फक्त ही ३ कामे करा ८ दिवसात आयुष्य बदलेल. श्री स्वामी समर्थ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जीवनात यश मिळवणे सुख-समृद्धी मिळवणे व समाधानी राहणे प्रत्येकाची इच्छा असते, यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करत असतो. यासाठी आपण नवीन नवीन कामे शोधत असतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या माइंड सेट वर आधारित असतात. अगदी डोके पासून मना पर्यंत त्याच्यात बदल केला त्यांना काही सवयी लावल्या तर आपल्या जीवनात नक्कीच बदल घडतात.

स्वामींनी सांगितलेल्या या तीन गोष्टी तुम्ही जर रोज आपल्या आयुष्यात केल्या तर काही दिवसातच तुमचा आयुष्य बदलेल. स्वामी समर्थ म्हणतात की, प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतात, धैर्य असतात. तर अशाच स्वप्नांचे तुम्ही रोज सकाळी उठल्यावर त्यांना आपल्या डोळ्यासमोर आणा त्यांचा विचार करा व त्यांचे चित्रीकरण करा तसेच तुमचे स्वप्न काय आहे ते पूर्ण झाल्यावर तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगले बदल घडून येतील याबद्दल इमॅजीन करा.

मग बघा ती स्वप्न पूर्ण करायला तुमच्यात किती उर्जा येईल. यात कोणताही जादू-टोणा नाही आहे. यात आपली शक्ती आहे जे ही यशस्वी व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांनी असेच केले आहे. जर तुम्ही हे काम सकाळी उठल्यावर आपल्या आयुष्यात नक्की करा स्वप्नांना डोळ्यासमोर घेऊन या.

दुसरे काम ते म्हणजे मित्रांनो आपण रोज काहीना काही चुका करत असतो. त्या चुका रात्री झोपताना एका कागदावर लिहा काही ना काही चुका तर आपण रोज करत असतो. तर त्या चुका कागदावर लिहा आणि स्वतःला बोला की उद्यापासून ह्या चुका मी कधीच करणार नाही. मग बघा थोड्याच दिवसांनी तुमच्याकडून या चुका होणे कमी होईल बंद होणार नाही पण कमी नक्की होणार.

हा प्रयोग नक्की करा हे काम हलके घेऊ नका. त्याने तुमच्या आयुष्यात प्रगती नक्की होईल आणि बदलही. या कामासाठी तुम्हाला २४ तास आतून फक्त पाच मिनिटे लागतील आणि प्रत्येकाला वाटते आपल्या हातून चुका व्हायला नको. तर तुम्ही हे काम नक्की करा तुमच्याकडून परत चुका होणार नाही यासाठी काळजी घ्या.

मित्रांनो स्वामींनी सांगितलेली तिसरी गोष्ट म्हणजे रोज सकाळी ध्यान करा. प्रत्येक यशस्वी माणूस हा यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी ध्यान करतो. ध्यान करणे खूप सोपे असते फक्त रोज सकाळी शांत बसून काहीही विचार न करता ध्यान करु शकता. हवे तर तुम्ही ओम म्हणू शकतात. तर ओम बोलताना त्या ओम कडे लक्ष ठेवा ह्याने तुमच्या मनात विचार येणार नाही.

किंवा तुमचा जो विश्वास सुरू आहे त्या श्वासाकडे लक्ष द्या. म्हणजे कोणताही विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही. तर तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर ध्यान करायला नक्की सुरुवात करा. याने माईंड फ्रेश होते, नवीन ऊर्जा मिळते. फक्त ८ दिवस ध्यान करून बघा याने तुम्हाला स्वतःला अनुभव येतील आणि काहीतरी बदल दिसून येतील.

तर हि तीन कामे नक्की करा. आपल्या स्वप्नांना आपल्या अपेक्षांना आपल्या डोळ्यासमोर आणा. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा. रात्री झोपण्याआधी आपल्या चुका एका कागदावर लिहा आणि उद्यापासून मी या चुका करणार नाही यासाठी खूप प्रयत्न करा.

आणि तिसरे काम म्हणजे रोज सकाळी उठल्यावर जप करा आपल्याला हव ते ओम नाम तुम्ही घेऊ शकतात. जप करतांना मन एकाग्र करा व कसल्याही गोष्टीचा विचार करू नका. हे तीन काम करण्यासाठी तुम्हाला फक्त पंधरा मिनिट लागतील आणि २४ तासाचा मधील पंधरा मिनिट तुम्ही तर देऊ शकतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *