देवघरात ही चूक कधीही करू नये.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण जिकडे राहतो तेथे थोडीसी तरी जागा भगवंताची असते आपण तेथे देवघराची स्थापना करतो. देवघरातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते ही सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त आपल्याला मिळावी. यासाठी आपल्या देवघरात या सहा वस्तू अजिबात असू नये. या वस्तूंचे आपल्या जीवनावर अनिष्ट परिणाम होतात. तुमच्या ही देवघरात या वस्तू असतील तर त्यांना लगेचच बाजूला करा. म्हणजे तुमचे देवघर खरखर प्रसन्न आहे.

देवघरातील फोटो फाटलेले, काचेला तडा गेलेले मूर्ती खंडित किंवा हलणारी नसावी. अश्या फोटो व मूर्त्यांमुळ आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. म्हणून अशे फोटो व मूर्ती आपल्या देवघरात असतील तर तर तुरंत बदलऊन घ्यावे. देवघरात रिकाम्या बिनकामच्या वस्तू अजिबात ठेवू नये ज्या वस्तूंची गरज नाही त्या वस्तू लगेच टाकून घ्याव्या. काही लोकांना सवय असते की, ते कोणत्याही तिर्थस्तानी गेले की ते येथून देवाची फोटो आणून देवघरात ठेवतात.

यामुळे देवीदेवतांची संख्या वाढत जाते सोबतच काही देवीदेवतांची पूजेची पध्दत आपल्याला माहीत नसते. मग त्याचे अयोग्य पूजन झाल्याने त्याचे अयोग्य परिणामच आपल्याला मिळतात. म्हणून सर्वात आधी कोठेही गेल्यावर तिकडून देवांच्या मूर्ती व फोटो आणण्याची सवय आधी बदलावी. देवघरातील मूर्ती ह्या आपल्या अंगठ्या पेक्षा जास्त उंचीच्या नसाव्या म्हणजे ३ फुटापेक्षा जास्त उंच नसाव्या. जर उंच मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पंच पूजा होणे आवश्यक आहे.

त्यात चंदन,धूप,नैवेद्य असणे आवश्यक आहे. जर असे पूजन आपल्याने रोज करणे शक्य असेल तरच या मुर्त्या देवघरात ठेवाव्यात. जर देवघरात जास्त मुर्त्या झाल्या तर आपल्याला देवपूजेलाही जास्त वेळ लागतो. आणि आजच्या काळात देवांना देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. म्हणून देवघर साधे आणि सरळ असावे. देवघर कधीही स्वछ असावे त्यात जाळे,धूळ,माती कधीही लागू देऊ नये. देवघराची वेळोवेळी स्वच्छता करावी.

काही घरामध्ये देवघराची महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा स्वछता केली जाते तोपर्यंत देवघर धूळ आणि मातीने भरून जाते. अश्या देवघरातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा कधीही मिळत नाही. म्हणून देवघर स्वच्छ करत राहावे. देवाला वाहिलेली फुल व निर्माल्य लगेचच दुसऱ्या दिवशी विसर्जित करावी. काही घरामध्ये हे निर्माल्य एक पिशवीमध्ये जमा करून देवघराच्या ड्रॉवर मध्ये जमा केले जातात आणि खूप जमा झाल्यावर त्याचे विसर्जन केले जाते, परंतु एकदा फुल वाळले की त्यांच्यातून लगेच नकारात्मक ऊर्जा पसरायला लागते म्हणून लगेचच त्यांचे विसर्जन करावे.

देवघरात लावला जाणारा दिवा राज घासून पुसून स्वच्छ करावा. देवघर स्वछ आणि पवित्र ठेवावे तरच त्यातून भगवंताची दिव्य शक्ती आपल्याला प्राप्त होते. काही घरामध्ये देवाला रोज नैवेद्य दाखवला जातो तर काही घरामध्ये फक्त सणाच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो. भंगवंतांना नैवेद्य दाखवणे खूप चांगले असते यामुळे आपल्या घरात अन्नाची कधीच कमतरता जाणवत नाही.

परंतु आपण जो नैवेद्य दाखवतो तो थोड्यावेळाने उचलून घ्यावा आणि आपल्या घरातील लोकांना प्रसाद म्हणून द्यावा. कारण तो नैवेद्द जर आपण तसाच पडू देऊ राहिला तर त्यावर डास आणि मुंग्या होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक पुढच्या पसरते काही ठिकाणी तर घरात देवघरामध्ये नैवेद्य दाखवल्यानंतर ते विसरून जातात आणि मग दोन तीन दिवसानंतर त्यांना आठवण येते आणि ते मग तेव्हा उचलतात.

तोपर्यंत तो नैवेद्य खराब होतो किडे मुंग्या त्या नैवेद्यावर फिरतात आणि अस्वच्छ करतात. त्यामुळे तो नैवेद्य आपल्या घरातील कोणाला खाताही येत नाही आणि त्या नैवेद्याची अवहेलना होते आणि आपल्यावर देव अवकृपा करतात. त्यामुळे देवघरातील नैवेद्य आठवणीने सूर्यास्तापूर्वी उचलून घ्यावा आणि घरातील सर्व कुटुंबियांनी प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा. आज-काल देवघर सजवण्याची फार पद्धत आहे.

यामध्ये आपण काही नैसर्गिक वस्तूंचा वापर करतो तर काही कृत्रिम. देवघर फुले दिवे सुगंधाची साथ नेत्याने सजवले जाते. तर काही ठिकाणी डेकोरेशन बल्ब लायटिंग आणि कुत्री फुले यांनी देवकर सजवले जाते. देवघर या सर्व वस्तूंनी सजवणे काहीही चुकीचे नाही पण काही ठिकाणी देवघर आणि देवघरातील मूर्ती हे खूप सुंदर दिसावी म्हणून लाइटिंग ची माळ जी असते देवघराच्या देवावरील मूर्तींवर सोडलेली असते.

त्यामुळे देवाची सकारात्मक ऊर्जा थांबते आणि आपल्या घरामध्ये वाद विवाद आणि नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात पसरते. लक्षात ठेवा तुम्ही देवघर कशाप्रकारे सजवू शकतात पण देवाच्या अंगावर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक लाइटिंग टाकू नये. विचार करा तुम्ही देवघरामध्ये दिवा लावलेला आहे सर्वीकडे धूप चा सुगंध दरवळत आहे. पण तेथेच देवाच्या अंगावर लायटिंग सोडलेली आहे तर ते देवघर चांगले वाटणार नाही.

पण त्याच जागेवर देवघरामध्ये स्वच्छ दिवा लावलेला आहे. धुपाचा सुगंध दरवळत आहे तर असं घर कोणालाही चांगल वस्तूंचं वाटतं शक्य असेल तर देवघरासमोर छोटीशी रांगोळी काढावी. अशाप्रकारे आपण आपले देवकर प्रसन्न करू शकतो आणि यातूनच आपल्याला सुख आणि सकारात्मक ऊर्जा लाभू शकते. तर आता ही झाली देवघरामध्ये काय असू नयेत याबद्दल माहिती आता मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगतो जी देवघरामध्ये असली पाहिजे.

त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागतात. त्यासाठी तुम्हाला एक काचेची बाटली घ्यायची आहे परंतु या बाटलीचे झाकण प्लास्टिकचे नसावे आपण कोणत्याही अन्य धातू चे झाकण देऊ शकतात आणि त्या बाटलीमध्ये कापूर टाकावा लक्षात ठेवा कापूर कोणताही केमिकल वाला नसावा. आपण जो मार्केटमध्ये जाऊन कापूर विकत घेतो तो केमिकल वाला कापूर असतो.

परंतु दुकानांमध्ये जाऊन विना केमिकल कापूर ची मागणी करावी. हा कापूर थोडा महाग असतो तर असा कापूर आणून तो काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवावा आणि ती बाटली आपल्या देवघरामध्ये राहू द्यायची यामुळे आपल्यावर आपल्या देवी-देवतांची कृपा होते आणि आपली जी कामे अडून राहिलेली आहेत ती लवकर मार्गी लागतात. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि घर सुख समृद्धी अन्नधान्य आणि समाधानाने भरून जाते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *