मुलगी ज्याला बाप समजत होती तो तिचा बाप नव्हताच, पण जेव्हा हे तिला समजल तेव्हा पुढे जे घडले ते पाहून थक्क व्हाल.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

अजय आणि अपूर्वा दोघे चुपचाप बसले होते सोप्यावर शेजारी शेजारी तरीही खूप अंतरावर असल्यासारखे कम्प्लीटली. संध्याकाळचा अंधार कधी चोर पावलांनी आत शिरून त्या दोघांमध्ये सुटलेल्या अंतरातून भरून गेला तेही कळल नव्हत त्यांना.

दारावरच्या वाजलेल्या बेलन दोघांची तंद्री भंगली आणि भानावर आली दोघ. अपूर्वाने उठत दिवा लावला आणि दरवाजा उघडला त्यांचे लेक अभा होती दारात उभी. आत येत ती काहीच न बोलता ती खोलीत निघून गेली तिच्या आतून दारही बंद केल तिने.

अपूर्वाने हताश होत अजयकडे पाहिले. अजयने मान वळवत नजर टाळली तिची अस काय झाल होत. पण या प्रचंड सुखी, समाधानी अशा त्रिकोणी कुटुंबात की तिघेही एकमेकांच्या डोळ्याला डोळा देणे टाळत होते. तर गेल्या महिन्यातल्या एके दिवशी अजय आला घरी तोच मुळी घामाने डबडबलेला.

किंचितस छातीत दुखत होत त्याच्या पुढचे एक दोन दिवस अस्वस्थ होता. अजयची घालमेल बघून मग शेवटी अपूर्वाने विचारल कारण त्याच्या रेस्टलेसनेसच आणि का कु करत करत त्याने सांगितल कारण ऐकून अपूर्वाही हादरून गेली होती.

तो भेटला मला आज, कोण तो आनंद भेटला मला आज तो आलाय आता इथेच कायमचा. काय? अरे पण का त्याने कबूल केल होत ना की तो कधीच समोर येणार नाही आपल्या. खूप थकलाय तो दोन्ही कि-ड-ण्या गेल्यातच जमा आहेत. रेगुलर डा’य’बि’टी’स वर आहे.

आर्थिक परिस्थितीही अगदी बेतास बात आहे. मी त्याला काही पैशांची मदत करु का विचारल तर हसला माझ्याकडे बघून आणि म्हणाला पुढे अजयने जे काही सांगितले होते ते ऐकून अपूर्वा मनातून पूर्ण कोसळली होती.

पुन्हा एकदा हरवलेल्या दोघांना भानावर आणण्याचे काम आभानेच केल. यावेळी त्यांना हाक देत आई बाबा बोलायचे आहे थोडे आत्ताच्या आत्ता आई तू जरा बाबांजवळ जाऊन बसशील. अपूर्वा जाऊन बसली अजयच्या शेजारी आभा त्याच्या पायाशी बसली जमिनीवर.

दोघांचाही एक एक हात आपल्या दोन्ही हातात धरून बोलू लागली. आता वयाच्या चोविसाव्या वर्षी जेव्हा मला अचानक कळल की. अजय बाबा माझा बाबाच नाहीये. शप्पथ पायाखालची जमीन सरकली माझ्या आठवडाभर मी तुम्हा दोघांशी बोलेही नव्हते मग.

इशांने मला समजावल तो म्हणाला की आभा तू त्या माणसांशी बोलत नाहीयेस ज्याने तुला २४ वर्ष तळ हातावरच्या फोडासारख जपल आणि तेही कोणाचा ऐकून बोलायचे बंद झालीयेस तू त्याच जो पळून गेला होता तुझ्या आईला सोडून जबाबदारी झटकत तिच्या पोटात असलेल्या तुझी.

पुन्हा कधी तुझ्यासमोर येणार नाही अस थातूर मातूर सांगत तिला आणि बघ तूच तो अखेरचा शब्द ही पाळता नाही आला तिला. आला परतून तुझ्या बाबांच्या समोर. अजय घळाघळा रडत होता. अपूर्वाही रडत होती पण एकीकडे अजयला सांभाळतही होती. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या जोडीने लेकीच आणि होणाऱ्या जावयाचे कौतुक दुधडी भरून वाहत होत.

आभाने दोघांचाही हात हलकेच दाबत त्यांना डोळ्यांनी थांबा अजून झालेले नाही अस सांगितल. आणि पुढे बोलायला सुरुवात केली तिने बाबा तू त्या माणसाला देऊ केलेली आर्थिक मदत त्याने नाकारले आणि त्याने काही वेगळेच मागीतले ना तूझ्याकडे आज मी त्याला त्याची ऑफर धडधडीत पणे नाकारून आली आहे.

त्याच्या तोंडावर सांगून आले की, तुझ्या दोन्ही किडण्या गेल्या आहेत. तुझी मुलगी असल्या कारणाने जर का टेस्ट वगैरे करून बघितल्या तर माझी किडनी ही मॅच होऊ शकेल कदाचित तुला तेव्हा तू फक्त सांगा आणि मी हसत हसत तुला एक किडणी देईन माझी उपकार म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून पण तू माझ्या बाबाकडे मागितलेला कन्यादानाचा हक्क मात्र मी तुला अजिबात बजावू देणार नाही.

कर्तव्य म्हणून तर सोडच उपकार म्हणून ही नाही. कारण माझ्या दानावर हक्क फक्त आणि फक्त अजय बाबांचा म्हणजे माझ्या खऱ्या बाबाच आहे आणी तु त्यांच्यापासून हिरावून घ्यायची तुझी योग्यातही नाही आणि पात्रता ही नाही. त्यामुळे हे दान अगदी विना संकोच माग पण पुन्हा ते दान मागायचा विचारही करू नकोस.

हात जोडले मग त्याने मला डोळे भरून वाहत असताना हसतही होता तो उन पावसाचा खेळ जणू काही चालू होता त्याच्या चेहर्‍यावर मला मात्र खात्री देत म्हणाला की, आता येईल पुन्हा तुम्हा लोकांसमोर ते कदाचित बातमीतूनच.
माझ्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला त्याने आणि गेला होता अस्पष्ट माझ्या डोळ्यांसमोरून.

भरभरून रडणारा अजय आता आता तोंडाचा आ वासून बघत होता आभाकडे. खऱ्या अर्थाने त्याची लेक त्याला मोठी वाटू लागली होती. नाहीतर काय भे लग्न करून परक्या घरी जायच वय तरी आहे का? असे म्हणून हवालदिल होत असे तो.

आई-बाबा दोघेही आता खाली जाऊन लेकीच्या दोन्ही बाजूंना एक-एक करत बसले. लेकीच्या खांद्यावर दोघही डोक ठेवल लेख आई बाबाच डोक आपल्या हाताने हळुवार थोपटत होती. अजय अपूर्वा ची लेक आभा आज जमिनीवर बसूनही थेट आभाळाला गवसणी घालेल एवढी मोठी झाली होती.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *