हृदयीस्पर्शी कथा- अखेर प्रेम जिंकले, अविस्मरणीय कथा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सकाळी सकाळी मोबाईल ची रिंग वाजली आणि अनिकेत ला जाग आली. त्याने बघितले तर पंकज चा फोन होता. त्याने मोबाईल कानाशी लावला हा बोल पंकज समोरून आवाज आला अरे अनु तुला माझे लग्नाचे इंविटेशन कार्ड मिळाले असेलच.

कारण पंधरा दिवस आधीच मी ते पोस्ट केलेत त्यावर अनिकेत म्हणाला हो ३ ते ४ दिवस आधीच मिळाले. त्यावर पंकज म्हणाला तुला लग्नाला नक्की यायचय त्यासाठी मी तुला वयक्तिक फोन केलाय. न येण्याचे कोणतेही कारण चालणार नाही लागले तर आताच ऍप्लिकेशन देऊन ठेव.

अरे हो यार तू काळजी करू नको मी करतो ऍडजस्ट अनिकेत म्हणाला. सर्व मित्रांना घेऊन ये तुमची सर्व व्यवस्था मी करून ठेवलीय असे बोलत पंकज ने फोन ठेवला. पंकज सोबत बोलणं झाल्यानंतर अनिकेत ला आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

एक वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली होती तिचे नाव रुपाली होते. एकदा तिच्या सहकारी मित्रांच्या फॅमिली कार्यक्रमा मध्ये रुपालीशी त्याची ओळख झाली होती. अनिकेत ला रुपाली आवडली होती. त्याने सहकारी मित्रांकडून तिचा नंबर मिळवला आणि मग व्हाट्सअप्प च्या माध्यमातून कॉन्टॅक्ट वाढले.

एकमेकांना भेटल्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता. एकदिवस रोजप्रमाणे ते गार्डन मध्ये बसले होते तेव्हा ती म्हणाली आता काही दिवसात बाबाची बदली होऊ शकते. असे झाल्यास आम्हाला हे शहर सोडून जावे लागेल हे ऐकताच अनिकेत ला धक्काच बसला.

अनिकेत म्हणाला काहीही असो तू जाऊ शकत नाही मी तुला जाऊच देणार नाही. त्यावर ती हसली आणि म्हणाली म्हणजे त्यावर अनिकेत म्हणाला अग आपण लग्न करू म्हणजे तू कायमची माझी होणार. तू फक्त बाबांशी माझी भेट करून दे त्यावर रुपाली म्हणाली प्रयत्न करते व लवकरच तुझी बाबांशी भेट करून देते.

त्यानंतर ते दोघी आपापल्या घरी जायला निघाले. घरी गेल्यावर अनिकेत ने रुपालीला फोन केला तो बंद येत होता त्याने रात्रभर रुपातील फोन ट्राय करत राहिला. आता त्याच्या मनाची हुरहूर वाढत होती. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेवर तो तेथे गेला परंतु ती तेथे आलीच नाही.

त्याला वाटले तिच्या घरी जाव पण संयम राखत तो घरी परतला. असच ८ दिवस निघून गेले शेवटी त्याने तिच्या घरी जायचा निर्णय घेतला आणि तो तिने दिलेल्या पत्त्यावर पोहचला.

बघतो तर काय तिच्या घराला कुलूप होते शेजारी चौकशी केल्यावर समजले तिच्या बाबांची बदली झाली होती व ते हे शहर सोडून कायमचे निघून गेले होते. रुपालि ने असे मला सोडून का गेली असेल या विचाराने त्याला रात्रभर झोप आली नाही.

नंतर सहा महिने असेच निघून गेले मात्र आज सकाळी पंकज चा फोन आला आणि रूपालिच्या आठवणी ताज्या झाल्या. त्याचे डोळे पाणावले त्याने डोळे पुसले व ऑफिसात जाण्याच्या तयारीला लागला. पंकज च्या लग्नाला मन नसतानाही त्याला जावे लागले कारण पंकजची व त्याच्या मित्रांची नाराजी त्याला झेपवली नसती.

तो लग्नाला जायला निघाला दुसऱ्या दिवशी तो मंगल कार्यालयात आपल्या मित्रांसोबत पोहचला. सगळीकडे जल्लोष चालू होता मात्र अनिकेत ला या वातावरणात करमले नाही तो मंगल कार्यालयाच्या बाहेर फिरण्यासाठी आला. चालता चालता एका सोन्याच्या दुकानजवळ आला बघतो तर काय त्याच्या डोळ्यासमोर चक्क रुपाली होती.

रुपाली दुकानात मंगळसूत्राची डिझाईन बघत होती. तिच्या सोबत एक पुरुष होता म्हणजे रुपलीने लग्न केले तर असा विचार त्याच्या मनात आला. त्याला वाटले जाव आणि तिला विचाराव का केला माझा विश्वासघात? अनिकेत तिच्या समोर गेला अनिकेत ला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू आले.

तिने तब्येत विचारली व नंतर सोबत असलेल्या पुरुषाला तिचा भाऊ आहे असं सांगून त्याच्या लग्नाची खरेदी करत आहोत असे सांगितले. हें ऐकून अनिकेत ला बर वाटल. नंतर रुपाली दुकानातून जायला निघाली तेव्हा अचानक ती काठीच्या साहाय्याने चालायला लागली तेव्हा अनिकेत ने विचारले काय झाले तिला.

तेव्हा तिचा भाऊ म्हणाला गावालाअसतानाच रुपालीचा मोठा अपघात झाला व तिने तिचे पाय गमावले. अनिकेत च्या डोळ्यात पाणी आले त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला रुपाली याच कारणामुळे माझ्यापासून दूर गेलीस ना तू. अग मी तुझ्या शरीरावर प्रेम केले नाही तुझ्या मनावर प्रेम केले होते.

तुला वाटले तरी कसे की तुझ्या अपंगत्वामुळे मी तुला नाकारेल. तू मला सोडून जाऊ नकोस, बाजूला उभा रुपलीचा भाऊ हें बघत होता त्याच्याही डोळ्यात अश्रू आले होते. तो म्हणाला ताई तुझ्यासाठी याच्यापेक्षा चांगला जोडीदार आम्ही नाही शोधू शकणार.

अनिकेत ने त्याला मिठी मारली व लग्नाला होकार दिला. रुपाली च्या डोळ्यात पाणी वाहत होते कारण आज तिचे प्रेम जिंकले होते. अनिकेत आणि रुपालीचे लग्न थाटामाटात झाले.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *