दे-ह-त्या-ग करायला गेलेल्या नास्तिकाला साक्षात स्वामी समर्थ भेटले. एक थरारक अनुभव अवश्य वाचा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आजच्या लेखामध्ये आपण स्वामींचा दृष्टांत पाहणार आहोत की, ज्यामध्ये एका ना-स्ति-कला स्वामींनी कसे भक्तीच्या मार्गात आणले आणि त्या व्यक्तीला त्या दृष्टांत नंतर एक जगण्याचा मार्ग मिळाला आणि एक उमेद मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीही आ-त्म-ह-त्ये-चा विचार मनात सुद्धा आणला नाही.

तर असा एक स्वामींचा थरारक अनुभव आज तुम्हाला वाचायला मिळणार आहे. काही कारणांमुळे त्या भक्ताचे नाव इथे नमूद केलेले नाही.तर हा ज्या दादांचा अनुभव आहे ते सांगतात.

नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत घडलेला एक दृष्टांत मी सर्वांना सांगू इच्छितो १९९० मध्ये माझी परिस्थिती हालाखीची होती.अगदी कुठे गावाला जायचे म्हटल्यावर मला पैशाची तडजोड करावी लागत. १९९५ ला माझा विवाह झाला.

बायको स्वामी समर्थांची कट्टर भक्त होती. स्वामी समर्थ म्हटले की मग कशाचीही तडजोड नाही.असा तिचा स्वभाव पण माझ या उलट होत.मी आधीपासूनच नास्तिक आता नास्तिक म्हटले म्हणजे दारू मटण इत्यादी हे सगळ आलच.बायकोचे आणि माझे सुरुवातीला खूप भांडण व्हायचे.

बघता बघता मी अट्टल बेवडा झालो. माझा परिवार माझ्या पुढे हतबल झाला होता.मी निराशेचा व शेवटच्या टोकावर होतो कर्जबाजारी झालो होतो.आ-त्म-ह-त्या विना माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.खूप डि-प्रे-शनमध्ये होतो मी ठरवल होत हा देह त्या-गाय-चा.

म्हणून हायवे ला आलो त्यावेळी मी खूप नशेत होतो. मला शेवटच बायको सोबत बोलायच होत. म्हणून मी तिला कॉल केला आणि बोलू लागलो. तिला माझ्या बोलण्यावरून सगळा अंदाज आला मी जीवाच बर-वाईट करतोय म्हणून ती मला विनवणी करून रडू लागली.

तुम्ही घरी या म्हणून हाक देऊ लागली. पण मी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी फोन बंद केला आणि एखादी गाडी येईल म्हणून वाट बघू लागलो. दूरवर बघितले तर भरधाव वेगाने एकत् ट्रक येताना दिसत होता. मी देह-त्याग करण्याचा निश्चय केला होता. तेवढ्यात मला मागणं कुणीतरी आवाज दिला.

ये पोरा हा रस्ता कुठे जातो रे? मी मागे वळून पाहिले तर एक वयोवृद्ध माणूस होता मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. मग तो वृद्ध माझ्याजवळ आला आणि परत विचारल इथे कुठे जवळ गाव आहे का रे बाळा? मी त्या वृद्धाला खवळल त्यावर तो वृद्ध बोलला एवढा राग चांगला नाही.

संयम ठेवला तर सगळं नीट होईल आणि जीवन प्रवासात येणाऱ्या अडचणींना आत्महत्या हा पर्याय नसतो. माझ्याकडे बघ पाच मुल आहेत मला एकही सांभाळत नाही. माझी बायको केव्हाच गेली देवा घरी तरी मी जगतोय आणि तुला काय झाल रे चांगला तरुण आहेस. काम कर काहीतरी व्यवसाय कर मी त्या वृद्धाचे बोलणे ऐकुन निशब्द झालो होतो.

मी त्यांना विचारले बाबा तुम्हाला कुठे जायचे. त्यावर ते वृद्ध बोलले मी कुठे जाणार भिक्षा मागून जीवन जगतोय. माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता, जगण्याचा मार्ग मला कळला होता. वृद्ध म्हणाले चल बाबा तुझ गाव असेल जवळ तर मला घेऊन चल भूक लागली भिक्षा मागून खातो.

त्या वृद्धाचे बोलणे ऐकून मला माझ्या आजोबांची आठवण झाली होती. मी इमोशनल झालो होतो, त्यांना मी माझ्या घरी येण्यासाठी विनंती केली आणि ते माझ्या सोबत आले. पण घरी आल्यावर बघितले तर बायको स्वामी समर्थांचे फोटो समोर बसून रडत होती. स्वामी समर्थांचा जप करत होती. त्यावर त्या आजोबांनी तिला आवाज दिला.

ये पोरी पाणी मिळेल का? तिने डोळे उघडले आणि समोर मला पाहिल तिला खूप खूप आनंद झाला. झालेली हकीकत मी तिला सांगितली. तिने त्या वृद्धांचे पाया पडून आभार मानले. नंतर आम्ही सर्वांनी भोजन केले थोडा आराम करून ते आजोबा म्हणाले चला येतो आता मी चांगला संसार करा देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.

ते आजोबा निघाले तेव्हा मी थोडा भावुक झालो होतो. निघत्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीतून वीस हजार रुपये काढले आणि माझ्या कडे दिले. ते म्हणाले हे घे माझ्याकडे एवढेच आहेत. मला पैशांची गरज नाही. हे तू ठेव आणि काहीतरी व्यवसाय कर तुला काही कमी पडणार नाही.

मग आम्ही दोघे जोडीने त्या आजोबांचे दर्शन घेतले आणि त्यांना निरोप दिला. आम्ही दोघांनी ठरवल होत त्या पैशांची एक गाय घ्यायची आणि दुधाचा व्यवसाय करायचा. या घटनेला जवळ जवळ २० वर्ष होत आली आहे. आम्ही त्या एका गाई वरून आज आमच्याकडे २५ गाई आहेत.

आमचा दुधाचा व्यवसाय खूपच चांगला चालू आहे. मी मागे ३ वर्षांपूर्वी ५ एकर जमीन घेतली होती. आज एक टुमदार घर पण बांधलय. सांगायच तात्पर्य एवढंच की मला ते एक आजोबा नाही तर साक्षात श्री स्वामी समर्थ भेटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *