गुरु पौर्णिमेच्या दिवशी करा राशीनुसार हा जप मिळेल अमाप लाभ, संपत्ती ,पैसा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

या वर्षी २३ जुलै रोजी शुक्रवारी गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना आई वडीला एवढेच किंवा त्यांच्या पेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांचे पूजन केले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये ही गुरुपौर्णिमेला खूप महत्व प्राप्त आहे. काही लोकांच्या कुंडलीमध्ये जर दोष असेल किंवा नसला तरीही काही कारणामुळे आपल्या जीवनात समस्या येत असतील तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करून आपण त्या समस्यांपासून सुटका मिळवू शकतो.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार दान आणि काही चमत्कारी मंत्रांचा उच्चार केल्याने आपल्यावरील समस्या टळतात. आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते दान करावे आणि कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या चमत्कारी मंत्राचा उच्चार करावा म्हणजे त्याचे फळ त्यांना योग्यरीत्या प्राप्त होईल.

मेष- मेष राशीच्या लोकांनी या दिवशी ओम अव्येयाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच गरीब व गरजू व्यक्तींना लाल रंगाचे वस्त्र दान करावे.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या व्यक्तींनी गुरु कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी ओम जीवाय नमः या मंत्राचा जप करावा. आणि पांढऱ्या रंगाच्या वस्त्राचे दान करावे.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओम भिवराय नमः या मंत्राचा जप करावा. आणि आपल्या गुरूंना किंवा गुरू स्वरूप समजून एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला हिरवे वस्त्र दान करावे.

कर्क राशी- कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी ओम वरिष्ठ आय नमः या मंत्राचा जप करावा आणि सुख-समृद्धी आणि आनंदासाठी बादामी कलर म्हणजे क्रिम रंगाची कापड दान करावे.

सिंह राशी- सिंह राशीच्या लोकांनी सुख समृद्धी व आनंदासाठी गुलाबी रंगाची वस्त्रे दान करावी व ओम स्वर्णकायाय नमः या मंत्राचा जप करावा.

कन्या राशी- कन्या राशीच्या व्यक्तींनी या दिवशी ओम हरेंय नमः या मंत्राचा जाप करून, हिरव्या रंगाचे कापड किंवा वस्त्रे गरजूंना वाटावी.

तूळ- तूळ राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओम विवित्तताय नमः या मंत्राचा जप करून, खादीचे कपडे कुणालातरी भेट म्हणून द्यावे. यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओम जीव नमः या मंत्राचा जाप करून एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला धोतर दान करू शकतात तुम्ही ते धोतर रेडिमेट सुद्धा आणू शकता.

धनू राशी- धनू राशीच्या व्यक्तींनी या दिवशी ओम जेत्रे नमः या मंत्राचा जप करावा. आणि एखाद्या व्यक्तीला थोडेसे सोने भेट म्हणून द्यावे यामुळे तुमच्या जीवनात अगदी त्या सोन्यासारखे उजळून निघेल.

मकर राशी- मकर राशीच्या लोकांनी या दिवशी ओम गुणेंय नमः या मंत्राचा जप करावा. आणि पंच धातू तसेच वस्त्रांचे दान करावे. या तुम्ही पंचधातूंची अंगठी ही दान करू शकतात सोबतच तुम्हाला वस्त्रे जी शक्य होतील ती देऊ शकतात.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओम धीवराय नमः या मंत्राचा जप करावा आणि लोकरीच्या वस्तूचे दान करावे स्वेटर मफलर किंवा टोपी यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तींना देऊ शकतात.

मिन राशी- मीन राशीच्या व्यक्तींनी ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी ओम धीवराय नमः या मंत्राचा जप करावा आणि निळ्या रंगाची वस्त्रे गरजूंना किंवा गरिबाला दान करावी.
तर मित्रांनो आता तुम्हाला लक्षात आलेच असेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि कोणते वस्त्र दान करावे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *