अंगारकी संकष्ट चतुर्थी, पैसा, सुख,प्रेम देणारा संकटे समस्या दूर करणारा उपाय.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज अंगारकी चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी म्हणजे चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते.प्रत्येक व्यक्ती शक्यतो बाकीच्या चतुर्थीचे व्रत करतात पण काही व्यक्ती फक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात.हा संयोग वर्षातून एकदा किंवा दोन वेळा येतो. गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता मानले जाते तसेच समृद्धी सोबतच आनंद प्रदान करणारे देवता म्हणून त्यांचे विशेष पूजन केले जाते.

आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेच्या आधी गणपती बाप्पांना आधी पूजन केले जाते. म्हणजेच कोणत्याही शुभ कार्यामध्ये आधी गणपती बाप्पांचे पूजन केले जाते. व त्यानंतरच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाचे विधिवत पूजन करून व्रत केल्यास आपल्याला २१ चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते. देवांचे देव हे महादेव आहेत आणि गणपती बाप्पा हे त्यांचे पुत्र आहे.

म्हणून आपण जर मनोभावनेने आणि मोकळ्या मनाने त्यांचे पूजन केले तर ते लवकर प्रसन्न होतात. आणि त्यांच्या आशिर्वादामुळे आपले जीवन सुखी व संपन्न होते. गणपती बाप्पांचे चतुर्थीच्या दिवशी मनाने पूजन केल्यास सगळे संकटे दुःख आणि पापातून आपली सुटका होते. तसेच उत्तम आरोग्य पैसा वैभव याची आपल्याला प्राप्त होते. या दिवशी काही खास उपाय करून आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून आपले पाप आणि दुःखापासून मुक्ती मिळू शकतो.

गणपती बाप्पांच्या प्रसन्न होण्यासाठी आपण जे काही उपाय करतो. ते लवकरात लवकर फळ देणारे उपाय असतात तर जाणून घेऊया कोणते उपाय आपण चतुर्थीच्या दिवशी करू शकता. चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गणपती बाप्पा चे पूजन नक्की करावे व तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या दिवशी व्रत सुद्धा करावा. गणपती बाप्पांची पूजा करताना राईच्या तेलामध्ये अष्टगंध म्हणजे शेंदूर मिसळून गणपती बाप्पांना त्याचा टिळा लावावा.

त्यानंतर बाप्पासमोर दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर त्यांना झेंडूची फुले वाहून गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. या उपायाने आपली घडलेली सर्व कामे कोणत्याही अडथळ्या शिवाय पूर्ण होऊ लागतात. सौभाग्याची प्राप्ती करायची असेल तर मातीच्या भांड्यात अख्खी हिरवे मूग टाकून ते कोणत्याही मंदिरामध्ये दान करायचे. ह्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख सौभाग्यास वृद्धी होते.

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केळीच्या पानावर कुंकवाच्या मदतीने एक त्रिकोण बनवावा व ते पान बाप्पांच्या समोर घेऊन बाप्पा च्या समोर येणाऱ्या त्रिकोणावर एक दिवा लावावा. आणि त्रिकोणाच्या मध्यभागी थोडी मसुराची डाळ आणि लाल मिरच्या ठेवाव्या. आणि बाप्पाचे पूजन करावे. या उपायाने गणपतीबाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना ची पूर्तता होते.

आपल्याला जर उज्वल भविष्य मिळवण्याची इच्छा असेल तर गणपती बाप्पा समोर कापूर लावून १०८ वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. कडू लिंबाच्या झाडाच्या मुळापासून तयार झालेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हस्ते पिशाच स्वाहा या मंत्राचा जप करावा. व त्यानंतर गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले व लाल चंदन अर्पण करावे. या उपायांमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदू लागते.

आपल्याला फ्रेश आणि उत्साही वाटावे यासाठी गणपती बाप्पांची प्रार्थना करून १०८ वेळा ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा. आणि पूजनानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाचे लाल रंगाचे फूल अर्पण करावे. ओम गण गणपतेय विघ्न विनाशाय स्वाहा या मंत्राचा कमीत कमी २१ वेळा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व बाधा निघून जातात. व्यवसायात प्रगती करायची असेल तर बुध मंत्र ओम ब्राम ब्रिम बम स्वाहा बुधाय नमः हा मंत्र २१ वेळा जपावा.

यामुळे आपल्या व्यवसायात प्रगती होते. काही विशेष मनोकामना यांच्या पूर्ततेसाठी गणपती बाप्पांचे विधीवत पूजन करून त्यांना सिंदूर अर्पण करावे आणि गोड नैवेद्य दाखवावा. जर आपण कोणते तरी महत्त्वाचे काम हाती घेतलेले असेल पण त्या कामांमध्ये नेहमी अडथळे अपयश आणि काही न काही बाधा उत्पन्न होत असतील तर आपल्याला कुमारिकेचा आशिर्वाद मिळवण्याची आवश्यकता आहे.

यासाठी चतुर्थीच्या दिवशी कुमारिकेचे पूजन करून तिला काहीतरी भेटवस्तू द्यावी. आपल्याला आपल्या कामामध्ये नक्की यश मिळेल मित्रांनो हे काही उपाय आहेत जे आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचे आहे. हे उपाय करून आपण आपले जीवन सुखी समृद्धी व आनंदित करू शकतो.

टीप : वर दिलेली माहिती सामा जिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधा रावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसर वण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या मुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *