२३ जुलै गुरुपौर्णिमेला घरीच स्वामींना आपले गुरु कसे करावे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला माहितीच असेल २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. स्वामी भक्तांसाठी व स्वामी सेविकांसाठी हा खूप खास दिवस आहे. या दिवशी स्वामींची भक्त पूजा करतात. व काही लोक स्वामींचे गुरुपद घेतात. त्यामुळे आता प्रश्न पडतो की, मठ बंद आहेत, केंद्र बंद आहेत. तर त्यामुळे बरेच स्वामीभक्तांना प्रश्न पडतो की स्वामींचे गुरुपद कसे घ्यावे.

पण काहींना माहीत नसते की फक्त घरी राहून सुद्धा स्वामींचे गुरुपद घेता येऊ शकते. स्वामींचे गुरुपद घेण्यासाठी एक विधी असते आणि आता आम्ही या लेखांमध्ये तीच विधी तुम्हाला सांगणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही विधी करू शकतात. तर तुम्ही सकाळी १२ वाजेच्या आत ही विधी कधीही करू शकता.

तुम्ही सकाळी ७ वाजता देवपूजा करत असाल तर ७ वाजता पासून बारा वाजता पर्यंत तुम्ही स्वामींचे गुरुपद घेऊ शकतात. मित्रांनो स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो तुमच्या घरात असेल तर सर्वात आधी मूर्तीचा दुधाने अभिषेक करावे आणि फोटो असेल तर थोड पाणी टाकून त्या फोटोला स्वच्छ करावे.

हे सर्व झाल्यानंतर एक पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावर लाल किंवा सफेद रंगाचा कापड टाकावा. आणि त्या पाठावर स्वामींचा अभिषेक झालेली मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि विधिवत अष्टगंध, फुल पाहून त्या मूर्तीचे पूजन करावे. अगरबत्ती आणि दिवा लावावा. आणि नंतर १६ वेळेस श्री सुक्त वाचावे हे आपण मराठी मध्ये वाचू शकतो. हे पुरुसूक्त आणि श्रीसूक्त हे आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये मध्ये दिलेले आहे.

वाचून झाल्यावर स्वामींना आवाहन करायचे की, हे स्वामी महाराज आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला आम्ही घरूनच आवाहन करत आहोत. आज पासून तुम्ही आमचे गुरू माता पिता सर्वस्व आहेत. आजपासून पुढील गुरु पौर्णिमेपर्यंत तुमचे गुरु पद स्वीकारून तुमच्यासाठी जास्त सेवा होण्यासाठी आम्हाला आमच्या आरोग्याचे संरक्षण तुम्ही करावे. एवढे बोलल्यानंतर तुम्ही एक किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करावा.

आणि त्यानंतर तुम्हाला जमत असेल तर स्वामी चरित्र,पारायण त्या दिवशी तुम्ही संपूर्ण वाचावे. आणि अभिषेक केलेले चे तीर्थ असेल ते सर्वांनी थोडे थोडे प्यायला द्यावे. आणि आपण ही विधी चालू होण्यापूर्वीच नैवेद्य करून ठेवावा भाजी चपाती वरण-भात काहीही असेल ते सोबतच काही तरी गोड पदार्थ सुद्धा आपण ठेवावे.

शिरा, खीर, दूध साखर किंवा बाहेरून आणलेल्या पदार्थही तुम्ही ठेवू शकता. आणि हा नैवेद्य तुम्हाला स्वामींची मूर्ती जेव्हा तुम्ही पाटावर ठेवणार तेव्हाच दाखवायचा आहे. आणि घरातल्या सर्वांनी तो नैवेद्य थोडा थोडा खाल्ला विधी झाल्यानंतर तरी चालतो. तर अशा रीतीने तुम्ही स्वामींचे गुरुपद घेऊ शकतात स्वामींना गुरु करू शकता. किंवा तुम्ही स्वामींना मनात आपले गुरु मानून रोजच्याप्रमाणे सेवा केली तरी चालते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *