घरामध्ये काढा ही शुभचिन्हे सर्व वास्तुदोष आणि घरातील सर्व कटकटी दूर होतील..

Astrology

श्री स्वामी समर्थ.

आपल्या घरामध्ये ही शुभचिन्ह काढा घरातील वास्तुदोष दूर करा आणि आपल्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करा. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवा.पण त्यासाठी आपल्या घरामध्ये कोणती चिन्ह, कोणती शुभ चिन्ह काढायला पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत.

वास्तु शास्त्रानुसार घराच्या भिंतीवर काही शुभचिन्हे लावता येतात. त्यामुळे घराचे वास्तु दोष दूर करता येतात. चला तर जाणून घेऊया अशा शुभ चिन्हांबद्दल. जे घरात लावल्याने सौख्य आणि समृद्धी सुद्धा वाढते.

वास्तुशास्त्रात घराच्या दिशांची काळजी प्रामुख्याने घेतले जाते कधी कधी घराची रचना अशी असते. त्यामध्ये बदल करण शक्य नसत अशा परिस्थितीत घरात असे काही मांगलिक चिन्ह काढतात त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करता येतो.

प्रत्येक सणासुदीला घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर आणि शुभ लाभ काढण्याची पद्धत आहे आणि आपण ते करायला पाहिजे. त्यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होऊ शकतो. आपल्या घरामध्ये सगळ काही शुभमंगल होत.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक हे चिन्ह बनवाव. स्वस्तिक चिन्ह बनवल्यामुळे नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, स्वस्तिक सगळीकडून एकसारखे दिसून येत म्हणून हे घरातील वास्तु दोष नाहीसे करत. त्यामुळे त्यात मध्ये मोठा फरक जाणून येतो.

मुख्य दारावर हळदीचे ठिपके दिल्याने घरात सौख्य आणि समृद्धी येते. हळद ही शुद्धतेचे प्रतीक मानली गेली आहे. पिवळा ब्राहस्पती किंवा गुरुचा घटक आहे. जे सौख्य आणि समृद्धीला दर्शवतो. यामुळे घरातील रोगांचा नायनाट होतो.

प्रत्येक घरासाठी हे चिन्ह काढणे आवश्यक आहे. ओम हे सृष्टीचे निर्माते परमपिता ब्रह्माचे प्रतिक आहे. ओम हे चिन्ह घरात ठेवल्याने घरात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्रसन्न होते. जी घरातील रोगांना निर्माण करणाऱ्या किरणांना नष्ट करते व त्या ऊर्जेचा नायनाट करते.

वास्तुशास्त्रानुसार मिनच्या प्रतीक चिन्हाला घरातील उत्तर दिशेस ठेवावे. असे केल्याने धनलाभ होतो जर आपणास मिनचे प्रतीक चिन्ह ठेवायचे नसल्यास आपण फिश एक्वेरियम देखील ठेवू शकता. त्यामुळे घरात पैसे वाढतात. शास्त्रानुसार श्री गणेशा आराध्य देव आहे. सर्वप्रथम उपासना त्यांची केली जाते. घराच्या मुख्य दारावर त्यांचे चित्र लावल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते.

घराचे मुख्य दार दक्षिण मुखी असल्यास दारावर पंचमुखी मारुती चे चित्र लावावे. दाराच्या मधोमध क्रिस्टल चे बॉल्स लोमकाळते ठेवल्याने, आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात वाढते आणि नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो.

ही शुभ चिन्ह आपण आपल्या घरामध्ये नक्की काढली पाहिजे. त्यामुळे आपल्या घरातील वास्तु दोष नाहीसे होतात. आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढते घर आपल सुख समाधान आरोग्यदायी संपन्न बनत.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *