ही पाच झाड चुकूनही घराच्या अंगणात लावू नये नाही तर अडचणी वाढत जातील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

वास्तु शास्त्राच्या मध्ये रोप आणि झाडे देखील घराच्या सुख-समृद्धीशी संबंधित असतात. जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात. जर त्यांची दिशा चुकीची असेल तर ते बऱ्याच अडचणींना कारणीभूत सुद्धा ठरतात.

वास्तूमध्ये अंगणात किंवा घराभोवती काही रोपे लावण्याची मनाई करण्यात आलेली आहे आणि आम्ही आजच्या लेखामध्ये तुम्हाला असेच काही रोप, झाड सांगणार आहे. जी चुकून सुद्धा तुम्ही तुमच्या अंगणात किंवा घराच्या अवती भोवती सुद्धा लावू नका.

काटे असलेल कोणतेही झाड घराच्या अंगणात लावू नये. काटेरी झाडे घरात नकारात्मकता आणतात आणि बऱ्याच समस्यांना आमंत्रण देत असतात. मान्यता आहे की, अशा रोपांची लागवड केल्यास घरातील त्रास आणि आर्थिक संकट वाढतात. पण गुलाबाचे झाड याला अपवाद आहे.

घरात कोणी चिंचेचे झाड लावू नये मान्यता आहे की चिंचेची लागवड केल्याने घरात रोग येत असतात. याशिवाय परस्पर संबंध सुद्धा खराब होतात. यामुळे घराचे वातावरण खराब होते. त्याच वेळी नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखिल घरामध्ये वाढत असतो.

पिंपळाचे झाड अतिशय शुभ मानले जात असले तरी त्याची पुजा देखील केली जाते. परंतु त्याची रोपे कधीही घराच्या आत किंवा दाराचा आसपास लावू नये. मान्यता आहे की, यामुळे पैशाचे नुकसान होते याचे वैज्ञानिक कारण म्हणजे पिंपळाची मुळे दूरपर्यंत पसरतात. ज्यामुळे ते घराच्या भिंतींना नुकसान पोहोचवू शकतात.

म्हणूनच जर आपण आपल्या घरात पिंपळाचे झाड लावलेले असेल तर ते काढून मंदिराच्या जवळ किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी लावावे.

बरेच लोक घरात मदारची लागवड करतात. परंतु वास्तुनुसार ते चांगले मानले जात नाही. मान्यता आहे की, मदार सह अशी झाडे ज्यामधून दुध निघते ते घरात लावू नये. त्यामुळे नकारात्मकता येते.

खजुराचे झाड नक्कीच घराचे सौंदर्य वाढवतात. परंतु ते लावणे टाळले पाहिजे. वास्तूच्या म्हणण्यानुसार हे लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते आणि कुटुंबात आर्थिक संकट येतात.

हे काही रोप हे काही झाड होत. ते चुकून सुद्धा आपण आपल्या घराच्या आजूबाजूला अवती भवती नाही लावले पाहिजे.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *