२ वर्षाची मुलगी पायरीवरून खाली पडली तरी तिच्या भावाला मॅडमने सोडले नाही पुढे जे घडले ते पाहून…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

अजिबात चांगला नाही तुम्ही, नाही आवडत अजिबात तुम्ही मला अस मोठ्यांन म्हणत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि मी अवाक होऊन बघत होते त्याच हे रूप. एका शुल्लक कारणासाठी आपल्या एखाद्या विद्यार्थ्यांन अस आणि इतक्या उघडपणे रिऍक्ट व्हाव हे माझ्यासाठी खूप आश्चर्यच आणि काहीस क्रोध आणणार होत.

त्याने मला अस म्हणण हे माझ्यातल्या शिक्षकाच खूप मोठ अपयश होत. १७ वर्षात आज आलाय असा आणि इतका वाईट अनुभव एकाही विद्यार्थ्यांने दिला नव्हता. खूप बेचैन होते मी ४ दिवसांपासून पण स्वतःवर स्वतःच्या शिक्षक असल्यावर माझा नितांत विश्वास आहे.

या वाक्याच्या मुळाशी जाऊन त्याची कारण मीमांसा जाणून या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसवेना मला तर झाल अस की, मागच्या काही दिवसांपासून दररोज लंच ब्रेक नंतर लगेच दर अर्ध्या अर्ध्या तासाने तो बाथरूमला बाहेर जाण्यासाठी विचारायचा मला आणि त्याच्यामुळे शिकवताना मध्येच डिस्टर्ब व्हायचे मी.

त्या दिवशीही मी शिकवत असताना जागेवरून उठून हाताची करंगळी दाखवत तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. आता मात्र मी चिडून त्याला रागावले आताच तर ब्रेक झाला होता ना. तुला बाहेर जाऊन टाईमपास करायचा असतो ना. गेलास की १०-१५ मिनिटे तर बाहेरच असतोस बस जागेवर.

यावर ते सुरुवातीचे माझ्यातल्या शिक्षकाला गदागदा हलवून सोडणारे वाक्य ओटीत पडल माझ्या परत दुसऱ्या दिवशी त्याने तेच विचारण्याची हिंमत केली. पण आज मात्र मी थोड सौम्यपणे घेतल आणि जाण्याची परवानगी दिली. तिसऱ्या मजल्यावर आहे माझा वर्ग आणि प्रत्येक मजल्यावर टॉयलेटची सोय आहे.

पण तो मात्र खाली गेला माझा आज बारकाईने लक्ष होत त्याच्याकडे वरून वाकून पाहत होते मी त्याला आणि जे पाहिल ते खुप अनपेक्षित होत मला शाळेच्या गेटच्या पायरीवर त्याची बालवाडीतली बहिण बसली होती. एक वाजता शाळा सुटूनही ती अजुनही इथेच होती.

भाग २ साठी कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *