लेक चालली सासरला एक हृदयीस्पर्शी कथा शेवट न चुकवता बघा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

लग्नानंतर सर्वात शेवटचा समारंभ म्हणजे मुलीची तिच्या सासरवाडीत पाठवणी केली जाते. कितीही कठोर व्यक्ती असली तरी या वेळेस डोळ्यात अश्रू येतातच तर मित्रांनो हाच प्रसंग या कथेमध्ये खूप छान वर्णन केलेला आहे.
लग्नानंतर पाठवणीची वेळ होती नेहा आपल्या आईला भेटल्यानंतर वडिलांच्या छातीवर डोक ठेऊन रडत होती. सर्वांचे डोळे भरून आले होते.

नेहाने डोक्यावर पदर घेतला होता. ती सजवलेल्या गाडीजवळ आपल्या छोट्या बहिणीसोबत आली. अविनाश आपला जवळचा मित्र विकास शी बोलत होता. विकास म्हणाला यारर अविनाश आधी घरी पोहचल्यावर अमृताबागला जाऊन चांगले जेवण करू आपण तुझ्या सासरी जेवणात मजा नाही आली. तेव्हढ्यात जवळ उभा असलेला अविनाश चा छोटा भाऊ राकेश ही म्हणाला हा यार पनीर काही ठीक नव्हता आणि रसमलाई मध्ये तर रसच नव्हता.

अविनाश म्हणाला हो जाऊ आपण अमृताबागला मग जे खायच ते खा. मलाही फारशी मजा नाही आली या जेवणात पोळ्याही नरम नव्हत्या. आपल्या पतीच्या तोंडातून हे ऐकताच नेहा जी गाडीत बसणारच होती ती मागे फिरली व तिने गाडीचा दरवाजा जोरात बंद केला. आणि तिच्या पप्पाजवळ गेली त्यांच्या हातात हात घेऊन म्हणाली मी सासरी जात नाही आहे.

पप्पा मला हे लग्न मान्य नाही ती एव्हढ्या जोरात बोलली की ते सर्वांना ऐकू गेले व त्यांना धक्काच बसला. नेहा चे सासरे राधेश्यामजी पुढे आले आणि नेहाला विचारले काय झाले सुनबाई लग्न झालेले आहे तुझे आणि आता पाठवणीची वेळ झाली आहे तरी तू अचानक लग्न का नाकारत आहे? अविनाशवरही दुःखाच डोंगर कोसळला. अविनाश आणि अविनाश चे मित्र नेहाजवळ आले.

सर्वांना हे जाणून घ्यायची उत्सुकता होती की ऐन वेळी नक्की काय घडल जे नेहाने सासरी जायला नकार दिला. नेहाने तिच्या बाबांचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ती तिच्या सासऱ्यांना सांगू लागली की माझ्या बाबांनी आम्हा बहिणींना व मला खूप कष्ट करून शिकवले आहे. तुम्हाला माहिती आहे एक पित्यासाठी त्याच्या मुलीचे काय महत्त्व असते ते? तुम्हाला व तुमच्या मुलाला ते महत्त्व समजणार नाही कारण तुम्हाला मुलगी नाही.

नेहा रडत होती व सांगत होती तुम्हाला माहिती आहे? माझ्या लग्नासाठी व पाहुण्यांच्या पाहुनचारासाठी माझे वडील मागचे दोन वर्षांपासून रात्री २ वाजतापर्यंत आईसोबत योजना बनवत असत. आचारी कोण असेल , जेवणात काय काय असेल. मागच्या वर्षी माझ्या आईने नवीन साडी घेतली नाही कारण माझ्या लग्नात काही कमी पडू नये म्हणून. बहिणीची साडी घालून माझी आई तुम्हाला नवीन साडी आहे अस दाखवून उभी आहे.

माझ्या वडिलांच्या दीडशे रुपयाच्या शर्टखालील बनियनला शंभर छिद्रे आहे. त्यांनी माझ्या लग्नासाठी त्यांचे स्वतःचे किती स्वप्न दाबून टाकले असतील चांगले खाल्ले नसेल, चांगले राहले नसतील. पण फक्त त्यांची एकच इच्छा होती की, माझे लग्न थाटामाटात चांगले व्हावे. तुमच्या मुलाला चपाती थंड आणि कडक वाटली. त्याच्या मित्रांना पनीर चांगले नाही लागले. व माझ्या देराला रस मलाई मध्ये रसच नाही मिळाला.

त्या सर्वांची खळखळून हसणे माझ्या वडिलांच्या मनाला दुखवण्यासारखे होते. नेहाला धाप लागली होती. नेहाचे वडील रडत होते. आणि म्हणाले पण एव्हढी छोटीशी गोष्ट बेटा ? नेहाने तिच्या वडिलांना मध्येच थांबवले आणि म्हणाली ही छोटीशी गोष्ट नाही बाबा माझ्या नवऱ्याला माझ्या बाबांचा मान नाही. पोळ्या का तुम्ही बनवल्या होत्या? पनीर रसमलाई हे सर्व आचारीचे काम होती. तुम्ही तर तुमच्या परिस्थिती पेक्षा खूप चांगले करण्याचा प्रयत्न केला.

काही कमतरता राहिली तर ती आचाऱ्याकडून तुम्ही किती रात्र मी गेल्यावर रडणार हे मला माहित नाही का? आई तर माझ्याशिवाय कधी घरातून बाहेर पडली नाही. उद्यापासून तिला एकटे बाजारात जावे लागणार आहे. पत्नीला व सुनेला घ्यायला आलेले जेवणात चुका काढत आहे. पण त्यांच्या लक्षात हे नाही आले का की, तुम्ही माझ्यात कोणतीच कमी नाही ठेवली.

नेहाच्या वडिलांनी नेहाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हटले मला गर्व आहे तू माझी मुलगी आहे. पण आता मोठ्या मनाने यांना माफ कर आणि आधी थोडी शांत हो. तेव्हढ्यात अविनाश नेहाच्या बाबा जवळ आला आणि म्हणाला मला माफ करा माझ्याकडून चूक झाली. त्याच्या डोळ्यातील अश्रुंनी त्याच्या भावना समजतच होत्या. अविनाश चे बाबाही जवळ आले व म्हणाले परमेश्वर किती दयाळू आहे मी सून घ्यायला आलो होतो पण मला तुमच्या मुलीच्या रुपात माझी मुलगीच मिळाली.

मला इशवरने मुलगी नाही दिली ते बहुतेक याच कारणामुळे की तुझ्यासारखी मुलगी माझ्या नशिबी होती. आता बेटा या ना-ला-यकांना माफ कर आणि माझी बेटी मला परत कर. राधेश्यामजींनी नेहसमोर हात जोडले व नेहा म्हणाली बाबा तेव्हढ्यात राधेश्याम जी म्हणाले बाबा नाही पप्पा बोल. नेहाने त्यांना मिठी मारली. राधेश्यामजींना अशी मुलगी मिळाल्याने सन्मान वाटत होता.

नेहा आता आपल्या सासरी जायला निघाली होती. आई बाबांच्या डोळ्यातील अशृंना मागे सोडून. जी चिमणी वडिलांच्या अंगणात आतापर्यंत स्वतंत्र उडत होती ती चिमणी मात्र त्या अंगणातून जात होती. ती आपले घरटे सोडून दुसरीकडे घरटे बनवायला जात होती. किती मूर्ख असेल तो माणूस ज्याने मुलीला परक्याचे धन अस संबोधले आहे.

कारण मुलगी तर आपले स्वतःचे व हक्काचे घर सोडून दुसऱ्याचे घरात उजड करण्यासाठी जात असते. म्हणून लक्षात ठेवा यापुढे कोणत्याही लग्नात गेला तर जेवण भलेही थोड खारट किंवा वाईट असो जेवणाला नाव पाडू नका. कारण या जेवणासाठी एका गरीब बापाने वर्षानुवर्षे कष्ट केलेली असतात.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *