श्रावण महिन्यात अखंड दिवा का लावावा? कसा लावावा नक्की बघा हा इच्छापूर्तीचा उपाय आहे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना आहे. ज्यामध्ये भरपूर लोक महिनाभर उपवास करतात. मित्रांनो महादेवाचा हा पवित्र महिना हा इच्छापूर्तीचा महिना आहे. सर्व काही पूजा पाठ व दैवीय गोष्टी या महिन्यात केल्या जातात. हा श्रावण महिना ९ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. पहिला श्रावण सोमवार मित्रांनो हा ९ ऑगस्टला आहे. या श्रावण महिन्यामध्ये अखंड दिवा लावला जातो.

काही लोक लावतात, तर काही लोक लावत नाही. काही लोकांना माहीत असते तर काही लोकांना माहित नसते. जसा आपण नवरात्रीला नऊ दिवसाचा दिवा लावतो तसेच आपण श्रावण महिन्यातही अखंड दिवा लावू शकतो. जो की एक महिना चालणारा असेल. हा दिवा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपल्या बाधा अडचणी दुःख आणि आपल्या मनोकामना ची पूर्तता साठी आपल्याला हा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे.

तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे, वात दोऱ्याची ठेवायची कारण कापसाची बाद छोटी असते. त्यामुळे तो दिवा अखंड राहू शकत नाही. जसा आपण नवरात्रीचा नऊ दिवसांचा दिवा लावतो. तसाच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. फक्त हा दिवा विझायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. यासाठी तुम्ही मोठा दिवा घ्यायचा आहे, वातही ३० दिवस चालेल अशी घ्यायची आणि त्यामध्ये तेल टाकायचे आहे.

तर हा दिवा तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी लावायचा आहे म्हणजे श्रावण सोमवार असा जो पहिला दिवस आहे त्याच दिवशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही ९ ऑगस्ट या तारखेला लावायचा आहे. तुमच्या देव घरातच हा दिवा लावायचा आहे. लावल्यानंतर त्या दिव्याची पूजा पाठ करायचे म्हणजे हळदीकुंकू अक्षदा वाहून त्या दिव्याची पूजा करायची.

सोबतच तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती त्या दिव्यासमोर बोलायची आणि आपल्या वर जे काही संकट आलेल असेल त्यांच्या निवारणासाठी प्रार्थना करायची. आणि रोज या दिव्याची पूजा करायची अगदी सकाळ आणि संध्याकाळ आणि फक्त ३० दिवस हा दिवा चालेल याची नीट काळजी घ्यावी.

हा दिवा नक्की लावा घरातील सर्व दोष सर्व बाधा दूर होतात. आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये घरात एकही कटकट किंवा अपशब्द वापरले जाणार नाही याचीही काळजी घ्या.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *