लक्ष्मीचे उपवास विवाहित महिलांनी करावे. घराची परिस्थिती सुधारते सुखसमृद्धी नांदते.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

विवाहित महिलांनी लक्ष्मी मातेचे व्रत नक्की करावे. जर घरातील विवाहित महिलांनी हे व्रत केले तर त्यांच्या घरातील परिस्थिती नक्की सुधारेल. घरात सुखसमृद्धी नांदेल लक्ष्मीचा घरात वास होईल, पैसे टिकू लागतील, कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही, नवऱ्याची प्रगती होईल मग तो कोणताही व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असुद्या दोनी ठिकाणी प्रगती होईल. मुलांचेही शिक्षणात लक्ष लागेल व त्यांची सुद्धा प्रगती होईल.

आता हे व्रत कधी करावे व कसे करावे तर मित्रांनो हे व्रत तुम्ही कधीही सुरू करू शकतात. खास करून तुम्ही शुक्रवार पासून हे व्रत सुरू करू शकतात. आता श्रावण महिना सुरू होणार आहे तर श्रावण महिन्याच्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात. तुम्हाला या दिवशी फक्त उपवास करायचा आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे व त्यांची प्रार्थना करायची आहे. की मी आजपासून तुमचे व्रत सुरू करत आहे तुम्ही आमच्या घरात वास करा व आमच्यावर कृपा करा.

अशी पार्थना करून तुम्ही व्रताला सुरुवात करावी. आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या दिवशी तुम्हाला श्रीसूक्त वाचायचे आहे. हे लक्ष्मी मातेचे सुक्त असते. तुम्हाला दुसरी कोणतीही पोथी वाचायची नाही आहे. तुम्हाला फक्त ज्या दिवशी तुम्ही शुक्रवारी व्रत करणार त्या दिवशी संध्याकाळी श्रीसूक्त वाचायचे आहे. यासाठी कोणतीही पूजा किंवा चौरंग मांडायची गरज नाही तुमच्या घरात फक्त लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी.

सकाळी उपवास केल्यानंतर तुम्हाला त्याच मूर्तीसमोर एक वेळेस श्रीसूक्त वाचायचे आहे. अगरबत्ती दिवा लावून तुम्ही ते श्रीसूक्त वाचू शकतात. फक्त देवघरामध्ये थोडी साखर किंवा खडीसाखर ठेवून तुम्ही वाचा. व संध्याकाळी श्रीसूक्त वाचत असताना तुम्ही देवाला गोड काहीतरी किंवा घरात जेही केलेल असेल त्याचा नैवेद्य दाखवावा. व त्यानंतर आपला उपास सोडावा उपवासामध्ये तुम्ही फक्त बडा खाऊ शकता म्हणजे साबूदाण्याची खिचडी वैगरे जे आपण खातो ते तुम्ही खाऊ शकत नाही.

सरबत किंवा ज्यूस पिऊ शकतात अशा रीतीने तुम्हाला हा उपास करायचा आहे. मनामध्ये श्रद्धा ठेवून तुम्ही हे शुक्रवारचे व्रत करावे आता किती शुक्रवार आपन हे व्रत करू शकतो?? तर मित्रांनो तुम्हाला ११ शुक्रवार हे व्रत करायचे आहे. मध्ये काही अडचण आली तर त्या दिवशी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे. श्रीसूक्त आणि देवाला नैवेद्य दाखवायचा नाही. पण तो शुक्रवार तुम्ही मोजायचा नाही.

तुम्हाला फक्त असे शुक्रवार मोजायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही पूजाही केली आणि श्रीसूक्त आणि नैवेद्यही देवाला दाखवला. व ११ व्या दिवशी विधीनुसार काहीतरी गोड करून तुम्ही तो नैवेद्य मातेला दाखवावा काहीतरी गोड खीर पुरणपोळी वगैरे तुम्ही करू शकता. आणि अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करायचे आहे. शक्य असेल तर तुम्ही मुलींना आपल्या घरी बोलावून त्यांना जेवण करू शकतात.

कोरोणामुळे हे शक्य नसेल तर एखाद्या मंदिरात जाऊन दानधर्म फळ वगैरे दान करू शकता. आपल्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचे आहे आणि यासाठी कोणत्याही पोथी वगैरे वाचण्याची आवश्यकता नसते. तर हे ते उपवास आहेत जे तुम्ही श्रावण महिन्याच्या शुक्रवारपासून सुरू करू शकतात किंवा कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारपासून तुम्हीही सुरु करू शकतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *