कानात कोणत्याही प्रकारचा किडा गेल्यास हे उपाय करा. किडा लगेच बाहेर येईल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

पावसाळा सुरू होताच किडे बाहेर पडायला सुरुवात होते. पावसाळ्यात शेतकरी शेतात शेतीची कामे करत असतो. पिकांची लागवड पिकाची फवारणी, तर शेतात झोपलेले असताना किंवा रात्री अचानक झोपेत असताना गोम किंवा किडा कानात जातो. अशा वेळेस खूप त्रास होतो. या वेळेस योग्यवेळी उपचार केल्यास खूप फायदा होतो.

पुढे होणाऱ्या समस्या टाळल्या जाऊ शकतात. एखादी गोम किंवा किडा कानात जातो. तेव्हा त्या व्यक्तीला खूप वेदना सहन कराव्या लागतात. चक्करही येऊ शकतात अशा वेळेस त्या व्यक्तीस धीर देने खूप महत्त्वाचे आहे. न घाबरून जाता ज्या बाजूने सूर्यप्रकाश आहे. त्या बाजून आपला कान ठेवावा. कारण कीडा किंवा गोम असते ते प्रकाशाकडे आकर्षित होतात.

हे केल तरीही किडा बाहेर न आल्यास कानात काडी किंवा दुसर काही टोकदार वस्तू घालू नका. असे केल्याने तो किडा उलट आतच अडकून राहील. बऱ्याच वेळा कानात माशी गेली की ते मरते व कधी कधी मरत ही नाही. अशा वेळेस कानात खूप वेदना होतात या वेदना कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत.

कानामध्ये किडा गेल्यास मीठ आणि पाणी एकत्र करून टाकल्यास याने कानात गेलेले गोम, किडा किंवा इतर जीव बाहेर येतात. दुसरा उपाय तो म्हणजे अशावेळी कानामध्ये थेंब थेंब कोमट पाणी टाका असे केल्याने किडा बाहेर यायला खूप मदत होते. कानात कोणता कीडा गेल्यास आपण तो बाहेर काढण्यासाठी तेलाचा ही वापर करू शकतो.

यासाठी तुम्हाला मोहरीच तेल वापरायच आहे. ज्या कानात किडा गेला आहे तो कान प्रकाशाकडे ठेवावा. बऱ्याचवेळा ज्या कानात किडा गेला आहे त्या कानाच्या विरुद्ध बाजूने, कानावर मारल्यावर किडा बाहेर येण्यास मदत होते. पण असे करूनही किडा बाहेर येत नसेल तर तुम्ही ज्या कानात किडा गेलेला असेल त्या कानावर झोपला तरी किडा बाहेर पडायला मदत होते.

तिसरा उपाय तो म्हणजे आपल्याला पांढऱ्या रुईचे पान आणायची आहे व ती तव्यावर गरम करून घायची आहे. गरम केलेल्या रुईच्या पानांचा रस जर कानात दोन ते तीन थेंब टाकला तर कोणत्याही प्रकारचा किडा कानातून बाहेर येण्यास मदत होते. व किडा मरून जातो. तसे बघायला गेलं तर कीडा जास्त कानामध्ये जाऊच शकत नाही.

हे वरील सर्व उपाय करूनही किडा बाहेर येत नसेल तर कान हा नाजूक भाग आहे त्वरित डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपाय करून घ्या.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *