हृदयीस्पर्शी कथा- मुलीच्या सासरच्यांनी मुलीच्या बाबांना लग्नाआधी एक दिवस बोलावून घेतले.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा जावई हा सुंदर सुशील व चांगल्या घराण्यातील होता. त्याच्या आई वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद तर होताच पण मुलीला भेटणार्‍या चांगल्या सासर मुळे त्यांच्या डोक्यावरच अपेक्षांच ओझ कमी झाल. एक दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी मुलांकडून मुलीच्या वडिलांना जेवणाला बोलावण्यात आले होते.

त्यांची तब्येत खराब होती तरीही त्यांना तब्येतीच कारण मुलांच्या घरच्याला देता आल नाही. मुलाच्या घरच्यांनी यांच मोठ आदरसत्कारान स्वागत केल. मग मुलीच्या वडीलांसाठी चहा आणण्यात आला मधुमेहामुळे वडिलांना साखर आधीच वर्जित करण्याला सांगितले होते. परंतु आपल्या पहिल्या मुलीचे लग्न होते व मुलांकडे च्या विनंती ला मान ठेवून त्यांनी कप चहा पिऊन घेतला.

चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटले चहामध्ये साखर अजिबात नव्हती. उलट वेलदोडाच्या पुडचा वास येत होता. त्यांनी विचार केला की हे लोक सुद्धा आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात दुपारच जेवणही घरच्या सारखच होत. जेवणानंतर त्यांना आराम करता यावा म्हणून त्यांना डोक्याखाली एक उशी देण्यात आली.

आराम करताना त्यांना बडीशोप पाणी दिल. मुलीच्या सासरवाडी तुन निघतांना त्यांच्या मनात एक प्रश्न आला की, माझ्या मुलीच्या सासरच्यांना कस माहित की मला काय चालत काय नाही, शेवटी त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला. सासुबाई म्हणाली काल तुमच्या मुलीचा फोन आला होता ती म्हणाली माझे सरळ साधे बाबा काही म्हणणार नाही.

पण त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वर्गवासी आईच्या फोटो वरील हार त्यांनी काढून टाकला. हे सर्व बघून पत्नी म्हणाली हे तुम्ही काय करत आहात?

मी म्हणालो माझी आई अजून मेलेली नाही ती माझी काळजी घेत आहे. ती लेकीच्या रूपात याच घरात आहे. जगातील सर्व जण म्हणतात ना मुलगी ही परक्याचे धन असते नेहमी आपल्या आई-वडिलांना सोडून जाते पण मी सांगेल मुलगी ही कधीच आपल्या आई-वडिलांना सोडून जात नाही. तर ती त्यांच्या हृदयात राहते आज मला अभिमान वाटतो आहे की मी एका मुलीचा बाप आहे.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *