जीवनात जर काही चांगले करायचे असेल तर एक हा लेख नक्की वाचा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्याला वाटते की, आपले जीवन अगदी सुखात आनंदात आणि समाधानात व्यतीत व्हावे. त्यासाठीच आपली धडपड चाललेली असते. प्रत्येक कार्य करतांना आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज भासते.

कोणीतरी पुढे येऊन आपली ती गरज पूर्ण करतात ते आपले नातेवाईक आई-वडील भाऊ-बहीण पती-पत्नी कोणी असतील किंवा ज्यांच्या आपल्याशी रक्ताचे नाते नाही असे मित्र-मैत्रीण कधी कधी आपली गरज पूर्ण करतात.

या जगातील सर्वात सुंदर व सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे मैत्रीचे नाते. या नात्यात स्वार्थ नसतो मोठेपणा किंवा कमीपणा नसतो. तिथे फक्त मैत्री असते आणि अशी मैत्री व्यक्तीला प्रगतीच्या मार्गावर नेते. परंतु कधी कधी असे होते की आपण व्यक्तीला ओळखण्यात चूक करतो आणि आपल्या मित्रांना मुळे आपण चुकीच्या मार्गाला लागतो.

म्हणतात ना की संगत गुण आणि सोबत गुण आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्या व्यक्तीचे गुण अवगुण आपोआप आपल्या मध्ये उतरू लागतात. म्हणून संगत करताना योग्य व्यक्तीशी करा. चुकीचा व्यक्तीबरोबर केलेली मैत्री आपला नाश करते. एक वय असत त्यावेळी आपल्याला फक्त मित्र सर्व काही वाटतात.

ते सांगतील ती पूर्व दिशा मग आपण त्यातील खरे-खोटे तपासून पाहत नाहीत. मित्र म्हणताय ना मग ते योग्यच आहे असे म्हणून आपण डोळे बंद करून त्या मार्गाने चालू लागतो. मग पुढे जाऊन अडकून पडतो. म्हणून मित्र निवडताना योग्य मित्रांची निवड करा.

कधी कधी आपल्याला त्यांच्यातील वाईट गुण दिसतात त्यांच्यातील उणिवा लक्षात येतात. परंतु तरीही आपण म्हणतो तेच जसे आहे मी थोडी त्यांच्यासारखा वागणार आहे मी त्यांच्या प्रमाणे वाईट कामे करणार नाही. परंतु संगतीचा परिणाम खूप जबरदस्त असतो. हळूहळू आपणही त्यांच्या प्रमाणेच वर्तन करू लागतो.

ते जसे बोलतात बोलताना ज्या शब्दांचा वापर करतात ते शब्द आपल्या बोलण्यात येऊ लागतात. आपले वागणे, बोलणे, उठणे-बसणे खाणेपिणे यांच्याप्रमाणे होऊ लागते. आणि आपण कधी त्यांच्यासारखेच होतो हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कोणाचीही संगत करताना शंभर वेळा विचार करा. मग मैत्री करा.

त्यांच्यात थोडेफार काही वाईट गुण असतील तर त्यांच्या बद्दल करा किंवा आपल्या मैत्रीला तिथेच थांबवा पुढे जाऊ देऊ नका. आपल्याला आपल्याला भगवंतांनी सर्व नातेवाईक आई-वडील, भाऊ-बहीण काही आहे ते सर्व दिलेले आहे. आपल्याला त्यात आई-वडील भाऊ बहीण किंवा इतर नातेवाईक निवडण्याची गरज लागत नाही. आपल्याला जन्मापासूनच मिळतात.

पत्नी किंवा पती यांचे नातेही वरूनच जोडलेले असते. फक्त ते ओळखून जोडावे लागते. परंतु फक्त एकच नाते असे आहे भगवंताने आपल्याला स्वतःला जोडायला सांगितले आहे. त्यात आपल्याला स्वातंत्र्य आहे की मित्र कोणते बनवायचे व कसे बनवायचे ते आणि मित्रांमुळे जीवन घडत असते.

म्हणून जीवनात मित्र असणे आवश्यक आहे. जीवनाला योग्य दिशा ही मित्र देतात व चुकीच्या दिशेने नेण्याचे कार्य ही मित्र करतात. म्हणून जीवनात जर पुढे जायचे असेल तर वेळप्रसंगी रागावणारे चिडणारे परंतु वेळ प्रसंगी आपल्याला समजून घेणारे, समजावून सांगणारे मित्र असायलाच हवेत.

मित्र असे असतात त्यांच्याकडे आपण आपल्या जीवनातील सर्व चांगल्या व वाईट गोष्टी बिन दिक्कत पणे शेअर करू शकतो. तसे आपले आई-वडील, भाऊ-बहीण इतर नातेवाईक आपला जोडीदार यांना आपण सांगू शकत नाही.

ते आपण आपल्या मित्राला सहज सांगू शकतो व आपल्याला विश्वास असतो की, आपला मित्र त्यातून मार्ग काढेलच परंतु ही गोष्ट इतर कोणा बरोबर शेअरही करणार नाही. इतका विश्वास मैत्रीच्या नात्यात असतो. असेही हे मित्र आपल्या जीवनाचे नक्की सोने करतात म्हणून जीवनात चांगल्या मित्रांची साथ असणे फार आवश्यक आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *