नामस्मरण करतांना भक्तांना येणारे काही प्रश्न आणि त्यांचे उत्तरे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नामस्मरण करताना बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न पडतात आज त्याच प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक प्रश्न जो वारंवार भक्तांना येत असतो तो म्हणजे नामस्मरण करताना जांभळ्या का येतात? तर दिवसभर नामस्मरण ही सुरुवातीला अवघड व कंटाळवाणी गोष्ट असते. हा कंटाळा जांभळीच्या रुपात बाहेर पडतो. पारायनात सुद्धा एकच वेळा तेच तेच नाव घेऊन आपले मन कंटाळलेले असते. व हाच कंटाळा जांभळीच्या रुपात बाहेर पडतो.

आणि त्यामुळे आपण जांभळ्या येतात म्हणून नामस्मरण सोडून देतो. नामस्मरनाच्या ह्या पायऱ्या चालायला खूप अवघड आहे. म्हणून माणूस बऱ्याच वेळा फक्त नमस्कार करूनच मागे परततो. हा सामना सुरुवातीला सर्व लोकांना करावाच लागतो. फक्त थोडेच असे लोक असतात त्यांना सुरुवातीपासून या नामस्मरण ची ओढ लागलेली असते. ते वेगळेच भाग्यवान असतात.

म्हणून नामस्मरण करताना जंभोळ्या येण ही गोष्ट फार नॉर्मल आहे. नामस्मरण करताना आपल्या अंतर मनाला कंटाळा येतो मग आपल्याला जांभळ्या येतात. आणि जांभळ्या आल्या की आपण झोपायला उठतो. आपल्याला वाटत तेच तेच करून आपल्याला कंटाळा येतोय. आणि नामस्मरण करायच सोडून देतो.

दुसरा प्रश्न- एकच नाम का घ्याव? यासाठी आपण व्यवहारातल एक उदाहरण घेऊ. समाज सोसायटी मध्ये मूल क्रिकेट खेळत आहे, पाच मिनिटांत एक स्त्री गौरव गौरव असा आवाज आपल्या मुलाला देते. त्या मुलांमधील अपेक्षित गौरव वरती बघतो आणि पाच मिनिटात आलो अस सांगून परत क्रिकेट खेळतो. याच जागेवर त्या स्त्री ने आपल्या मुलाच्या जागेवर दुसऱ्या खेळणाऱ्या मुलांची नावे घेऊन त्यांना बोलवल असत तर त्या मुलांनी काकू डोक्यावर पडल्या का या नजरेने त्यांच्याकडे बघितल असत.

म्हणून जसे मुलांचे एक वेगळे नाव असते तसच देवाचेही वेगळी नावे असतात. ते उठसूट कोणालाही दर्शन देत नसल्याने त्यांना त्यांचे नावच माहीत असते. समजा आपण शंकर नाव घेतल्यावर आपल्याला हातात त्रिशूल घेतलेले, गळ्यात साप असणारे शंकर भगवान आठवतात. राम म्हटले की निळसर धनुष्यबाण धारण केलेला सीतेबरोबर असणारा रामच आठवतो.

अर्थात जे नाव घेऊ त्याच रूप मनात दिसत.
फेसबुक आणि व्हाट्सअप्प वर कोणी एकमेकांना बघितले नसते. जर एकाच नावाचे दोन व्यक्ती असतील तर फोटो बघूनच ठरवतो कोणाला मॅसेज करायचा आहे ते. नामस्मरनाचेही तसेच आहे. आपण जेव्हा श्रीराम म्हणतो तेव्हा तो दुसरा कोणी नसून रामच असतो . एकाच देवाला वारंवार नाव घेतल्याने ते मंत्रदेवता जागृत होते.

आणि आपल्यावर लक्ष ठेवते. जसे जसे नाव वाढेल तस तस मंत्रदेवता कार्य करायला लागते. दुसरे देव आपल्याकडे लक्ष देत नाही तशी गरजही नसते. आपला परमार्थ निभवायला एक देव पुरेसा असतो. अनेक नावे घेतल्यामुळे कोणतीच मंत्रदेवता जागृत होत नाही व आपली सर्व मेहनत फुकट जाते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *