२४ जून मोठा गुरुवार वटपौर्णिमा अशी भरा देवीची सौभाग्याची प्राप्ती होईल.

Astrology

मित्रांनो नमस्कार

२४ जूनला वटपोर्णिमा आहे महिलांचा एक खास दिवस विवाहित महिलांसाठी हा खास दिवस आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात. कामना करतात की पतीचे आयुष्य मिळूदे त्याला दीर्घायुष्य लाभु दे. या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदैवतेची किंवा लक्ष्मीची किंवा तुम्ही कोणत्या देवीला मानत असणार त्या देवीची जर पूजा केलीस व ओटी भरली तर तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल.

पतीचे आयुष्य वाढेल आणि ओटी फक्त विवाहित महिलांनीच भरायची आहे. २४ जून गुरुवारच्या दिवशी ही वटपौर्णिमा येत आहे हा खूप मोठा दिवस आहे वटपौर्णिमेला तुम्हीसुद्धा विवाहित महिला असल्यास देवीची ओटी भरा सोप्या पद्धतीने भरा व घरच्या घरी भरा. देवीच्या फोटो समोर बसून तुम्ही ओटि भरू शकता.

ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक नारळ आणि साडीची गरज पडेल, साडी नवी पाहिजे, साडी नसेल तर एक ब्लाउज पीस असेल तरी चालेल पण तुम्ही ओटी घरी देवीसमोर राहूनच भरा. साडी असेल किव्वा ब्लाउज पीस ते दोन्ही हातांनी देवीसमोर ठेवा.

त्यावर नारळ ठेवायचे नंतर पाच किव्वा सात मुठ तांदूळ किव्वा गव्हाचे टाकायचे. कुंकवाने या ओटी ची पूजा करावी आणि अशाप्रकारे सोप्या रीतीने ओटी भरावी. एक दिवस ती ओटी देवी समोरच राहू द्यायची नंतर दुसऱ्या दिवशी ते गहू किंवा तांदूळ जे काही टाकलेले असते ते आपल्या धान्यमध्ये मिक्स करून टाकायच.

नारळ असेल तर ते फोडून घरातील सर्व सदस्यांना त्याचा प्रसाद द्यावा आणि देवीचा आशीर्वाद समजून महिलेने वापरायला सुरुवात करावी. तर अशा पद्धतीने २४ जून वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी सोप्या पद्धतीने ओटी जरूर भरा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *