सैराट चित्रपटातील तानाजी वर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री फिदा त्याच्यासाठी सर्व काही करू शकते, नाव ऐकून थक्क व्हाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो रंगभूमी ही कलाकारांसाठी खूप अनमोल असते, आजवर काही कलाकार असे होऊन गेलेत ज्यांच्यासाठी ही रंगभूमी खूपच महत्वाची होती. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य अभिनयासाठी अर्पण केले. या चित्रपटसृष्टीत नेहमीच नवे कलाकार येत राहतात, कोणी यातून आपला मार्ग बाजूला करतात तर कोणी आपला मार्ग बनवतात. या क्षेत्रात आपली सहनशीलता, चिकाटी, मेहनत फार महत्वाची असते.

पहिल्याच प्रयत्नात यश हाती लागेल असे नाही, त्यासाठी कधी कधी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे आपल्याला शिखर दिसते. काही वेळा कलाकार रसिकांच्यात लगेच मिसळून जातो आणि चर्चेचा विषय बनतो. त्यामुळे त्या कलाकाराला ओळख निर्माण करण्यास जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.

हल्ली चित्रपट सृष्टीत तानाजी हे नाव देखील प्रसिद्धी च्या जोमात आहे, सैराट मध्ये त्याने बाळ्याची भूमिका उत्कृष्ट पध्दतीने निभावली आणि ती प्रेक्षकांच्या मनात देखील भरली, तशा सैराट मधील प्रत्येकाच्या भूमिका लोकांनी मनापासून पाहिल्या आहेत. यातील छोट्यातली छोटी गोष्ट रसिकांचे लक्ष वेधून घेत होती. कधीच अशा प्रेमकथेची कल्पना झाली नसेल अशी ती प्रेमकथा होती.

त्यामुळे यात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे नशीब उघडले. इतका मजेशीर आणि धाडसी चित्रपट आहे की पाहणाऱ्याला कधीच कंटाळा येणार नाही. तसेच यातील कलाकार हे अगदी अस्सल जीवनात वावरत असल्यासारखा अभिनय करतात त्यातलाच बाळ्या, याची भूमिका निभावणारा तानाजी गालगुंडे.

सिने सृष्टीतील एक अशी अभिनेत्री जिने आपल्या अदाकारीने आणि सौंदर्याने तसेच अभिनयानेही रसिकांना स्वतःकडे भरपूर आकर्षित केले आहे, नेहमी प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडणारी अभिनेत्री मोनालीसा बागल ही खूप सुंदर दिसते. तिचा अभिनय देखील अगदी कौतुकास्पद असतो. मोनालीसा ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

तिचा अजून एक नवा चित्रपट जी टॉकीज प्रस्तुत, टॉकीज ओरिजिनल चित्रपट गस्त. या चित्रपटातून ती तानाजी गालगुंडे सोबत प्रेक्षकांना दिसणार आहे. त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला रसिक खूप उत्सुक आहेत. तानाजी गालगुंडे याचा सैराट मधील अभिनय तर आपण सर्वांनी पाहिलाच आहे. त्याची बोलण्याची पद्धत, हावभाव या सगळ्या गोष्टींचा प्रेक्षकांवर आधीच खूप प्रभाव पडला आहे

आणि आता पुन्हा जास्त प्रभाव टाकत तो गस्त या चित्रपटात मोनालीसा सोबत दिसणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका एका अमर नावाच्या मुलाची आहे. जो एका मुलीच्या प्रेमात पडतो, तो ज्या गावात राहत असतो, त्या गावाला पहारा देताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. तानाजी या चित्रपटाबद्दल खूप खुश आहे.

मोनालीसा बागल ही सर्वानाच आवडते, तिच्यावर भरपूर जण फिदा आहेत पण ती मात्र आता तानाजीच्या अभिनयावर फिदा आहे. गस्त या चित्रपटात तिची भूमिका सुजाता नावाच्या मुलीची आहे जी खूप चंचल आहे आणि ती अमर वर खूप प्रेम करत असते. ती त्याला भेटण्यासाठी कोणताही बहाणा करू शकते. तिने तानाजी सोबत पहिल्यांदा काम केले आहे आणि या वेळी त्याच्यासोबत काम करताना तिला खूप छान अनुभव येत गेले. तिला खूपच मज्जा आली.

हा चित्रपट एका खेडेगावातील आहे त्यामुळे अगदी आपल्यातीलच असल्यासारखा भासतो, यातील ही अशी अनोखी प्रेम कहाणी पाहताना प्रेक्षकांना खूपच मज्जा येणार आहे. यात अमर झालेल्या तानाजीचा अभिनय आणि सुजाता झालेल्या मोनालीसा चा अभिनय रसिकांना भरपूर आवडेल अशी आशा आहे.

त्या दोघांचाही अंदाज तसा खूपच भारी असतो. आणि आता तर चित्रपटात ते एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होणार आहे. मित्रहो हा चित्रपट नक्की पहा तसेच हा लेख कसा वाटला ते सुद्धा सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *