सोमवारी चुकूनही खाऊ नये ही एक वस्तू नाही तर महापाप लागते. शिवपुराण

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आठवड्यात एकूण ७ वार आहेत. प्रत्येक वाराचे आपले एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाची संबंधित आहे. त्याशिवाय प्रत्येक वाराला वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना केली जाते. प्रत्येक वाराचे काही नियम आहे.

त्या नियमा प्रमाणे आपण जर वर्तन केले तर आपल्याला त्यातून खूप शुभ फळे मिळत राहतात. आजच्या लेखामध्ये आपण सोमवारची माहिती पाहणार आहोत. सोमवार हा चंद्र ग्रहाशी निगडित वार आहे. या दिवशी महादेवाचे पूजन केले जाते, महादेवाची उपासना केली जाते.

सोमवार हा महादेवांचा अत्यंत आवडता दिवस म्हणून सोमवारी जर आपण महादेवाच्या नियमांचे पालन केले तर महादेवांचे कृपा आपल्यावर खुप लवकर होते. महादेव आपल्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर करतात.

सोमवारचे काही नियम आहेत आपण जर त्या नियमांचे पालन केले त्या नियमा प्रमाणे वर्तन केले तर आपण आपल्या जीवनात खूप आनंद व सुखाची प्राप्ती करू शकतो. सोमवारी कोणते कार्य करू नये, कोणत्या वस्तूंचे सेवन करू नये, कोणत्या रंगाचे कपडे परिधान करू नये.

म्हणजे थोडक्यात आज आपण हे जाणून घेणार आहोत. हे सोमवारी कोणते कामे निषिद्ध सांगितलेले आहेत ते. आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित केलेला आहे. तसेच या दिवसावर चंद्रदेवांचाही प्रभाव असतो.

म्हणून या दिवशी देवाधिदेव महादेव व चंद्रदेव या दोन्ही देवांची उपासना केली जाते. आपल्याला सुख समृद्धी व संपन्नता मिळावी यासाठी सोमवारी व्रत ठेवले जाते, उपवास केला जातो. सोमवारी उपास केल्याने आपल्यावर देवाधिदेव महादेव व त्या बरोबर चंद्र देवांची कृपा होते व आपल्याला जीवनात सुख व सौभाग्यची प्राप्ती होते.

आपले वैवाहिक जीवन सुखमय असावे तसेच आपल्याला चांगला जोडीदार मिळावा. यासाठी अविवाहित मुली सोमवारचे व्रत खूप उत्साहाने करतात. महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना गंगेचे पाणी अर्पण करावे तसेच दोन बेलाचे पाणी अर्पण करावेत. महादेवाच्या पिंडीला चंदनाचा लेप लावावा आणि नैवेद्य म्हणून दूध फळे अर्पण करावे.

सोमवारी रात्री चंद्र देवांना अर्ग जरूर द्यावे. यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते. महादेवाना पांढरा रंग अति प्रिय आहे म्हणून महादेवांना दूध, दही,पांढऱ्या रंगाची मिठाई या वस्तूचा नैवेद्य अर्पण करावा आणि शक्य असेल तर आपणही सोमवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे सेवन करावे यामुळे महादेवाची कृपा आपल्यावर नक्कीच होते.

सोमवारी पांढर्‍या रंगाची वस्त्रे धारण करणे शुभ मानले जाते. वास्तु शास्त्रानुसार जर काही महत्त्वाच्या कामानिमित्त आपण घराबाहेर पडणार असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपला चेहरा आरशात पहावा व मग घराबाहेर पडावे या उपायांमुळे आपल्या कार्यात येणारे अडथळे दूर होतील व आपल्याला त्या कामात यश मिळेल.

ही आहे ती कामे जी सोमवारी जरूर करावे. परंतु काही कार्य असे आहेत जे सोमवारी अजिबात करु नयेत. सोमवारी मांसाहार करू नये सोमवारी व्रत करावे आणि शुद्ध व सात्त्विक आहार दूध, दही फळे यांचे सेवन करावे. सोमवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये.

जर महादेवांच्या मंदिरात जायचे असेल तर काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत. सोमवारी स्त्रियांनी केस धुवू नयेत, कोणाशी खोटे बोलू नये, कोणाचा अपमान करू नये. कोणाचा अनादर होईल असे वाक्य मुखातून काढू नये. तसे तर नेहमी चांगले व गोड बोलावे परंतू महादेवाच्या प्रकोपापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सोमवारी खूप जपून व्यवहार करावा.

कोणतेही वाईट व चुकीचे कार्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यावी. महादेवाच्या पूजना बरोबरच नंदिचे पूजन करावे. महादेवांना पशु प्रिय मानले जाते. म्हणून या दिवशी कोणत्याही प्राण्याबरोबर दुर्व्यवहार करू नये गाई-बैलांची सेवा करावी.

भगवंतांचे पूजन करताना लक्षात ठेवावे की, महादेवांना केतकी चे फुल कुंकू तुटलेल्या अक्षता, तुटलेल्या बेलाचे पान व तुळशीची पाने अर्पण करू नये. तसे महादेवांना शंखाने पाणी अर्पण करू नये. सोमवारी महादेवांचे व चंद्र देवाचे पूजन करावे, व्रत उपवास करावा. महादेवाच्या मंदिरात जावे व महादेवाचे दर्शन करावे.

शुद्ध मनाने महादेवांचा प्रिय मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करीत राहावे. महादेव यामुळे आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील व आपल्या सर्व इच्छा आणि मनोकानांची पूर्तता करतील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *