योगिनी एकादशी घरात इथे ठेवा ब१ वाटी तांदूळ सर्व इच्छा पूर्ण होतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

५ जुलै सोमवारचा दिवस या दिवशी योगिनी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी बऱ्याचशा लोकांचे उपवास असतात. हे उपवास दिवस रात्रीचे असतात आणि दुसऱ्या दिवशी काही लोक हे उपवास सोडत असतात. या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात त्यातलाच एक उपाय आम्ही सांगणार आहेत.

हा उपाय ५ जुलै योगिनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकतात आणि हा करण्यासाठी तुम्हाला फक्त घरात असलेले एक वाटी तांदूळ लागणार आहेत. एक वाटी तांदूळ घेऊन तुम्हाला देवघरात बसायचे आहेत देवघरात सकाळी बसू शकता किंवा संध्याकाळी महिला पुरुष कोणीही हा उलवू5 करू शकतात.

देवघरात तांदूळ घेऊन बसल्यानंतर ते वाटीभर तांदूळ तुम्हाला देवघरात ठेवायचे आहे. मधोमध तांदळाने भरलेली वाटी तुम्हाला ठेवायची आहे. हळदी कुंकू अक्षदा टाकून त्या तांदळाची पूजा करायची अगरबत्ती दिवा लावायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्र ११ वेळेस बोलायचा.

हा मंत्र बोलून झाल्यानंत प्रार्थना करायची की आमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. आमच्यावरील सर्व संकटे दूर करा सर्व अडचणी दूर करा. हे सर्व करून तुम्हाला उठायचे आहे आणि ते वाटीभर तांदूळ त्या दिवसभर आणि त्या रात्रभर तिथेच राहू द्यायचे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी तुम्ही देवघरात जाऊन ते तांदूळ तिथून उचलायचे आणि पक्षांना किंवा गाईला खाऊ घालायचे. छतावर टाकू शकता किंवा झाडाखाली ठेवू शकता. याने तुमच्या घरातील सर्व संकटे अडचणी निघून जातील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *