जर मांजर आडवी गेली तर काय होते खरच मांजर आडवे जाणे अपशकून असतं का?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या देशात शगुन अपशगुन श्रद्धा अंधश्रद्धा खूप मानले जाते. ही पद्धत आपल्याकडे शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. काही लोक या गोष्टीकडे श्रद्धेने बघतात तर काही लोक या गोष्टीकडे अंधश्रद्धेने बघता. परंतु पूर्वीपासून ही पद्धत चालत आलेली असल्याने आपल्याही मनात याबद्दल थोडी भीती आणि थोडी उत्सुकता जरूर असते. आपल्याला जाणून घ्यायच ते की हे खरे आहे का. तर आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत मांजरा विषयी असे म्हटले जाते की आपण काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडले.

आपल्याला आपल्या मार्गातून मांजर आडवी जाताना दिसली तर तो खूप मोठा अपशगुण असतो. आपले ते कार्य पूर्ण होत नाही आणि एखादी अशोक घटनाही घडू शकते. पण हे खरे असते का अस म्हणतात की जर आपण काही महत्त्वाच्या कामासाठी जात असताना आपल्या मार्गातून मांजर आडवी गेली की पाच पावले मागे सरकावे, मग आपल्या कामासाठी जावे. किंवा खूपच महत्वाचे काम असेल तर थोड्यावेळ एखाद्या झाडाखाली किंवा हॉटेलमध्ये थांबून पाणी प्यावे.

मग पुढे जावे तरच आपले ते कार्य पूर्ण होते नाहीतर, आपल्याला त्यामध्ये अपयश येते असे मानले जाते की, एखाद्या वेळेस आपण बाहेर जात असताना मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपल्याला प्रवासामध्ये एखादी दुखापत होऊ शकते. एखादी वाईट घटना आपल्यासोबत होऊ शकते याचा अर्थ असा नाही की मांजर अशुभ असते याचा अर्थ असा आहे की एखादी पुढे होणारा घटनेचा पूर्वभास मांजरीला आधीच होऊन गेलेला असतो.

म्हणून त्या संकटाची कल्पना आपल्याला देण्यासाठी मांजर आपल्या मार्गातून आडवी जाते. म्हणून खाता आपल्याकडून मांजर आडवी गेली तर आपण आपल्या मनाची तयारी करून ठेवावी की आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे. प्रत्येक वेळी मांजरीचा आपल्या समोरून रस्ता ओलांडणे हे अशुभ मानले जाते असे नाही. कारण की मांजरीचे शुभ अशुभ हे ते आपल्या कोणत्या बाजूने रस्ता ओलांडून गेली आहे यावरती मानले जाते.

जर मांजर आपल्या डाव्या बाजूकडे रस्ता ओलांडून गेलेली आहे तर ते शुभ असते आणि ती जर उजव्या बाजूकडे रस्ता ओलांडून गेलेली असेल तर ते अशुभ असते. म्हणूनच मांजरीने जर आपल्या उजव्या बाजूस कडून रस्ता ओलांडला असेल तर थोडा वेळ थांबावे मगच पुढे जावे. असेही मानले जाते की एखाद्या वेळेस मांजर जर आपल्या घरातील दूध घेऊन निघून गेली तर हे आपल्या संपत्तीचे नुकसान मानले जाते.

मांजरीचे आपल्या घरात दुध पिऊन जाणे हे अत्यंत अशुभ मानले जाते कारण दुध हे समृद्धीचे प्रतीक आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या संपत्तीचा नाश होऊ शकतो. त्यासोबतच जर दोन मांजरी आपल्या घरात येऊन भांडत असतील किंवा रडत असतील. तर हे सुद्धा खूप अशुभ मानले जाते कारण असे केल्याने आपल्याही घरामध्ये कटकटी किंवा वाद-विवाद होऊ शकतात.

तसेच मांजर आपल्या घरात येऊन रडणे हे एखाद्या वाईट घटनेचे संकेत आहे. एखाद्या व्यक्तीच्या झोप येत असतांना त्याच्या अंगावर मांजर येऊन पडणे हे याचे संकेत आहेत की, ती व्यक्ती एखाद्या रोगाने पीडित असू शकते. तर मित्रांनो शास्त्रामध्ये मांजरी विषयी हे काही शकुन-अपशकुन आहेत. काही लोक याच्याकडे श्रद्धेने पाहतात तर काही लोक त्याच्याकडे अंधश्रद्धेने पाहतात. पण शास्त्रानुसार आहे तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *