कलियुगात भाग्यवान महिलांच्या शरीरावर दिसतात ही लक्षणे, महालक्ष्मीचे रूप असतात अशा महिला.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक पुरुषाला वाटते की जी स्त्री आपल्या घरी लग्न करून येईल ती भाग्यशाली असावी. ज्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे आपल्या घराची आपल्या घरातील सदस्यांची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या जीवनात आनंदी आनंद असावा. काहींच्या बाबतीत हे खरे होते त्यांच्या घरात येणारी स्त्री हे आनंद घेऊन येते.

मग घरातील वातावरण अगदी निर्मळ होते भविष्यपुराणात अशा स्त्री बद्दल काही लक्षणे सांगितलेले आहे की, ते ज्या घरात जातात त्या घराला स्वर्ग बनवतात. त्यातील पहिल लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी स्त्री म्हणजे जी स्त्री संध्याकाळ होताच देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावते व त्यांच्या पाया पडते. सोबतच स्वयंपाक झाल्यावर आधी देवाला नैवेद्य देते. मग घरातील सर्व जण भोजन करतात अशी स्त्री मुळे घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते.

घरातील वातावरण शुद्ध व पवित्र होते आणि अशा वातावरणात राहणारे कुटुंब नेहमी आनंदी राहते. दुसरी गोष्ट म्हणजे समाधानी स्त्री जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करत नाही, त्यामुळे त्यांचा पतीही त्यांच्यावर खूष असतो. काही स्त्रिया आपल्या शेजारी काही वस्तू बघतात आणि ही तीच वस्तू आपल्या घरात आली पाहिजे अशी नवर्‍याकडे मागणी करतात.

मग त्यांच्या इच्छा पूर्ण करता करता नवऱ्याच्या नाकी नऊ येतात. मग पतीला पत्नीच्या या इच्छा पूर्ण करण्यासाठी वाईट कामात गुंतावे लागते. आणि त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून स्त्री जर समाधानी वृत्तीची असेल आणि तिच्या इच्छा कमी असतील तर नवर्‍यालाही तिच्या इच्छा पूर्ण करताना जास्त प्रयत्न करावे लागत नाही. आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी असते.

३) तिसरी गोष्ट म्हणजे स्त्री मध्ये धैर्य असावे. धाडस असावे कशीही परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची त्याच्यामध्ये ताकद असावी. आणि कितीही वाईट परिस्थिती असेल तर तरी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असेल तर वाईट परिस्थिती जायला वेळ लागत नाही त्यातूनही आपल्याला मार्ग मिळत जातात.

४) चौथी गोष्ट म्हणजे राग येणे- मुख्यता राग न येणे अशी स्त्री शोधणे अवघड आहे, कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मतः गुण असतो परंतु अति राग करणे अति जोरात बोलणे व कर्कश आवाज करणे असा राग कोणत्याही स्त्रीमध्ये असू नये. स्त्रियांना थोडासा राग तर येतोच आणि तो यायलाच हवा नाहीतर असा राग पाठवून एक वेळ या रागाचाना चा मोठा स्फोट होतो आणि परिस्थिती बिघडू शकते.

जर स्त्री सतत चिडचिड करत असेल जोरात बोलत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व सतत भांडण होत राहतात. म्हणून स्त्री ने शांत आणि संयमी असावे समोरच्या व्यक्तीचे काही चुकत असेल तर त्याला नक्की विरोध करा. पण प्रत्येक गोष्टीत जोरात भांडण करून घरातील वातावरण दूषित करू नका.

५) पुढची गोष्ट म्हणजे समजुतदार- जी स्त्री प्रत्येक गोष्ट समजूतदारपणे घेते, शांतपणे सर्व समजून घेते, जे आहे ते आहे जे नाही ते नाही याचा स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले गोड बोलते ते घर हि नेहमी सुखी व समृद्ध राहते. ज्या स्त्रीचे बोलणे चांगले असते गोड असते ती स्त्री इतरांची चांगले बोलून आपले चांगले संबंध निर्माण करते.

मित्र, मैत्रिणी शेजारी-पाजारी सर्वांना धरून ठेवते आणि वेळ प्रसंगी ते सर्व लोक त्यांच्या कुटुंबासाठी धावून सुद्धा येतात. परंतु जी स्त्री कडू बोलते कठोर बोलते व शेजारी पाजारी चांगले संबंध निर्माण करत नाही. तिच्या कुटुंबासाठी कोणीही वेळ प्रसंगी धावून येत नाही. व तिचे कुटुंब संकटात येते. जा स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणाचा आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते.

६) सोबतच ज्या स्त्रीच्या पायाचे तळवे सर्पाकार असतात, ती स्त्री ही आपल्या सोबत सर्व भाग्य घेऊन येते. आपल्या कुटुंबाला सुख व समृद्धी मिळवून देते. ज्या स्त्रीच्या डोळे हरणी सारखे असतात ती स्त्री ही खूप सुखी असते व सर्वांना आनंद देते. ज्या स्त्रीच्या बेंबीजवळ तीळ असते ती स्त्री आपल्या पतीला खूप ऐश्‍वर्य व धन मिळवून देते. ज्या स्त्रीच्या कपाळाला मधोमध तीळ असते ती स्त्री ही आपल्या संपूर्ण कुटुंबाला आनंद देते. त्या स्त्रीचे भाग्य खूप जोरदार असते म्हणून तिच्या सर्व कुटुंबाचे कामे लवकर पुर्ण होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *