हृदयीस्पर्शी कथा- को-रो-ना-मुळे अनाथ झालेल्या मुलाचे काळीज पिळवटून टाकणारे बोल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

आई बाबा मी अथर्व बोलतोय आज तुमची खूप आठवण येत आहे. मला खूप रडायला येते तुम्ही कुठे आहात मी कोणाला सांगू तुम्ही लवकर या ना मला घेऊन जा इथून मला इथे राहायच नाही. तुम्हाला येत नाही का माझी आठवण, तुम्ही मला दिसत का नाही. मला घेऊन जात का नाही, असे एकट्याला सोडून जातात. आता माझे कोणी लाड करत नाही माझे हट्ट पुरवत नाही, तुम्ही या आणि मला घेऊन जा.

इथे मिच नाही माझ्यासारखे खूप मुले आहे ज्यांना त्यांचे आई-बाबा दिसत नाही. तूम्हीच नाही तर आम्ही कसे राहणार तुमच्याशिवाय आई तू बाबांना घेऊन लवकर ये. तू ऑफिसमधून येताना मी तुझी किती वाट पाहतो. तसाच मी खिडकीत बसून तुझी वाट पाहत आहे. मला आठवत आपण त्यादिवशी किती मजा केली ना तू गुलाब जामून केले होते.

बाबांना आवडते म्हणून भाकरवाडी केली होती. बाबा येण्याची वाट पाहत होतो, आपण दोघ ते आले तेव्हाच मला वाटले की त्यांची तब्येत बरी नाही हसत-खेळत जेवण तर केल आपण पण दुसर्‍या दिवशी त्यांना बर वाटत नव्हत. तु बाबांना सुट्टी घ्यायला सांगितले ना त्यांनी तसे ऑफिसला कळवले होते बाबांना थोडाफार ताप खोकला होता. मी खेळता खेळता तुमच्याजवळ यायचो.

किरकोळ वाटले म्हणून दवाखान्यात गेले नाही. पण दुसऱ्या दिवशी तू लगेच दवाखान्यात बाबांना घेऊन गेली. ऑक्सीजन लेवल सिटी स्कोर सर्व काही ठीक होते. डॉक्टरांनी बाबांना आठवड्याची औषधे दिली पण औषधे संपले तरीही बाबांना बर वाटत नव्हत. प्रचंड वीकनेस कफ खोकला जेवण बिलकुल जात नव्हत. म्हणून परत डॉक्टरांकडे गेलो.

डॉक्टरांनी को-रो-ना टेस्ट करायला सांगितली होती. दुर्दैवानं ती पॉझिटिव्ह आली त्यामुळे डॉक्टरांनी तुला ही टेस्ट करायला सांगितली. तूला जास्त काही त्रास होत नव्हता. पण तुझीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आता फक्त मी राहिलो होतो. तुमच्या दृष्टीने मी नशीबवान होतो की माझी टेस्ट निगेटिव्ह आली. पण मी आता स्वतःला कमी नशीबवान समजतो तुमच्या शिवाय हे दिवस जगण्याची वेळ आली नसती.

तुम्ही दोघे एकाच रूम मध्ये ऍडमिट होताच माझी रवानगी आईच्या मैत्रिणीकडे झाली. मी तिकडे राहत तर होतो पण तुमच्या येण्याची वाट पाहत होतो. पण काय झाले कसे झाले बाबांची तब्येत अचानक बिघडली ऑक्सिजन लेवल अचानक कमी झाली. त्या गोष्टीचे आईने टेन्शन घेतले त्यात माझी ही काळजी परिणामी दोघांचीही तब्येत खराब झाली आणि तुम्ही मला काही न बोलता न सांगता निघून गेला.

मावशी फक्त माझ्याकडे बघून रडायची मला एवढेच समजत होत. ती मला काहीतरी सांगायची मला ते काहीच कळत नव्हत मी रोज तुमच्या येण्याविषयी विचारायचो तिला पण ती मला काहीच सांगत नव्हती. एक दिवस मावशीच्या घरी तीन लोक आले एक जेंट्स आणि दोन लेडीज मावशीने त्यांच्याबरोबर पाठवून दिले मला तिथे माझ्यासारखी भरपूर मुले होती.

बरोबरच काकांनी माझी आणि त्यांची ओळख करून दिली. लगेच त्यांनी मला खेळायला ही बोलवले. ते बालकांचे अनाथाश्रम होते. ज्यांचा आधार नाही त्यांचा आधार होते ते मुलांशी बोलता बोलता मला खात्री झालेली आहे की, तुम्ही दोघे परत कधीही येणार नाही. पण तुमच्या लाडक्या अथर्व साठी तुम्ही एक दिवस नक्की येणार. तर मी तुमची वाट बघतो आमच्यासारख्या अनाथ मुलांची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे पण तुमच्यासारखे आई-बाबा कुठून आणतील ते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *