दर गुरुवारी स्वामींना दाखवा हा विशेष नैवेद्य, साक्षात स्वामींचे दर्शन होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वामींचे भक्त असाल, स्वामींचे सेवेकरी असाल तुम्हाला माहीतच असेल की, स्वामींच्या भक्तीमध्ये रोज नैवेद्य दाखवावा लागतो. मग तो नैवेद्य सकाळचा असेल, दुपारचा असेल किंवा संध्याकाळचा असेल बहुतेकदा दोन वेळेसचा नैवैद्य आपण दाखवतच असतो.

परंतु नवीन सेवेकऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नसते की, स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो. तर तुम्ही जुने सेवेकरी असाल किंवा नवीन सेवेकरी असाल तर हा लेख तुमच्या साठी खूप महत्त्वपूर्ण असू शकतो.

कारण आजच्या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला गुरूवारच्या दिवशी दाखवला जाणारा स्वामी चा नैवेद्य सांगणार आहे. हा विशेष नैवैद्य जर तुम्ही रोज स्वामींना नैवेद्य दाखवत असला तरी तुम्ही गुरुवारी हा नैवैद्य दाखवू शकतात.

जर तुम्ही स्वामींना किंवा देवघरात नैवेद्य ठेवतच नसाल तर तुम्ही फक्त गुरुवारी तरी नैवेद्य नक्की ठेवा. मग तो सकाळी असेल दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल फक्त गुरुवारी ठेवा आणि जर स्वामींचे सेवेकरी असाल रोज सेवा करत असाल तर रोज नैवेद्य ठेवण्याची सवय लावा. तो नैवैद्य आपणच नंतर खातो फक्त दाखवायचा असतो.

आता हा नैवेद्य कोणता आहे? तर तुम्हाला माहिती असेल की स्वामींचा वार हा गुरुवार आहे. गुरूवारच्या दिवशी विशेष सेवा केली जाते. त्या सोबत विशेष नैवेद्य सुद्धा दाखवला जातो आणि हा नैवेद्य असतो गोड नैवेद्य. सर्व पदार्थ गोड पुरणपोळी, किंवा शिरा आणि पुरी यापैकी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही गुरुवारी करायचा आहे.

स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्ही परिस्थितीनुसार किंवा काही समस्यांमुळे अडचणीमुळे काहीच करू शकत नसाल. तर एक साधी चपाती एका वाटीत दुध त्यामध्ये चिमूटभर साखर हा नैवेद्य दाखवायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचे की तुम्हाला काही ना काही गुरूवारच्या दिवशी गोड दाखवायचे आहे.

मग ते सकाळी दाखवा, दुपारी दाखवा, संध्याकाळी दाखवा काहीतरी गोड दाखवायचे आहे. मग त्यासोबत तुम्ही रव्याचा शिरा करू शकतात किंवा रवा नसेल तर कनिकाचा शिरा केला तरी काही हरकत नाहीये. स्वामी भक्ताने प्रेमाने विश्वाससाने केलेल सगळ काही ग्रहण करतातच. फक्त त्यामध्ये कुठलीही जबरदस्ती नाही.

फक्त आपुलकीने स्वामीं साठी तुम्हाला काहीतरी करायच आहे. या इच्छेने तुम्हाला हा नैवेद्य दर गुरुवारी करायचा आहे. हे समजून तुम्ही हा नैवेद्य करावा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *