अंगावर शहारा आणणारा थरारक स्वामी अनुभव. सत्यघटना

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आजच्या या कथेमध्ये आपले स्वामी आपल्या भक्तांसोबत कसे पदोपदी सोबत असतात ते समजणार आहे. हा अनुभव मिरज येथील स्वामी बाप्पा कुलकर्णी या दादांचा आहे. ते सांगतात २०१४ साली मी बीकॉम मध्ये प्रवेश घेतला होता. व त्याच वर्षी माझ्या बाबांना कॅ-न्स-र झाला. सुदैवाने स्वामी कृपेने ते त्यातून बाहेर पडले. या गोष्टीतून ते बाहेर पडत नाही तोच त्यांना हा-र्ट अ-टॅ-क आला.

तो इतका जोरदार होता की त्यांना ते ४० हजार रुपयांचा इंजेक्शन द्यावे लागल. थोड्या दिवसांनी बाबांना डिस्चार्ज मिळाला डिस्चार्ज मिळाल्यावर बाबांना दोन-तीन पावलेही चालता येत नव्हत. मग डॉक्टरांनी एन्जोग्राफी करण्याचा सल्ला दिला. एन्जोग्राफी केली त्यात १००% ब्लोकेजेस दाखवले. मग आम्ही पुढच्या उपचारासाठी बेलगाव ला जायचे ठरवले.

मी लहान होतो व सोबत दोन बहिणी होत्या. लोकांनी मनात भीती घातली ते हॉस्पिटल अस आहे तस आहे तेथे खूप पैसे लागतात. आम्ही गाडीत बसलो बेळगाव ला जायला. मी स्वामींना आठवल आणि म्हटल तुम्ही पाठीशी असाल तर ऑपरेशन होऊ देऊ नका आणि बेलगावात हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तेथे दीक्षित म्हणून डॉक्टर होते.

ओळखीमुळे ऑपरेशन करण्यास मदत झाली. त्यांनी खर्च सांगितला, पैसे भरले. मिरजमधून मित्रांना जमवून रक्त दिल. मला भीती वाटत होती म्हणून भाऊजींना थांबवून मी मिरजला आलो. दुसऱ्या दिवशी सर्व तयारी झाली डॉक्टरांनी बाबांना आत घेतल. सर्व मशीन लावल्या आणि डॉक्टरांनी एन्जोग्राफी ची सिडी बघितली व ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला.

आम्ही आमच्या रिस्क वर ऑपरेशन करायला म्हटलो पण डॉक्टर म्हणाले मी माझा चाळीस वर्षाचा अनुभव सांगतोय मी जर या माणसाला कापल तर याचा जागीच मृ-त्यू होईल हसत खेळत माणसाला मारणार नाही, तरी आम्ही म्हणालो ऑपरेशन करा. पण डॉक्टरांनी नकार दिला.

तेव्हढ्यात मला भाऊजींचा कॉल आला. त्यांनी मला सर्व सांगितले पैसे भरून सुद्धा कस ऑपरेशन होणार नाही तेव्हा मी स्वामींना विचारले हे तुम्हीच केलय का? स्वामींच्या फोटोवरून एक फुल पडले व मी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर बाबांनी फक्त सहा महिने औषध घेतले असेल पण त्यानंतर बाबांनी कसलीही एक गोळी घेतली नाही.

त्यानंतर रोज दोन किलोमीटर चालण होत कारण स्वामी आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यानंतर ते सहा वर्षे एकदम ठणठणीत आहे. काम करतात स्वामींची सेवा करतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *