पूजा करताना दिवा असा जळत असेल तर साक्षात महालक्ष्मी घरात निवास करते.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण दिवा लावल्याशिवाय केलेले कोणतेही पूजन अपूर्ण असते. आपण जे काही पूजा करतो ते सर्व पूजा भगवंतापर्यंत पोहोचविण्याचे कार्य दिव्या मार्फत होत असते. म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा.

तेलाचा दिवा तुपाचा दिवा कोणता लावावा. दिवा लावल्याने कोणकोणते लाभ होतात आणि दिवा कसा लावावा ज्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल हे सर्व पाहणार आहोत. घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आपण देवघरात दिवा लावतो तो दिवा लावण्यापूर्वी पुसून लख्ख करावा व तो दिवा लावावा दिवा कुठेही तुटलेला फुटलेला तेल गळणार असू नये. काही घरांमध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो तोच दिवा सतत लावला जातो. यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. कारण जेथे स्वच्छता असते अशा ठिकाणी भगवंतांचा वास असतो.

म्हणून घरात दोन दिवे ठेवावे. दिवा घासूनपुसून बदलावा काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो असे दोन दिवे लावले जातात. तेलाचा दिवा हा संकटे अडचणींपासून सुटका मिळविण्या साठी लावला जातो. तर तुपाचा दिवा हा संपत्ती मिळविण्या साठी साठी लावला जातो.

ज्यांच्या घरी शुद्ध गाईचे तूप असते त्यांनी दररोज शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा. परंतु आजकाल सर्वच गोष्टींमध्ये भेसळ येत असल्याने सर्वजण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात. परंतु ज्यांच्या घरी गाईचे तूप आहे त्यांनी गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे अनेक फायदे होतात.

तेलाचा दिवा तुपाचा दिवा या प्रकारचे दोन दिवे असतात पण कोणता दिवा कोणत्या दिशेला लावायचा हे कोणालाच माहीत नसते. या दिशे नुसारच तुमची पूजा नुकसानदायक किंवा लाभदायक ठरू शकते. तुपाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला व तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा.

आपण मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला हे लक्षात येते. अशाप्रकारे दिवा लावल्यास आपल्याला लाभ होतात. त्याबरोबरच दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याविषयीही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आणि ज्या वेळेस आपण देवघरात दिवा लावतो. तेव्हा त्या दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत कधीही असू नये. पूर्व किंवा उत्तर दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात व आपल्या मनोकामनाची ही पूर्ती होते.

चुकीच्या दिशेला दिव्याची ज्योत लावल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. अशा प्रकारे तुपाचा दिवा लावल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात व सुख-समृद्धी तही वाढ होते आणि तेलाचा दिवा लावला तर आपला सर्व कष्ट बाधा व अडचणीचे निवारण होते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

परंतु दिवा लावताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे की एकाच दिव्यात कधीही तूप व तेल एकत्रित करू नये. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तूप टाकू नये आणि तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेल टाकू नये.

तुपाचा व तेलाचा दिवा वेगळाच असावा जो व्यक्ति नियमितपणे देवाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते व त्यांच्या संकटाचे निवारण होते. परंतु या गोष्टीकडे लक्ष द्यावे की कोणतेही कार्य करतांना नियम पूर्वक योग्य पद्धतीने केले तरच त्याचे फायदे तुम्हाला मिळणार.

तुम्ही खूप कष्ट करता परंतु त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल परंतु नोकरी मिळत नसेल. तुम्ही कर्जबाजारी झाला आहात अशा वेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मी समोर दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा.

परंतु यातील दिव्याची वात ही लाल रंगाच्या दोऱ्याची असावी. यासाठी तुम्ही लाल रंगाच्या कापडाचा वापर करू शकता कापसाची वात नसावी. शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने त्याचे खूप फायदे होतात. या दिव्याची रोज हळद कुंकू लावून पूजा करावी. रोज नियमपूर्वक अश्याप्रकारे दिवा लावल्यास त्याचे पूर्ण फायदे आपल्याला होतात.

या दिवा लावण्याचे फायदे बघून तुम्ही स्वतः चकित होणार धनाची वाढ होईल व तुमची प्रगती होईल. अशाच प्रकारे तुमच्यावर काही मोठे संकट आले असेल, तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर हनुमानजी जवळ लाल रंगाच्या वातीने चमेलीच्या तेलाचा तीन मुखी दिवा लावावा.

यामुळे आपल्यावर हनुमानजींची कृपा होते व आपली भीती व कष्ट दूर होतात. हा उपाय तुम्ही हनुमानजी यांना प्रसन्न करण्यासाठी व मनोकामना पूर्ती साठीही करू शकतात. चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने कोणतीही अनामिक भीती दूर होते सोबतच खूप दिवसांचे आजारपनही दूर होते, सोबतच मनोकामना ही पूर्ण होतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *