देवघरात ठेवा या ३ वस्तू घरात कधीच पैसा कमी पडणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

देवघर जिथे आपल्या सर्व इच्छा आपल्याला प्राप्त होतात आणि सुख-दुख आपल्याला मिळते दुःख असले तरी आपण देवासमोर जातो आणि सुख असले तरी आपण देवासमोर जातो. घरात देवघराचे खूप महत्त्व असते कारण जेथे घर देवघर नसते तेथे नकारात्मक ऊर्जा सतत असते. आणि ज्या घरात रोज सकाळी दिवा लावला जातो व त्यावर देवांचा आशीर्वाद असतो. त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असते.

म्हणून देवघर आपल्या घरामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरात मध्ये या तीन वस्तू ठेवल्याने पैसा कधीच कमी पडणार नाही. घरात लक्ष्मी मातेची कृपा व्हायला लागेल मित्रांनो देवघरात कोणत्या वस्तू ठेवाव्या कोणत्या वस्तू ठेवू नये. याचे खूप सारे नियम आहे याच नियमाबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती देवघरात असायलाच पाहिजे.

लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्या घरात नसेल तर लगेच लक्ष्मी मातेची मूर्ती आणून अभिषेक करून तिला देवघरात स्थापन करा. मी खूप लोकांच्या घरी बघितलेला आहे की त्यांच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असते पण ते उभ्या स्वरूपात असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मीची मूर्ती ही आपल्या देवघरात बसलेल्या स्वरूपात असावी तर ही पहिली वस्तू खूप महत्त्वाची आहे देवघरामध्ये.

दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणा- दक्षिणेचे खूप महत्त्व असते, दक्षिणा म्हणजे पैसा लक्ष्मीचे एक स्वरूप म्हणून आपण आपल्या सोयीनुसार देवघरामध्ये २१ रुपये किंवा ५१ रुपये अशी दक्षिणा ठेवावी. नाही जमले तर एक रुपयाचा शिक्का आपण घरात ठेवू शकतात. देव जिकडे ज्या रांगेत ठेवले असतात त्या जागेमध्ये हा शिक्का आपल्याला ठेवायचा आहे. त्या दक्षिणेची रोज पूजा करावी आणि त्या दक्षिणेला देव घरातच राहू द्यावे त्याची अजिबात खर्च करू नये. ती होती दुसरी गोष्ट

आता तिसरी गोष्ट म्हणजे कासव पाण्यात- कासव खूप जणांच्या घरी कासव असेल पण काहींच्या देवघरामध्ये पाण्यात कासव नसत. मित्रांनो कासवाची छोटीशी मूर्ती भेटते आणि वाटीमध्ये तुम्हाला पाणी टाकायच असत आणि त्या पाण्यामध्ये कासवाला ठेवायच असत. स्वामींच्या मठात किंवा दुकानात तुम्हाला हे कासव भेटू शकते.

काहींच्या घरामध्ये शोपीस म्हणून हॉलमध्ये ठेवलेला असतो कासव पण तिकडचा कासव हा आपल्या देवघरात ठेवायचा असतो. तर या तीन अगदी महत्त्वाच्या गोष्टी लक्ष्मी मातेची मूर्ती, दक्षिणा आणि पाण्यात कासव या वस्तू आपल्या देवघरात असायलाच हव्या.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *