याने १ गुळणा करा हलणारे दुखणारे दात मजबूत होतील, तोंडाच्या सर्व समस्या निघून जातील, कीड गायब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज मी तुम्हाला अशा एक वनस्पतीच्या साला बद्दल सांगणार आहे. जी तुम्ही पाण्यात उकडून तिचा काढा पिल्याने तुमचा जो दुखणारा दात असणार तो पूर्णपणे दुखणे बंद होईल. दात खाण्याची समस्या असेल किंवा दातामध्ये कीड लागलेली असेल तर तेही पूर्णपणे बंद होणार.

सोबतच तोंडामध्ये जे फोड पडतात तोंड येते तोंडाला घरे पडतात ती समस्या ही पूर्णपणे बरी होणार. आणि उष्णतेचा जो त्रास होतो तो ही निघून जातो. ही वनस्पती आपल्याला सहजरीत्या उपलब्ध असते. आणि या वनस्पतीची जी साल आहे ती कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात आपल्याला सहज रित्या उपलब्ध होते.

या वनस्पतीचा वापर खूप जुन्या काळापासून केला गेला आहे तर दात दुखी ची तुम्हाला ही समस्या असेल तर दात दुखत असतो, दातातून सतत कळा येत असतात. तुम्हाला कधीकधी असह्य वेदना होतात दात हालत असतानाही आपल्याला कधी कधी खायला त्रास होतो किंवा हलणारा दात असतो तो कधी कधी पडुन जातो.

तेव्हा या साली पासून आपल्याला तो दात वाचवण्यास मदत होणार. त्या साली च नाव आहे खैर या वनस्पतीची साल खैर हे वनस्पती कुठेही उपलब्ध असते. खैराची साल ही आयुर्वेदामध्ये खूप वर्षापासून वापरण्यात येत आहे तर अशी खैराची साल आपल्याला आणायची आहे.

ताजी असली तर अतिउत्तम त्यानंतर एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये ५० ग्रॅम खैराची साल टाका. हे पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे. त्यानंतर ही साल त्या पाण्यामध्ये उकडल्यानंतर ते पाणी आपल्याला कोमट करायच आहे आणि त्या पाण्याने आपल्याला गुळणा करायचा आहे.

या खैराच्या सालीमुळे तोंडामध्ये जे फोड येतात तोंडाला घरे पडतात किंवा जो दात हलतो यापासून त्वरित आराम मिळतो. खैराची साल ही तोंडाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे खैराची जी पान असतात ती आपण चावून थुंकून दिली तरी आपल्याला आपल्या दातातील दुखणे व फोड यांवर आराम मिळतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *