फिक्स डिपॉझिट संबंधात या नियमात झाला मोठा बदल….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट असा पर्याय यासाठी निवडला जातो कारण की बँकेत पैसा चांगल्याप्रकारे पडून आहे, त्या पैशांची चांगल्याप्रकारे गुंतवणूक व बचत व्हावी. आणि बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळावा. तर मग तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बँक मध्ये सरकारी बँक असेल किंवा खाजगी किंवा व्यक्ती व्यवहारिक बँक असेल त्यामध्ये फिक्स डिपॉझिट केलेला असेल किंवा तुम्हाला फिक्स डिपॉझिट करायचं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे.

कारण की मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिक्स डिपॉझिट संदर्भात एका नियमांमध्ये अतिशय मोठा बदल केलेला आहे. आणि तो देशातील सर्व प्रकारच्या बँकांना लागू केलेला आहे. आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा ग्राहकांवर पडणार आहे. तर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन टेप मध्ये २ जुलै २०२१ रोजी आरबीआयने एक नोटीफिकेशन प्रकाशित केलेला आहे.

हे नोटिफिकेशन सर्व प्रकारच्या बँकांना देण्यात आलेला आहे. ह्या नोटिफिकेशन नसाल तर तुम्ही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केलेले असेल आणि तुमच्या फिक्स डिपॉझिट ची मुदत म्हणजेच मॅच्युरिटी ची तारीख पूर्ण झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही ती रक्कम परत घेतलेली नसेल किंवा त्या रक्कमेवर आपला दावा केलेला नसेल.

नवीन नोटिफिकेशन नुसार म्हणजे तुम्ही त्या पैशांवर ती क्लेम केला नाही किंवा त्या पैशांवर अति आपला दावा केला नाही. तर बचत खात्यांमधील व्याजदर किंवा मुदत ठेवीच्या परिपक्वतेवर जो व्याजदर ठरलेला आहे. त्यातील तो सर्वात कमी व्याजदर आहे तो मिळणार आहे.

म्हणजेच मित्रांनो ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. म्हणून मुदत ठेवीची तारीख संपल्यानंतर त्या पैशांवर आपला दावा करा किंवा ती रक्कम रिन्यू करा. म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, जी लोक ऑनलाईन पद्धतीने FD करतात त्यांना रिन्यूवल चा ऑप्शन विचारला जातो.

तर तेव्हा त्यांनी रिन्यूवल पर्याय स्वीकारल्यावर त्यांना चिंता करण्याची काहीही गरज नाही. कारण त्यांची मुदत ठेवीची तारीख पूर्ण झाल्यावर त्यांची रक्कम पुन्हा रिन्यू होणार आहे. तर अशाप्रकारे मित्रांनो फिक्स डिपॉझिट संबंधीची रिझर्व बँक ऑफ इंडियाची महत्वाची अपडेट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *