स्वामी म्हणतात ज्यांच्या देवघरात या ४ वस्तू असतात. त्यांच्या घरात कधीच कसली कमी राहत नाही, तिथे सगळे चांगले होते.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वामी म्हणतात ज्यांच्या घरात या चार वस्तू असतात त्यांच्या घरात कोणतीच कमी राहत नाही. नेहमी भरभराट राहते व सुखसमृद्धी राहते. मित्रांनो आपले देवघर म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे स्थान तेथे आपण आपल्या इचछा सांगतो आपल्या समस्या सांगतो तेथून आपल्याला शक्ती व नवीन प्रेरणा मिळते जिथून आपले घर पवित्र होते.

जिथून आपल्याला आशीर्वाद मिळतो, जिथून आपल्या घरावर कृपा होते, त्या देवघरात आपण स्वामींनी सांगितलेल्या या चार वस्तू ठेवायलाच हव्या. तर मित्रांनो यातील पहिली वस्तू आहे.

१) चंदन- चंदन हे शांततेचे आणि शितलतेचे प्रतीक आहे. म्हणून चंदन आपल्या देवघरात नक्की असावं. चंदनाच्या सुवासाने मनातील नकारात्मक विचार नाहिशे होतात. चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावतात. कपाळावर गंध लावल्याने मेंदू शांत राहते. जर आपल्या घरात चंदन असेल तर आपल्या घरात शांतता असेल आपल मन समाधानी असेल. आपलं घर हे पवित्र राहील म्हणून घरामध्ये थोडं तरी चंदन असायला हवं.

दुसरी जी वस्तू आहे ती आहे. २) शंख- ज्या घरात शंख असते त्या घरात लक्ष्मी नांदते. शंख हे सूर्य आणि चंद्रासारखे आहे. याच्या वरील बाजूस वरुण मागील बाजूस ब्रह्म आणी पुढील बाजूस गंगा आहे. आपल्याला जे लाभ तिर्थक्षेत्रापासून मिळतात तेच लाभ शंकाच्या दर्शनाने व पूजा केल्याने मिळतात. म्हणून प्रयत्न करावा की आपल्या घरात एक तरी शंख असावा व त्याची रोज नियमितपणे पूजा झाली पाहिजे.

३) तिसरी गोष्ट म्हणजे शिवलिंग- शंकर भगवानांची एक प्रकारची मूर्ती तुम्हाला तर माहितीच असेल शंकराची मूर्ती आणि शंकराचा फोटो आपण देवघरात ठेवत नाही व पूजा करत नाही पण महादेवाचे पिंड व शिवलिंग आपण पूजत असतो. म्हणून शिवलिंग आपल्या घरात असायलाच हवे. शिवलिंग हे इतर मूर्तीपेक्षा प्रभावी असून हीच पूजेसाठी योग्य मानली जाते.

शिवलिंग घरात असल्याने घरातील ऊर्जा संतुलित राहते. शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा राहते वाईट गोष्टीपासून आपला बचाव होतो. म्हणून शिवलिंग हे आपल्या घरात असायलाच हवे.

४) शेवटची गोष्ट आहे कवळी- प्राचीन काळापासून काही परंपरा व उपाय प्रचलित आहेत. हे उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवळीला देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. एक पिवळ्या कवळीला आपण जर लाल कापळात बांधून जर देवघरात ठेवले किंवा आपल्या तिजोरीत ठेवले तर याने आपल्याला भरपूर लाभ मिळतात.

म्हणून प्रयत्न करावा की तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवळ्या मिळतील आणि नाही मिळाल्या तर तुम्ही सफेद रंगाच्या कवळ्याही देवघरात ठेऊ शकतात. तर मित्रांनो या चार वस्तू तुमच्या देवघरात असायलाच हव्या याने तुमचं घर संपन्न होईल आणि पवित्र होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *