मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिरा संबंधित स्वामींच्या काळातील एक सत्य घटना.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

मुंबईत राहणाऱ्यांना दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहीत नाही असे होऊच शकत नाही. मुंबईत कामासाठी येणारे लोक सुद्धा या मंदिराचे दर्शन अगदी वेळात वेळ काढून घेतात. मुंबईतील या सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी मान्यता आहे. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांची आणि मुंबईतील सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते.

मुंबईपासून इतक्या दूर अक्कलकोट ला राहणाऱ्या स्वामी समर्थांचा नेमका कोणता योग जुळून आला नेमकी घटना व स्वामी समर्थांचा योग्य कोणता आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. अक्कलकोट स्वामी आणि श्री जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एखाद लेकरू ज्याप्रमाणे आपल्या आईला सर्वकाही सांगते तिच्यावर प्रेम व श्रद्धा ठेवते तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराजांचे होते.

असच एकावेळी महाराज आणि स्वामी समर्थ बोलत असताना रामकृष्ण तुला काय हवय अशी विचारणा स्वामींनी केली. प्रत्यक्ष ब्रह्मांड देऊ शकत असणाऱ्या स्वामींनी काय पाहिजे अस विचारल असतानाही रामकृष्ण महाराजांनी स्वतःसाठी काहीच मांगीतले नाही. महाराज म्हणाले मला माझ्यासाठी काहीही नको.

तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकला वैभव दया. स्वामींना खूप आनंद झाला. आपल्या लाडक्या भक्ताने स्वतःसाठी काही न मागता इशवरसाठी वैभव मांगीतले. इशवराला वैभव दिल्याने तेथे भक्त वाढतील व तोच वैभवप्राप्त इशवर आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका गोष्टीत दोन गोष्टी साध्य होणार होत्या.

स्वामींना रामकृष्ण महाराजांची कल्पना खूप आवडली. त्यांनी महाराजांना आशीर्वाद दिला व म्हणाले रामकृष्ण तुझ्यासारखा भक्त मला मिळाला हे माझे भाग्यच आहे. मंगळवारी सिद्धिविनायकला गेल्यावर तेथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव, ज्या दिवशी तो मंदार बहरणार त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवने बहरला असणार. स्वामींनी अगदी प्रसन्न मनाने आशीर्वाद दिले.

चौथ्या दिवशी महाराज प्रभादेवीच्या दर्शनाला आले व सर्वात आधी त्यांनी तेथे मंदार वृक्षाचे रोपण केले. आणि तेथे हात जोडून म्हणाले स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. महाराज म्हणाले हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो की तुला या जगात वैभव प्राप्त होईल. वैभवाच्या झगमगात्याने तुझ्याकडे लाखो भक्त आकर्षित हो आणि मग त्या भक्तांच्या इचछा पूर्ण हो अशी प्रार्थना महाराजांनी सिद्धिविनायकाला केली.

आणि मग स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकला प्राप्त झाले. महाराजांनी लावलेला मंदार वृक्ष जसजसा बहरत गेला तसे सिद्धिविनायकला वैभव प्राप्त होत गेले. व त्याची कीर्ती वाढत गेली. स्वामींचा प्रिय भक्त, मंदार वृक्ष व सिद्धिविनायकाचा वैभव या सुंदर भाती ही कथा सांगितलेली आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *