७/१२ वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? अशी करू शकता ७/१२ नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ७/१२ हा शेतकर्‍यांच्या मालकी हक्काचा भक्कम पुरावा आहे. परंतु या सातबार्‍यावर खूप वेळा शेतकऱ्यांची चुकीची नाव आलेली असतात किंवा चुकीच्या वारसदाराचे नाव लागलेली असते. या प्रकारच्या अनेक समस्या सातबारा च्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मनात आहे.

या चुका दुरुस्त कशा करावा या संदर्भात आम्ही तुम्हाला आज या लेखात माहिती देणार आहोत. अधिकार अभिलेखात (७/१२) किंवा एखाद्या महसूल नोंदवही जर काही चूक झाली असेल किंवा एखादा लेखन लिहतांना चूक झाली असेल तर महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ ने अशी चूक किंवा लेखनप्रमाण दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करता येतो.

म्हणजेच कोणत्याही प्रकारची सातबाऱ्यावर ची चूक बरोबर करण्यासाठी आपल्याला तलाठी कडे अर्ज करण्यात काही उपयोग नाही आहे. आपल्याला थेट तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो आणि संबंधित प्रकरणाची नोंद संबंधित तलाठ्याला तहसीलदार देत असतात.

अशा चुका दुरुस्त करण्यापूर्वी काही हितसंबंधी यांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा चुका किंवा लेखन प्रमाणात झाल्याचे संबंधित पक्षकारांनी कबुली केली पाहिजे. म्हणजे मित्रांनो तुमच्या शेतीच्या सातबारा यात जर चुकून एखाद्याचे नाव लागलेले असेल तर त्यांनी कबुली दिली पाहिजे.

म्हणजेच तहसीलदार त्या व्यक्तीला आधी नोटीस बजावतात तर त्या व्यक्तीला आपल नाव कमी करण्यासाठी कोणताही आक्षेप नसेल तर ते नाव कमी केल जात. तर सात बारावरील कोणकोणत्या चुका दुरुस्त करता येतात याविषयीची माहिती आपण बघणार आहोत.

१) ७/१२ पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव लिहिण्याचे राहून जाणे.
२) एखाद्या ७/१२ सदरी असलेली काही नावे कमी करण्याचा आदेश झाला होता. परंतु त्या आदेशानुसार अशी नावे कमी करण्यात आली नाहीत.

३) एखाद्या जमिनीची कलम ३२ ग नुसार ठरलेली रक्कम मूळ मालकाला दिल्यानंतरही मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात राहिले.
४) नोंदणीकृत दस्त यातील मजकुरात असणारा एखादा उल्लेख फेरफार सदरी
५) फेरफार सदरी नोंदविलेले एखाद्या वारसाचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यात आलेले नाही. इत्यादी

यावरून असे लक्षात येते की, कुठेतरी मूळ दस्तावेज आदेशात केलेला उल्लेख किंवा आदेश नोंदणी विण्यात चूक झाली असेल तरच सर्व हितसंबंधाचे म्हणणे विचारात घेऊन अशी चूक किंवा लेखन प्रमाण दुरुस्त करता येतो. म्हणजेच यामध्ये मूळ अभिलेखा मध्ये पूर्वीचे जे रेकॉर्ड होते त्यामध्ये तुमचे नाव व्यवस्थित असेल.

तुम्ही जी चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला आहे ती चूक झालेली असेल मूळच्या अभिलेखात ती असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज करून त्या सातबारा वरची चूक दुरुस्त करता येते. अशाप्रकारे ज्यांचे ज्यांचे नाव कमी होणार आहे त्या हितसंबंधांना आधी नोटीस देऊन बजावले जाते आणि त्यांचा कोणताही आक्षेप नसेल तर अशा प्रकरणावर कार्यवाही केली जाते.

कधी कधी एखादा खरेदी-विक्री व्यवहार झाल्यानंतर खरेदी घेणारा स्वतःचे नाव सातबारा साजरी दाखल झाल्याची खात्री करीत नाही. त्यामुळे खरेदी देणारा मूळ मालकाचे नाव ७/१२ सदरी तसेच राहते. याचा फायदा घेऊन खरेदी देणार (मूळ मालक) त्याच जमिनीची विक्री अनेक लोकांना करतात.

कायद्यानुसार जरी प्रथम खरेदी घेणाऱ्याचे नाव ७/१२ सदरी दाखल होणे आवश्यक असली तरीही अशा अनेक खरेदी-विक्री व्यवहारा मुळे पुढे अनेक प्रकारची कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाने आपण केलेल्या व्यवहाराची नोंद गाव दप्तरी योग्य प्रकारे नोंदली गेली आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.

म्हणजेच आपण एखाद्या जमिनीची खरेदी करतो आणि आपले नाव सातबाऱ्यात लावले आहे की नाही याची व्यवस्थित खात्री करत नाही. यामुळे आधीच्याच मालकाचे नाव सातबारावर राहते आणि तो या जमिनीची अनेक लोकांना विक्री करू शकतो.

अशा प्रकारे हे पूर्वी जास्त घडत होते. पण आताच्या काळात सर्वजण जागृत झाल्याने हे प्रकार खूप कमी आहेत. दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन करण्यात येते. असे पुनर्लेखन झाल्यानंतर प्रत्येक खातेदाराने ७/१२ ची नक्कल घेऊन आपल्याशी संबंधित सर्व नोंदी योग्य प्रकारे नोंदविल्या गेल्या आहेत किंवा नाही याची खात्री करावी.

दरवर्षी वेळोवेळी ७/१२ ची नक्कल घेऊन सर्व नोंदीची खातरजमा करावी. याबाबत काही संभ्रम असल्यास तात्काळ तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजेच दहा वर्षांनी आपण नवीन सातबारा घेतलाच पाहिजे आणि त्या सातबाराचे व्यवस्थित वाचन केले पाहिजे.

अनेक शेतकरी असे आहेत त्यांनी आतापर्यंत त्यांचा शेताचा किंवा इतर सातबारा वाचून बघितलेला नाही आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्या येतात. तर अशा प्रकारे तुमच्या सातबाऱ्यात कोणत्या चुका झाल्या असतील तर कलम १५५ व तहसीलदार यांच्याकडे अर्ज लिहून या सर्व चुका दुरुस्त करता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *