भावाच्या संपत्तीवर बहिणीने हक्क मागितला आणि पुढे जे झाले ये पाहून डोळ्यात पाणी येईल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

ताईच्या मुलाचे लग्न झाल्यावर पहिलीच दिवाळी होती. सुनेचा भाऊ घरी येणार म्हणून आज चुलीवर मटण शिजवायला घेतल होत. सुनेने न राहून विचारले आई आज सगळ जेवण चुलीवरच का करताय? नाही म्हणजे चुलीवरच जेवण तस भारीच असत पण घरातून सर्व चुलीजवळ आणण हे सर्व कष्ट का करताय?

आईच्या ऐवजी मुलानेच उत्तर दिल आज जशी तुझी लग्नानंतर पहिली दिवाली आहे. तसेच आईच्या पहिल्या दिवळीपासून भाऊबीजेला सर्व चुलीवरच बनवल जात. तेव्हा ३० वर्षापूर्वी आपल्या आजीन आईला सांगितले होते तुझा भाऊ येणार आहे म्हणून सर्व चुलीवरच करायचे.

मुलाने आईला विचारले काय मग आई आजतरी बाळा मामा येईल का? तो नाही आला तरी त्याची गाडी येईलच ताईचे लग्न झाल्यापासून तिच्यावरून २ वर्ष लहान असलेला बाळा तिला नेहमी माहेरी न्यायला येत असे. गेल्यावर्षी तर नवीन कार ने तो आपल्याकडे आला पण कोणालाही बसू दिले नाही.

त्याने घरात जाण्यापूर्वी ताईला गाडीत फिरवल मगच घरात गेला. मागील तीस वर्षे बाळा ताईकडे तिला न्यायला यायचा आणि म्हणायची पोरी या बाळाला मी गेल्यावर पण मटणाचा डबा भरून देत जा. ताईचे लग्न ठरल्यावर बाळा कावरा बावरा झाला होता पाहुण्यांची काळजी घेतांना आता जेवणार तेव्हा जेवणार असे करत करत उपाशीच राहायचा.

ताईने लावलेली माया त्याला उमजू देत नव्हती. ती सासरी जायला निघाल्यावर तो हमसून हमसून रडला होता. भाऊच्या या आठवणीने ताईच्या डोळ्यात पाणी आले. २ वर्षपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक लढवली व तो निवडून आले. त्यापासून बाळाचे दिवस बदलले घरच अगोदर पासून खूप चांगल होत. भरपूर शेती व वडिलोपार्जित घर होते.

बाळाला गरजेपेक्षा जास्त पैसे मिळू लागले आणि गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाल्याने बाळाची हाव वाढली. जमिनीचे भाव एव्हढे वाढू लागले की चार वर्षांपूर्वी जेव्हढा भाव एकरला होता तो आता गुंठ्याला होता. ग्रामपंचायत वाल्यांनी बाळाला त्याच्या वडिलोपार्जित जमिनीचा हिशोब सांगितला व त्यात तुज्या बहिणीचा ही अर्धा हिस्सा असेल असे सांगितले.

एका दिवशी बाळाच्या पोराने आणि बायकोने आत्याच्या हिशाबद्दल प्रश्न काढलाच. आणि काय तो एकदाच सोक्ष मोक्ष लावण्यासाठी कटकट सुरू केली. ताईचे सर्व समान आहे तिला आपल्या जमिनीत कोणताही हिस्सा नको असेल तुम्ही एकदा बोलून तर पहा.

बाळाची ताईकडे बोलण्याची हिम्मतच होत नव्हती. एकदिवस बाप काही विचारात नाही म्हणून बाळाच्या पोराने ताईच्या मुलाला फोन केला आणि त्याला सांगितले आत्याला आमच्या प्रॉपर्टी मधून नाव कमी करायला पाठव ताईच्या मुलाने लगेच प्रश्न केला तुमची कोणती प्रॉपर्टी? आजोबांची प्रॉपर्टी ताईचा मुलगा लगेच म्हटला ती प्रॉपर्टी मामा आणि आईची आहे ते दोघे ठरवतील काय करायच तू कशाला मध्ये पडतोय?

ताई आणि बाळा दोघांनाही पोरांनी त्यांच झालेलं बोलण सांगितल. तेव्हापासून ताई आणि बाळा फोनवर सुद्धा एकमेकांशी बोलले नाही आणि काहीही विचारपूस नाही. जसजशे ९ वाजायला लागले आईचे हृदयाचे ठोके वाढू लागले मुलाने विचारले होते काय मग आई आज तरी बाळा मामा येईल का?

या प्रश्नाला बाळाने येऊन चोख प्रतिउत्तर द्याव अस आईला मनोमन वाटत होत. बरोबर ९ वाजता तिला बाळाच्या कारचा आवाज येऊ लागला ती बघायला गेली तिला धक्काच बसला. गाडीत बाळा नव्हता त्याच्याऐवजी तिचा चुलत भाऊ आला होता ताईने त्याला ओवाळले. ओवळताना तिला बाळाच्या आठवणीने अश्रू अनावर झाले पण तो का आला नाही तिने चुलत भावाला एका शब्दानेही विचारले नाही.

चुलत भाऊ जाताना तिने बाळासाठी मटनाने भरलेला डबा दिला व सोबत दोन पाकीटही दिली. दुसऱ्या पाकिटावर लिहिलेल होत पाहिल पाकीट फोडल्यावरच हे पाकीट फोड बाळाला ताईने भरून दिलेला मटणाचा डबा दिसला. त्याने अश्रुंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहिल पाकीट फोडल त्यात एक स्टॅम्प पेपर होता त्यावर लिहिले होते मी खाली सही करणार सौ ताई पाटील मी स्वखुशीने माझी वडिलोपार्जित जमीन व त्यांच्या घरावरील हक्क आज पासून सोडत आहे.

माझा भाऊ बाळा पाटील यांच्या नावे माझा हिस्सा करण्यास मला कोणतीही हरकत नाही. खाली सही होती ताई पाटील साक्षीदार होता रामचंद्र कान्हा पाटील स्टॅम्प पेपर वाचून बाळाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आल्या त्याने दुसर पाकीट घाईघाईन उघडल.

त्यात लिहिल होत बाळा मला माहित आहे तुझ्या मुलाने माझ्या मुलाला केलेला फोन यातून तुझ्या मनाची घालमेल झाली व तुला नैराश्य आले. बाळा दिलेला डबा खाऊन घे. आणि हात धुवून लगेच मला घ्यायला ये मी तुझी वाट बघतेय मानाने माहेरी यायला.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *