काळजात हात घालणारी कथा बाप हा बापच असतो.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सेल्समनने बिलिंग ची सर्व प्रोसेस पूर्ण केली आणि लॅपटॉप सचिनच्या हातात दिल. लॅपटॉप हातात घेतल्यावर सचिनचा चेहरा अगदी उजळून निघाला होता. स्वतःच लॅपटॉप ही कल्पनाच किती सुखद वाटत होती. अभिनंदन सचिनच्या पाठीवर थाप मारत अनिल म्हणाला. दोघेही जिवलग मित्र होते दोघेही लहानपणा पासून सोबत असत सचिन खरच मनापासून खूप खूष होता आज.

सचिन हा गरीब घरचा मुलगा होता बाबांची तुटपुंजी कमाई होती व त्या कमाईतून अस तिघाच भागत होत. आई वडील ते कामाला थोडाफार हातभार लावत होती मुलांच्या शिक्षणाला ते मात्र काही कमी पडू देत नव्हते. त्यांच्या हुशार मुलांचा त्यांना खूप अभिमान वाटत होता आमचा मुलगा इंजिनिअरिंग करतोय ते अभिमानाने सांगत फिरायचे ते.

सचिनला देखील त्याच्या गरिबीची जाणीव होती तो देखील अनावश्यक खर्च टाळत होता. तो लायब्ररीमध्ये पुस्तक आणि मित्रांजवळून पुस्तक घेऊनच अभ्यास करत होता पण जेव्हा कॉलेजमध्ये सरांनो स्वतःचा लॅपटॉप आणायला सांगितला तेंव्हा तो खूप अस्वस्थ झाला . लॅपटॉप कसा आणायचे हे त्याचा मनात चालले होते.

त्याला चांगलेच माहिती होते की, लॅपटॉप हे आपल्या परिस्थिती बाहेरचे आहे. म्हणून संध्याकाळच तिघांच जेवण आटोपल होत तो हाच विचार करत होता की आई बाबांना लॅपटॉप विषयी कस सांगायच. तेवढ्यात सचिनच्या बाबांनी विचारल काय रे सचिन कॉलेजमध्ये काही चाललय का त्याच्या मनातली बेचैनी ओळखून बाबांनी त्याला विचारल. तसेच आईसुद्धा त्याच्याकडे पाहत होती.

सचिन म्हणाला काही नाही बाबा आणि तो थोडा वेळ थांबून तो म्हणाला बाबा आम्हाला कॉलेजमध्ये स्वतःचा स्वतंत्र लॅपटॉप आणायला सांगितलेला आहे. सचिन म्हणाला आई काळजी नको करू सिनियर्स कडून मिळेल मला सेकंड हॅन्ड लॅपटॉप अगदी कमी किमतीत तेवढ्यात त्यांनी विचारला सचिन चांगला कंपनीचा लॅपटॉप कमीत कमी कितीला भेटतो.

सचिन म्हणाला तो नाही परवडणार आपल्याला बाबा खूप महाग असतो. मी करील सेकंड हॅन्ड लॅपटॉपवर अभ्यास सचिनच उत्तर बाळाच दोघांनाही कौतुक वाटलं तरी बाबांनी परत लॅपटॉप च्या किमती विषयी विचारल. सचिन म्हणाला चांगल्या ब्रांडच कंपनीचा लॅपटॉप कमीत कमी ४० हजार रुपयाला भेटणार तेवढ्याच आईला धक्काच बसला.

त्यानंतर सचिनचे बाबा डोळे लावून बसले व त्यांच्या मनात काहीतरी हिशोब चालला होता. थोड्यावेळाने त्यांनी डोळे उघडले आणि सचिन ला म्हणाले तू चौकशी कर नवीन लॅपटॉप विषयी, नाही बाबा मिळेल मला सेकंड हँड लॅपटॉप बाबा म्हणाले हे बघ सचिन तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. असे म्हणून त्यांनी तो विषय तेथेच संपवला.

संध्याकाळी सचिन अनिल ला घेऊन दोन-तीन दुकानांमध्ये गेला एका दुकानातून त्यांनी लॅपटॉप च कोटेशन काढल चाळीस हजार तीनशे पन्नास रुपयाचा सचिनला माहिती होत की हे आपल्यासाठी अशक्य आहे संध्याकाळी बाबांनी घरी आल्यावर सचिन च्या हातातून कोटेशन घेतल सचिन च्या पाठीवर थोपटल आणि बाहेर निघून गेले सकाळी ते बाहेर जाऊन दुपारी परत परतले.

आईने त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण मात्र नंतर सांगतो असे हाताने खूणवत ते निघून गेले. संध्याकाळी बाबा जरा लवकर घरी आले होते आणि ते जणू सचिनची येण्याची वाट बघत होते. सचिन आला सचिनला बाबांना पाहून खूप आनंद झाला कारण एवढ्या लवकर बाबा घरी येत नसतात. कधी सचिन आत गेला व त्याच्या पाठोपाठ त्याचे बाबा ही आत आले. त्याच्या बाबांनी त्यांच्या हातात एक पाकीट दिल सचिन ला नक्की कळत नव्हत की काय चाललय.

तेव्हा सचिनला गोंधळात बघून बाबा सांगू लागले आणि त्याची आई तेथेच होती उघडून बघ उघडल्यावर त्या पाकिटामध्ये त्याने आणलेलं कालचा कोटेशन आणि बँकेची प्रिऑर्डर होती. ४०३४० रुपयाची डीलर च्या नावाची सचिनच्या तोंडावरील भाव झरझर बदलत होते. त्याने विश्वासाने व आनंदाने आई-बाबा या दोघांकडे बघितले आणि बाबा आई त्याच्या तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हते.

आई ने कौतुकाने त्याच्या पाठीवर हात फिरवला तर बाबांनी थोडस हसून त्याला आधार दर्शवला. थँक्यू आई थँक्यू बाबा सचिन म्हणाला. चल सचिन निघायच ना अनिलच्या या शब्दांनी सचिन मनातून बाहेर आला. थोड्याच वेळात ते दोघ शेजारीच असलेल्या ऑटो गॅरेज मध्ये पोहोचले हरीला एक्टिवा ज्याची होती त्याने चौकशी करून विचारल व्हाईट कलर मध्ये ॲक्टिवा मिळेल का?

त्यावर मालक म्हणाला खर तर तुमच नशीब चांगल आहे. कालच एक वाईट ॲक्टिवा बुकिंग कॅन्सल झाली. मालकाने बुकिंग रजिस्टर दाखवलं आणि म्हणाला बघा हे नावाच बुकिंग कॅन्सल झाले आहे. सचिन ने ते बुकिंग कॅन्सल करणाऱ्याच नाव बघितलं विनायक पाटील त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो परत ते नाव बघत होता त्याला लगेच समजल म्हणजे बाबांनी पांढरी एक्टिवा बुक केलेली होती.

बाबांचा हा पांढरा रंग खूप खूप आवडता होता. किती आधी बुक केली असणार बाबांनी ही गाडी? सचिनला गहिवरल्या सारख झाल. एक दोन वेळेस बाबा त्यांच्या मित्रासोबत गाडीवर बसून समुद्र कडे गेले होते. आईने विचारल कुठे चाललाय तर त्यांनी आहे आमची गंमत असं म्हणून आईला टाळल होते. तेव्हा सचिनला समजल की, ते समुद्राकडे त्यांच्या मित्रासोबत स्कूटर शिकायला जात होते.

टीव्हीवर स्कूटरची जाहिरात लागली की ते डोळे बघून पाहणारे बाबा त्याला आठवले. बाबांच्या बेडवर पडलेल वर्तमान पत्रातील स्कूटर च चित्र त्याला आठवल. बाबा कामाला जायला सायकलचा वापर करत होते. रात्री येताना त्यांचा शर्ट घामाने पूर्ण भरून जायचा. त्यांना रात्री आल्यावर खूप दमल्यासारखे वाटायच. कित्येक वर्षापासून त्यांचा स्वप्न असेल की स्कूटर घ्यायच.

आपल्या मित्रांच्या बायका गाडी वर फिरतात मात्र आपल्या बायकोची ताई भेट आपण थांबवू शकत नाही. ही खंत त्यांच्या मनाला वाटत असेल का? कधी मित्रांसोबत प्रॅक्टिस ला जाताना कधी आपण घरच्यांना सरप्राईज देऊ हे स्वप्नही त्यांनी आपल्या मनात रंगवलेली असेल.

त्यांचे कित्येक वर्षाचे स्वप्न त्यांनी माझ्यासाठी दाबुन टाकल. सचिनचा ऊर भरून आला आणि डोळ्यात थोडे अश्रू दाटले होते. हातात धरलेल्या लॅपटॉपवर त्याची बोट घट्ट होत गेली. जणू काही तो बाबांचा हात पकडून त्यांना सांगत होता बाबा मी करेल तुमचं स्वप्न पूर्ण वचन आहे माझ.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *