही आणू शकत नाही अगोदरच आणून ठेवायची.

श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला ही वस्तू एका उपायमध्ये वापरायची आहे. आता हा उपाय कोणता तर मित्रांनो तुम्हाला महिना सुरू होण्याआधीच काळे तीळ किराणा दुकानातून आणायचे आहे . तुम्ही पावशेर अर्धा किलो कितीही आणू शकतात. तर तुम्हाला ही तीळ श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच आणायची आहे आणि श्रावण महिना सुरू झाल्यावर तुम्हाला रोज चिमूटभर तीळ महादेवाच्या पंडिवर टाकायची आहे.

तुमच्या घरात महादेवाची पिंड तर असेलच तर त्या पिंड वर चिमूटभर काळी तीळ टाकायची आहे. रोज सकाळी अंघोळ करून देवपूजेच्या वेळेस हे काम करायचे आहे. तुम्हाला हे काम फक्त श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच करायचे आहे अस नाही तर पूर्ण ३० दिवस जोपर्यंत श्रावण महिना असणार तोपर्यंत करायचे आहे. एखाद्या दिवशी काही समस्या असेल, सुतुक असेल तर नाही केले तरी चालेल.

पण ३० दिवस तुम्हाला हे करायचे आहे. बस तुम्ही जे काळे तीळ आणून ठेवले आहे. ते रोज चिमूटभर महादेवाच्या पिंडीवर टाकायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी देवांना स्नान घालणार तेव्हा आदल्या दिवशीचे तीळ एका डब्बीत किव्वा पिशवीत काढून ठेवायची आहे. आणि मग नवीन तीळ त्या शिवलिंगावर टाकायची आहे.

जेव्हा श्रावण महिना संपेल तेव्हा ती सर्व डब्बीत किंवा कागदात जमा करून ठेवलेली तीळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जीत करायची आहे. पण एक लक्षात ठेवा तुम्हाला ही तीळ श्रावण महिना सुरू होण्याआधीच आणायची आहे आणि हा उपाय करायचा आहे. मग बघा सर्व संकटे दूर होतील व सर्व काही सुरळीत चालेल आणि जे मनात आहे ते सर्व तुम्हाला मिळेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *