ऑगस्ट मध्ये अतिशय भाग्यशाली ठरणार या ६ राशी २ राशीसाठी राजयोग ४ राशीसाठी संघर्षाचा काळ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये या ४ राशी अतिशय भाग्यशाली ठरणार असून २ राशींच्या जीवनात राजयोग येणार आहे. तर ४ राशींना संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रहन शास्त्रामध्ये खूप मोठे बदल घडून येणार आहेत. म्हणून हे बदल काही राशींसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. तर काही राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे.

मेष राशी- मेष राशीसाठी ऑगस्ट महिना अतिशय सकारात्मक ठरणार असून गुरू, शनी, राहू हे आपल्यासाठी शुभ फळ देणार आहे. मनावर असलेले चिंतेचे दडपण दूर होऊन पती पत्नीमधील गैरसमज दूर होणार आहे. सासरच्या मंडळींकडून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. व्यवहारात फसवणूक होण्याची संकेत आहेत.

त्यामुळे सावध असणे गरजेचे आहे. नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यवसायात चांगली सुधारणा घडणार असून आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. या काळात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे शनीच्या कृपेने कामात येणारे अडथळे दूर होतील.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी ऑगस्ट महिना लाभदायक ठरणार असून सूर्य, मंगळ, शुक्र हे आपल्या राशीसाठी शुभ फळे देणार आहेत. या काळात मित्रांकडून चांगली मदत व प्रोत्साहन प्राप्त होणार असून उद्योग व्यापारामध्ये प्रगती दिसून येईल. तरुण मुलांना नोकरीचा कॉल येऊ शकतो किंवा रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते.

या काळात आर्थिक प्राप्ती चांगली राहणार असून नव्या ओळखीमुळे नव्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. मनाला आनंदित करणाऱ्या घटना घडणार असून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. या काळात धन प्राप्तीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. कौटुंबिक समस्यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी ऑगस्ट महिना विशेष लाभदायी ठरणार असून मंगळ बुध गुरु आणि हर्षल हे आपल्याला शुभ फळ देणार आहे. उद्या व्यापारामध्ये खूप फायदा होणार आहे. कौटुंबिक सुख शांती अतिशय सुंदर लागणार असून मन आनंदी आणि समाधानी बनणार आहे.

नोकरीमध्ये अधिकाऱ्यांसोबत वादाचे प्रसंग येऊ शकतात परंतु मन शांत ठेवून आनंदाने काम करत राहणे आवश्यक आहे. उद्योगधंद्यामध्ये घेतलेले धाडस फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक सुधारणा घडून येणार असून मान व प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यांमध्ये थोडासा संघर्ष करावा लागू शकतो. शुभ फळ देणारा असले तरी सूर्य आणि राहू हे कष्टदायक सिद्ध होणार आहे. या काळात मोठी गुंतवणूक न केलेली बरी. अनावश्यक खर्चामध्ये वाढ होणार असून मानसिक ताण तणाव वाढणार आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा न केलेली बरी. याकाळात भाग्याची साथ नसल्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासाचा बळावर कामे करणे आवश्यक आहे.

सिंह राशी- सिंह राशीसाठी ऑगस्ट महिना अतिशय लाभदायक ठरणार असून लाभ होण्याचे संकेत आहे. गुरु शुक्र आणि शनी हे शुभफळ देणार असून कौटुंबिक सुखात वाढ होणार आहे. उद्योगधंद्यात नावलौकिक प्राप्त होणार असून शेतीमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. या काळात आर्थिक प्राप्ती चांगली राहणार असून हाती घेतलेल्या कामांना प्रचंड यश प्राप्त होणार आहे.

या काळात गैरमार्गाने केलेले कोणतेही आर्थिक प्रकरण अंगावर येऊ शकते. खोट कचऱ्याची प्रकरणे बाहेरुनच मिटवली तर बरी या काळामध्ये आर्थिक संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती च्या नवीन संधी आपल्याकडे चालून येणार आहे. एखादी खुशखबर कानावर येऊ शकते बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. शत्रूवर विजय प्राप्त होणार असून मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि साठी ऑगस्ट महिना शुभ ठरणार असून सूर्य बुध आणि राहू अशुभ काळ देणार आहेत. या काळात राहत्या घराचे बांधकाम होण्याचे संकेत आहेत या काळामध्ये उद्योगधंद्यामध्ये आर्थिक स्थिती सामान्य राहणार आहे. विरोधकांवर विजय प्राप्त होणार असून अनेक दिवसापासून मनात राहिलेली जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरीत केलेल्या कामांना योग्य मोबदला प्राप्त होणार आहे. या काळात वादापासून दूर राहणे आवश्यक असून मुलांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. आर्थिक आवक चांगली राहणार असून अनावश्यक खर्च टाळावा लागेल.

तूळ राशी- तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना लाभदायक ठरणार आहे. सूर्य मंगळ आणि शुक्र हे शुभ फळ देणार असून राज योगाचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. सोबतच नोकरीमध्ये आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडून येणार आहे. महिलांना सामाजिक चळवळीमध्ये यश प्राप्त होणार आहे.

या काळात उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहायला मिळणार आहे. धार्मिक आचरणात वाढ होणार असून अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार आहे. या काळात ग्रहदशा आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे मानसिक समाधाना सोबत आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवून मन शांत करून कामे करणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी ऑगस्ट महिना अतिशय लाभदायी ठरणार आहे. बुध गुरु आणि शनी हे शुभ फळ देणार असून आनंदा मध्ये वाढ करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येऊ शकतात. या काळात भौतिक सुखा बरोबर अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार आहे. विवाह इच्छुक तरुण-तरुणींचे विवाह जुळून येणार आहेत.

घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहणार असून मित्रांच्या गाठीभेटी होणार आहे उद्योग व्यापारामध्ये प्रगती ला नवीन सुरुवात होणार आहे. नोकरीमधे सुख प्राप्त होणार असून सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होईल. या काळात मानव व प्रसिद्धीचे योग जुडून येतील.

धनू राशी- धनु राशि साठी ऑगस्ट महिना थोडासा संघर्ष घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारात प्रगती समाधानकारक असली तरी नोकरी मध्ये अस्तिर निर्माण होणार आहे. भाऊ बंदुकी मध्ये वाद निर्माण होऊ शकतात आपल्या बोलण्यावरून दुसऱ्याचे मन दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक खर्चात वाढ होऊ शकते महत्त्वाची कामे लांबणीवर टाकलेली बरी. या काळात आत्मविश्वासाने कामे घ्यावे लागतील.

मकर राशी- मकर राशीसाठी ऑगस्ट महिना शुभ ठरणार असून मंगळ बुध आणि राहू हे जास्त यश देणारे आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. नोकरीत बढतीचे योग आहेत कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. उद्योग धंदा वाढवण्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागले तरी आर्थिक प्राप्ती लाभदायक आणि चांगली होणार आहे. व्यापारात थोडीशी मंदी जाणवणार असून मानसिक थकवा जाणवू शकतो. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी ऑगस्ट महिना अतिशय लाभदायक ठरणार आहे सूर्य बुध शुक्र आणि केतू ही अतिशय फलदायी ठरणार आहे. नोकरीत केलेल्या कामाचे कौतुक होईल आर्थिक लाभ चांगला होणार आहे. या काळात आर्थिक आवक चांगली वाढणार असून मित्रांच्या मदतीने सर्व अडचणींवर मात कराल.

आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एखादी महागडी वस्तू खरेदीचे योग आहेत. या काळात मनाला आंनदी आणि प्रसन्न करणाऱ्या अनेक घटना घडून येणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे.

मिन राशी- मिन राशीसाठी ऑगस्ट महिना काहीसा संघर्षमय सिद्ध होणार असून, आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या काळात वाईट लोकांची संगत सोडावी लागेल. उद्योग व्यापारामध्ये जास्त मेहेनत घेण्याची आवश्यकता आहे. मैत्रीमध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात. या काळात विचारपूर्वक कामे करणे आवश्यक असून आत्मविश्वासाच्या बळावर कामे करावी लागतील.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *