मोबाईल चार्जिंग करताना या ५ चुका चुकूनही करू नका अन्यथा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

पाच-सहा महिन्यांपूर्वी मी एक नवा मोबाईल विकत घेतला आणि आज त्या मोबाईलची अवस्था अशी आहे की मी आता बॅटरी चार्जिंग करायला लागलो की चार ते पाच तास चार्जिंग करायला लागतात. आणि बॅटरी फुल चार्ज झाल्यावर अर्धा तासा मध्ये की बॅटरी पूर्ण उतरते. अस का होतय हा विचार करून मी जेव्हा कस्टमर केअर कडे गेलो तेव्हा त्यांनी हात वरती केले.

ते म्हणाले बॅटरीला सहा महिने गॅरंटी असते तुम्हाला सहा महिन्याच्या वरती काही दिवस झालेले आहे. आता आम्ही काहीही करू शकत नाही. तर मित्रांनो मोबाईल घेतल्यावर बॅटरी कमीत कमी चार वर्षे तरी टिकायला हवी आणि माझी बॅटरी फक्त सहा महिने मध्ये कशी काय खराब झाली तेव्हा याचा शोध लावण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केल आणि मला तेव्हा समजल की मी मोबाईल चार्जिंग करताना कोणत्या चुका करत होतो.

तेव्हा मला वाटले ही महत्त्वाची माहिती तुमच्याशी ही शेअर केली पाहिजे जेणेकरून आपले नुकसान टाळता येईल. मित्रांनो बरेच वेळा आपण मोबाईल विकत तर घेतो पण मॅन्युअल काय असत त्यावर ते वाचत नाही. मात्र आपण चार्जिंग करताना ज्या चुका करतो त्यामुळे आपली बॅटरी लवकर खराब होते. बऱ्याच वेळा तुम्ही बघितले असेल की बॅटरी खूप फुगते देखील आणि बऱ्याच वेळा मोबाईलचा स्पोर्ट सुद्धा झालेला असेल अस तुम्ही ऐकल असेल. याला सुद्धा चार्जिंग करने जबाबदार आहे काही जणांचा मोबाईल वारंवार गरम होतो.

थोडासा गेम वगैरे खेळल्यावर की हा मोबाईल गरम होतो. त्याला ओवरहीटिंग अस म्हणतात तर हे सुद्धा आपल्या चार्जिंग करण्याच्या चुकीमुळे होत. तर आज मी तुम्हाला त्या पाच चुका सांगणार आहेत ज्या तुम्ही मोबाइल चार्जिंग करताना करतात. या चुका तुम्ही नाही केल्यास तुमचा मोबाईलची बॅटरी आयुष्य वाढणार व तो दीर्घकाळ चालणार. तर पहिलीची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही मोबाईल जेव्हा चार्जिंगला लावतात तेव्हा मोबाईलचे कव्हर काढून तो मोबाईल चार्जिंगला लावा कारण जो बॅटरी कवर असतो ते मोबाईल ला मिळणारा हवेचा पुरवठा रोखून धरतो.

त्यामुळे बॅटरी खराब होते आणि बॅटरी खराब झाल्यावर मोबाईल वरती त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट येतो. तसेच तुमचा मोबाईलचा डिस्प्ले म्हणजेच तुम्ही जेव्हा मोबाइल विकत घेतात तेव्हा तो डिस्प्ले अत्यंत चांगला असतो. पण थोड्या एका वर्षांनी जेव्हा आपण मोबाईल कडे बघतो तर त्या मोबाईल कडे पहावस वाटत नाही. म्हणजेच आपल्या स्क्रीनचा ब्राइटनेस अत्यंत डल झालेला असतो. त्यालाही कव्हरच कारण आहे तर तुम्ही कव्हर वापरा पण चार्जिंग करतांना ते काढून ठेवा.

दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीने तुम्हाला जो चार्जर दिलेला आहे तो चार्जर वापरा. तुम्ही तर दुसऱ्या कंपनीचा चार्ज वापरायला लागले म्हणजे तुमचा मोबाईल रेडमी चा आहे आणि तुम्ही सॅमसंग चा चार्जर वापरत आहात तरीही तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर खराब होते. प्रत्येक कंपनीचा चार्जर आहे त्याचा किती करंट पाठवायचा हे ठरलेल असत. तर तो चार्जर तुम्ही वापरा आणि हा चार्जर खराब झालेला असेल तर दुसरा चार्जेर तुम्ही विकत घेऊ शकता.

ते चार्जर थोडस महाग भेटणार पण तुमचा मोबाईल जर २० हजाराचा मोबाईल असेल आणि वीस हजाराच्या मोबाईल पुढे तुम्ही ५०० रु. चार्जर बघितल तर ते तुम्हाला काहीच महाग नाही त्यामुळे तुमचा मोबाईल दीर्घकाळ चालणार आणि हो चायनीज चार्जर तर अजिबात वापरू नका चायनीज चार्जर म्हणजे चे चार्जर बाजारात ३० ते ७० रुपये पर्यंत भेटतात ते बिलकुल वापरू नका.

तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल ला चार्जिंग करताना मोबाईल स्वीच ऑफ करावा हे शक्य नसेल तर कमीत कमी मोबाईल फ्लाईट मोडवर तरी टाकावा. मित्रांनो तुम्ही मोबाईल ला जर तसाच चार्जिंग करत असाल तर एका बाजूला मोबाईल चार्जिंग होत राहतो आणि दुसऱ्या बाजूला नेटवर्कही चालू असत. म्हणजे एका बाजूने मोबाईल चार्जिंग होतय आणि दुसऱ्या बाजूने चार्जिंग घेतोय त्याच अस होत की, तुम्ही जॉब वर सुद्धा गेलाय आणि जॉब करता करता जेवण सुद्धा करताय अस होत.

मोबाईल चार्जिंग व्हायला फक्त दोन ते तीन तास लागतात हल्ली तर आताचे मोबाईल फक्त अर्ध्या तासातच चार्जिंग होतात. म्हणून तुम्ही मोबाईल चार्जिंग करताना आपला मोबाईल स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोडवर टाका.

चौथी गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईलची बॅटरी किती टक्के पर्यंत चार्जिंग करायची हे खूप जणांना माहीत नसतं बरेच असे असतात की, ते शंभर टक्के झाल्यावर सुद्धा आपल्या मोबाईल चार्जिंग वरून काढत नाही. म्हणतात होऊदे आणखी अरे बाबा १००% यांच्यावर आणखी कोणती चार्जिंग होणार आहे? कंपनीचे मॅन्युअल असे सांगते की मोबाईलची चार्जिंग फक्त ९० ते ९५ टक्के एवढेच करा यापुढे चार्जिंग करू नका.

जे लोक ९५ टक्क्यांच्या वर चार्जिंग करतात त्यांची बॅटरी लवकर खराब होते बॅटरी फुटते आणि ओवरहीटिंग चा प्रॉब्लेम येतो. तुमचा मोबाईल हंड्रेड पर्सेंट गरम होणार. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते त्या मोबाईल ला यु एस बी केबल जोडतात आणि तो मोबाईल २४ तास त्या लॅपटॉप कॅम्पुटर ला लावलेला असतो. त्या यूएसबी मुळे तुमच्या मोबाईलला चार्जिंग तर भेटते पण तो चार्जिंग होण्यासाठी त्याला किती करंट पाहिजे तो अत्यंत कमी मिळतो.

त्यामुळे तुमचा फोन खूप हळू चार्जे होतो अर्थात एखाद्या २५ वर्षाच्या तरुणाला चमच्याने अन्न भरण्यासारखे असते. ते तर यु एस बी चा वापर तुमच्या मोबाईल मधील डाटा ट्रान्सफर करण्यासाठीच करा त्याचा चार्जिंग ला लावण्यासाठी वापर करू नका. तर या चुका तुम्ही जर केल्या नाहीत तर तुमच्या मोबाईलचे आयुष्य दीर्घकाळ होईल आणि तुमचा मोबाईल तुम्हाला चांगली सेवा देईल.

तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *