घरातील व्यक्तींना बाहेरची बाधा होऊ नये. म्हणून हा उपाय करा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

कोहळा हे काकडीच्या जातीचे फळ आहे. भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे पण साधारण दहा-बारा पट मोठे असते. जेवणात, औषधी करणात तर कोहळा वापरला जातो. पण यज्ञ, पूजा विधी मध्ये देखील याची आवश्यकता असते.

असे मानले जाते की, कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल. पण मनात आपल्या बद्दल जर इर्षा पाळून असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हीटी मध्ये बदलतात. व घरातील व्यक्तींवर होतो.

चिड चिड वाढते, व्यवसाय अडचणी येतात. प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही. एक कोहळा घरात किंवा दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे. त्यामुळे कोवळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो.

घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजर दोष यापासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.

कोहळा लावण्याची योग्य पद्धत- कोहळा आणताना देठ असलेला आणावा, आणल्यानंतर कोहळा धुवावा. त्याच्या दोन्ही समोरा समोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावा. त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेघ ओढावी.

कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करावी व हळद-कुंकू अक्षदा दिवा अगरबत्ती लावावी. त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्‍ती व नजर दोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर हे कोहळे शिकाळ्यात टांगावे.

कोहळा टांगल्यानंतर कधीकधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामवण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशावेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.

पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर लवकर खराब होतो. जर घरात जास्त अशुभ ऊर्जा साठली असेल तर नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.

तरी पण जर सोमवती किंवा शनि अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या या वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा.

केव्हा जर कोहळा खराब झाला तर त्यापुढील शनिवारी लावावा व सुरुवातीला लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *