७ रोपे जी तुमच्या घरासाठी आहेत शुभ. या झाडांमुळे होतात हे अनेक फायदे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्या घरामध्ये ही झाडे लावली जातात त्या घरामध्ये नेहमी सुख समाधान तसेच आनंद असतो. तसे तर झाडे सर्वच लोक लावतात आणि झाडे अध्यात्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या लावलेच पाहिजे, कारण झाडांमुळे ऑक्सिजनची निर्मिती होऊन वातावरण हे शुद्ध होते. झाडे लावणे हे चांगले काम आहे आणि ते लावलेच पाहिजे परंतु काही झाड असे आहेत जे आपल्यासाठी खूप शुभ आहेत.

ज्यामुळे तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा होईल आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही चला तर बघूया ती कोणती झाडे आणि रोपे आहेत जी आपल्या घरी असायलाच हवीत. तुळस ही प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये जर तुळशीचे झाड असेल तर तुमच्या घरांमध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही.

कारण नकारात्मक ऊर्जा तुळस तेथेच नष्ट करते. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. कारण तुळस हे स्वतः वृंदा चे रूप आहे. म्हणून तुळशीला नारायण प्रिया असे ही म्हटले जाते. ज्या घरात तुळस असते त्या घरांमध्ये कोणतीही कमतरता भासत नाही. तुळशीला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात तुळस असेल त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.

पुढचे झाड म्हणजे कढीपत्त्याचे झाड जर कढीपत्त्याचे झाड तुम्ही घरात लावले तर त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात कढीपत्त्याचे झाड लावल्याने शनी राहू आणि केतू हे तीनही ग्रह शांत राहतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन तुम्हाला शांतता आणि सफलता लाभेल.

तिसरे झाड म्हणजे आवळा- जर तुम्ही आवळ्याचे झाड आपल्या घरा शेजारी लावले तर देवी लक्ष्मी तुमच्या घरी कायम रित्या वास्तव्य करेल. तुम्हाला हे माहितीच असेल की आवळ्याच्या वृक्षांमध्ये स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि जिथे विष्णूंचा वास असेल तेथे लक्ष्मी तर राहणारच म्हणून आवळ्याचे झाड आपल्या घरांमध्ये असायलाच हवे. याला आपण जमिनीवर किंवा कुंडीतही लावू शकतो.

पुढील झाड म्हणजे पांढऱ्या रुईचे झाड किंवा पांढऱ्या मंदार चे झाड- हे झाड कोठेही मिळू शकते हे जाड तुम्ही कुंडीवर किंवा जमिनीवर कुठेही लावू शकता. परंतु शक्यतो हे झाड तुम्ही जमिनीवरच लावायचा प्रयत्न करावा कारण ११ वर्षानंतर या झाडाच्या मुळांना मध्ये स्वतः भगवान श्री गणेश वास करतात. आणि या झाडांचा आकार गणपती बाप्पा सारखा होतो.

पांढरी मंदार ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेली असून याची फुले गणपती बाप्पांना महादेवाला आणि विष्णूंना वाहली जातात. हे झाड लावले तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्यावर सूर्य देवाचा प्रभाव पडतो. आणि यामुळे आपला समाजातही मानसन्मान वाढतो.

पुढील झाड म्हणजे पारिजातक- पारिजातक हे अत्यंत दुर्लभ झाड आहे याची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे. समुद्रमंथनातून जो आठवा अजूबा बाहेर आला त्याला पारिजातक म्हणतात. या झाडाला फक्त स्पर्श करतात आपल्या अंगातील सर्व थकवा निघून जातो. पारिजातकाचे झाड सर्व देवी-देवतांना ही प्रिय आहे हे झाड स्वर्गतही लावलेले आहे. त्यांच्या घरामध्ये पारिजातकाचा झाड असेल त्यांच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्‍ती प्रवेश करू शकणार नाही.

पारिजातकाची फुले खूपच नाजूक आणि सुगंधी असतात सर्व देवी-देवतांना पारिजातकाची ही फुले वाहिली जातात. पारिजातका मुळे सर्व रोग नाहीसे होतात जर कोणत्या कुलदेवतेचा प्रकोप आपल्याला लागलेला असेल तर तो प्रकोप पारिजातका मुळे नष्ट होतो.

पुढील झाड म्हणजे नारळाचे झाड- जर आपल्या घरासमोर अंगण असेल तर आपल्या त्या अंगणामध्ये आपण नारळाचे झाड अवश्य लावावे. अंगण नसेल तर आपण कुंडी मध्येही ते झाड लावू शकतो फ्लॅटच्या गॅलरीमध्ये आपण कुंडीत ठेवून हे झाड लावू शकतो. हे खूपच शुभ झाड आहे नारळाच्या झाडामुळे आपला मान सन्मान वाढतो.

जर घरात कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल तर घरात कोणतेही प्रकारच्या वेली तुम्ही लावू शकतात. मात्र कोणत्याही झाडाची वेल ही घराची भिंत ओलांडून वरती जाऊ नये हे लक्षात ठेवावे. अशोकाचे झाड जर आपल्या घरातील मुले अभ्यास करत नसतील किंवा हुशार नसतील किंवा अभ्यासामध्ये मागे पडलेले असतील. तर अशोकाचे झाड आपण आपल्या घरात नक्की लावावे. ज्या झाडामुळे मुले अभ्यास करायला लागतात आणि हुशार होतात.

झेंडू चे झाड- झेंडू चे झाड हे आपल्या घरामध्ये अवश्य लावावे. या झाडामुळे आपले गुरुबळ वाढते आणि आयुष्य अगदी सुंदर होते. ज्या झाडामुळे अपत्यप्राप्ती होते. अशा प्रकारची ही झाडे आपण घरात कुंडीत किंवा घराच्या आसपास लावू शकतात.

झाडे लावताना घराच्या उत्तरेकडे ईशान्येकडे किंवा पूर्वेकडे लावावी नाहीतर तुम्हाला त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही. आपण या झाडांना भगवंत स्वरूप लावतो. पण त्याचे तसे पवित्र मानाने संगोपनही झाले पाहिजे. त्या झाडाला रोज पाणी टाकून त्याची शुद्ध मनाने पूजा सुद्धा केली पाहिजे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *