हृदयीस्पर्शी कथा- काय बरोबर आणि काय चूक.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

रमा एक घटस्पोटीत स्त्री आणि एका सुंदर मुलीची आई होती.जगात खूप आनंदी असणारी आपण आणि आपले काम आणि आपली लेक यातच आपले सुख मानणारी.तिने खूप सुंदर जग निर्माण केल होत.पण हे तिला असच मिळाला नव्हत.तिला समाजापुढे स्वतःला खूप सिद्ध कराव लागल होत.पण ते म्हणतात ना काळ सर्वकाही चांगल करत जातो परिस्थिती हळूहळू बदलत जाते.

तिची वाईट परिस्थिती दूर होत गेली आणि नवीन वाटा आणि नवीन स्वप्न घेऊन तिने जगण सुरू केल.रमा जशी आईकडे आली तशी पाठक काकूकडे महालक्ष्मी साठी जेवायला जात होती.खर तर नवरा नव्हताच पण त्याचा काहीही प्रश्न नव्हता.रमाला कधीकधी प्रश्न पडायचा की मी सुहासिनी की कुवारी पण मग नंतर रमा स्वतःला या दोघी कॅटेगरीमध्ये मानतच नव्हती.ती फक्त एका मुलीची आई म्हणून स्वतःला मानत होती.

सणवार सर्व उत्सव आनंदाने साजरी करणारी माऊली फक्त आपल्या लेकीच्या तोंडावरचे सुख पाहण्यासाठी जगत होती.महालक्ष्मी साठी अजून खूप वेळ होता पण कोण काय जाणे रमाने पाठक काकूंच्या महालक्ष्मीसाठी खूप सुंदर साड्या आणल्या.रमा खूप खुश होती कारण तिच आणि त्या महालक्ष्मीचा एक आंतरिक नात कळत नकळत झाल होत. वर्षातून एकदा येणाऱ्या या महालक्ष्मी कडे सर्व मागत होती आणि आता एकदा परत महालक्ष्मी परत येण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती.

मग त्या दिवशी अचानक एक फोन आला रमाचा नवरा ज्याने तिच्यासाठी आणि तिच्या मुली साठी काहीही केल नसल तरी घटस्फोट झाला. असूनही समाजाने त्याचे पद काढले नव्हते. असा हा अजूनही असलेला नवरा त्याचा मृ-त्यू झाला. ही बातमी ऐकल्यावर रमाच्या मनामध्ये कोणतीही दुखाची किंवा सुखाची भावना निर्माण झाली नाही. मात्र भूतकाळात मध्ये झालेल्या घटना डोळ्यासमोर येऊ लागल्या. कोण बरोबर कोण चूक रमा कोणतेही अनुमान लावत नव्हते.

मुलीने कधीही न पाहिलेल्या वडिलांना शांती मिळावी. म्हणून सर्व विधी केली. सगळ काही सुरळीत झाल नंतर खरतर काहीही संबंध आपला त्या माणसांसोबत नव्हता. पण थोड्यावेळ तरी सर्व विस्कळीत झालेल होत. नंतर हळू हळू गाडी पुन्हा रुळावर आली रमा पुन्हा नव्या सारखी वागू लागली. रमा परत एकदा महालक्ष्मी ची आतुरतेने वाट बघू लागली. तिला खुप काहि सांगायच होतं तिला, महालक्ष्मी सुरू झाली पण यावर्षी पाठक काकूंचा फोन काही आलाच नाही.

रमाला वाटल विसरले असतील पाठक काकू घाई गडबडी मध्ये तेव्हा रमा आपल्या सुंदर मुलीला घेऊन तिने आणलेल्या नवीन साड्या घेऊन पाठक काकूंच्या घरामध्ये गेली. रमाला अशी अचानक आलेली पाहून पाठक काकूंचा आणि त्यांच्या घरच्यांचा चेहरा पडला आणि त्या हासत रमाला म्हणाल्या अगं तुला फोन करायचा राहिलाच आता आली आहेस तर जेवून जा. मला काहीच कळत नव्हत की, हे सर्व का होत आहे. आपण इतक्या वर्षे महालक्ष्मीसाठी काकूकडे जेवायला येतो पण काकूच हे रूप मी कधीच पाहिल नव्हत.

तेव्हा रमा म्हणाली काकू मी महालक्ष्मीच्या ओट्या भरते तेव्हा काकू म्हणाल्या की, दे माझ्याकडे मी भरते. रमा काहीही बोलली नाही तिने त्या साड्या काकूकडे दिल्या तिला कळतच नव्हत की काय चाललय ते. तिच्या मुलीला हा प्रकार बिल्कुल चांगला वाटला नाही. ती सतत आपल्या आईला म्हणत होती आई चल तिकडून पण रमाला तिकडून अस निघून जाण ही चांगला वाटल नाही. खरं म्हणजे रमाला महालक्ष्मीला निरखून बघायच होत. तिला मन भरून बघायच होत पण ते सर्व मनातच राहिल.

पहिली पंगत झाली, दुसरी पंगत झाली आणि शेवटच्या पंगतीला रमा आणि तिच्या मुलीला जेवणाला बसवल. जेवण झाल पण रमाचं मन अस्वस्थ होत. सर्व पाहुणे घरातून निघायला लागले काकू हळदीकुंकू घेऊन आलाय त्यांनी सर्वांना हळदी, कुंकू लावल. सर्वांची ओटी भरली मात्र रमा ची ओटी भरली नाही आणि कुंकू ही लावल नाही आणि त्याच क्षणाला रमाला सर्व प्रकार लक्षात आला तिला खूप रडावंस वाटल. पण तिने काहीही केल नाही आणि तिथून निघायला लागली.

बरेच प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होते. ज्या माणसाने आपल्यासाठी कधीही काहीच केल नाही. आपल्या पिल्लांसाठी हि कधीच काही केल नाही. त्या माणसाच्या जाण्याचा आपले जीवनावर आणि अस्तित्वावर एवढा परिणाम व्हावा काहीच समजत नव्हत. रमा कोणालाही दोष देत नव्हती. मात्र प्रश्न तिच्या मनाला सोडत नव्हते तिने महालक्ष्मीची माफी मागितली आणि म्हणाली पुढच्या वर्षी तुझ्या दर्शनाला मी येऊ शकत नाही. कारण मला माझी ओळख खूप महत्त्वाची आहे आणि तू माझ्या मनात कायम लक्षात राहणार आहे.

माझ्या मनाचा भेद हा या सर्व माणसांच्या परंपरा व त्यांना तोडणारा नाही. आई तु माणसांना चांगले वागवणारी आहेस पण जेथे मान-सन्मान नाही तेथे मी जाऊ शकत नाही. तुझी साडी मी तुला देऊ शकत नाही. मात्र मला पुढच्या वर्षापर्यंत ज्याही स्त्रिया मिळतील मग ती घटस्पोटीत असो सुवासिनी असो की कोणीही मी त्यांची ओटी भरिन. त्यात स्त्रियांनी ती साडी नेसली की मला तुझा भास होईल आणि खूप समाधानी वाटेल.

आई मी जग बदलू शकत नाही, पण मी माझ्या स्वतःमध्ये बदल करेन आणि कोणाचाही मानसन्मान न दुखावता मी एका स्त्रीचे मन जपेल. त्या स्त्रीला सन्मान आणि आनंद मिळावा अशीच काम करेल. आई तु या सर्वांमध्ये माझ्यासोबत असणारच आहे असे म्हणत रमाने डोळे पुसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *